लग्नासाठी ऑनलाइन खरेदी करताय? मग या १४ गोष्टी नक्की ठेवा लक्षात

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
सध्या लग्नसराईचा मोसम आहे. लग्न म्हणजे वधू-वराच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण! लग्नसराई म्हटलं तर वर-वधूला दागदागिने, कपडे, चपला, मेकअप किट अशी सगळ्याचीच खरेदी करावी लागते. सध्याच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ऑनलाइन खरेदीवर भर दिला जातोय. खरेदी दरम्यान बऱ्याचदा गोंधळ होतो. लग्नासाठी ऑनलाइन खरेदी करताना काय-काय लक्षात ठेवावं वाचा…

साइज असावी परफेक्ट
लग्नाचा पेहराव हट के असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. लग्नाचा पेहराव आकर्षक असण्यासोबतच तुमच्या मापानुसार असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आजकाल प्रत्यक्ष दुकानात न जाता रेडिमेड पेहराव खरेदीला प्राधान्य दिलं जातंय. यासाठी सर्वप्रथम तुमचं माप तुम्हाला माहीत असायला हवं. म्हणजेच छाती, पोट आणि कंबरेच्या योग्य मापाचे कपडे निवडलेत तर पुढे गोंधळ होणार नाही, असं वेडिंग प्लॅनर सांगतात. लग्नाचा पेहराव खरेदी करण्याआधी किमान एकदा टेलर अथवा डिझायनरचा व्हर्च्युअल सल्ला घेण्याचं तज्ज्ञ सुचवतात.

​भाडेतत्वावर घेताय?

आजकाल तरुण आणि तरुणींमध्ये बॉलिवूड रेप्लिका कपड्यांचा प्रचंड ट्रेंड आहे. रेप्लिकाजची किंमत खूप जास्त असते. लग्नाचे कपडे वर्षानुवर्षे पडून राहतात असं अनेकांचं म्हणणं असतं. शिवाय, वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी बऱ्याचदा वधू-वरांचे कपडे भाड्यानं घेतले जातात. प्रसिद्ध डिझायनर्सचे बॉलिवूड रेप्लिका लेहेंगे भाड्यानं घेण्याकडे तरुणींचा कल वाढलाय. सध्याची परिस्थिती पाहता भाड्यानं कपडे घेण्याआधी पुन्हा एकदा विचार करावा. ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असल्यानं सुरक्षित आणि काळजीपूर्वक व्यवहार करावा. शिवाय, कपडे परत करण्याची मुदत तपासा.

(Winter Fashion स्टायलिंगचा हिवाळी मोड ऑन! ग्लॅमरस लुकसाठी ट्राय करा हे फॅशन ट्रेंड)

​नियम आणि अटी

महत्त्वाच्या ऑनलाइन खरेदी करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियम आणि अटींची फेरतपासणी करणं. ऑनलाइन शॉपिंग अॅप्सवर कपड्यांची खरेदी करणं तुलनेनं अवघड असतं. कारण शिपिंग चार्जेस, एस्टीमेट(अंदाज) डिलिव्हरी, रिटर्न पॉलिसी असते. स्क्रीनवर दाखवलेली हुबेहूब वस्तू तुमच्या दारात येईल याची खात्री करून घ्या. उत्पादक किंवा दुकानदारांसोबत थेट संवाद साधण्याची मुभा देणाऱ्या शॉपिंग साइट्सना प्राधान्य द्या, असं ऑनलाइन शॉपिंग एक्स्पर्ट सांगतात. शॉपिंग करताना कस्टमर रिव्ह्यू, ई-मेज आणि व्हिडीओजची मदत घ्या.

(काजोलनं शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केला शेअर, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव)

​कापड तपासून घ्या

करोनाचा संसर्ग रोखण्याकरीता गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन खरेदीचा पर्याय उत्तम असला तरीही कोणतीही वस्तू विकत घेण्याआधी काही ठरावीक गोष्टींची खातरजमा करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणत्या पद्धतीचा पेहराव करायचा आहे त्यानुसार शॉपिंग करा. ऐनवेळी हिरमोड होण्यापेक्षा कपड्यांचे माप, कापडाचा प्रकार, रंग याची पूर्ण माहिती घ्या. ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडण्याआधी सर्व शॉपिंग साइट्स तपासून बघा मगच खरेदी करा, असं फॅशन डिझायनर सांगतात.

(सारा अली खानने परिधान केला होता ‘हा’ वजनदार लेहंगा, नेटकऱ्यांनी म्हटलं…)

​ऑनलाइन सेलची होईल मदत…

लग्न म्हणजे बजेट आलंच. ऑनलाइन साइट्सवर दुकानांप्रमाणे बोलून किंमत कमी करता येत नाही. पण, स्वस्त आणि मस्त कपडे खरेदी करायचे असतील तर ऑनलाइन सेलची नक्कीच मदत करतील. सध्या लग्नसराई असल्याकारणानं अनेक डिझायनर्स आणि शॉपिंग साइट्सवर आकर्षक ऑफर्स चालू आहेत, त्याचा शक्य तितका लाभ घ्या. सेलमध्ये तुमच्या पसंतीचे कपडे डिस्काऊंट किंमतीत खरेदी करू शकतात. यासोबतच एकाच शॉपिंग साइटवरून भरपूर कपडे खरेदी केल्यानंतर भरघोस डिस्काउंटही मिळू शकतात. महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या कूपन आणि व्हाऊचर मधून उर्वरित खरेदी करा. ऑनलाइन शॉपिंग करताना कायम जाणकार व्यक्तीला सोबत ठेवा.

(दीपिका पादुकोणच्या स्टाइलवर भारी पडली २ मुलांची आई असलेल्या शिल्पा शेट्टीची ‘ही’ फॅशन)

​हे लक्षात ठेवा…

  • वस्तू विकत घेतल्यानंतर घरी येईपर्यंत त्याची नोंद ठेवा.
  • लग्नाच्या दिवशी व्यवस्थितपणे पेहराव करता येईल या हिशोबाने खरेदी करा.
  • वस्तू घरी आल्यानंतर त्या सॅनिटाइज करायला विसरू नका.
  • चप्पल घेताना योग्य आणि अचूक साइज निवडावी.
  • लग्नाच्या खरेदीसाठी अधिकृत वेबसाइटची निवड करा.
  • गरजेपेक्षा जास्त ऑफर्स आणि डिस्कउंटच्या मोहात पडू नका.
  • कपडे भाडेतत्त्वावर घेत असाल तर रिटर्न पॉलिसी तपासून घ्या.
  • दागदागिन्यांची खरेदी आणि व्यवहार काळजीपूर्वक करा.

संकलन- तेजल निकाळजे, साठये कॉलेज

(कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अनन्या पांडेनं परिधान केले इतके स्वस्त कपडे, पाहा फोटो)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *