लग्नासाठी लेहंगा, साडी खरेदी करण्यावरून आहे गोंधळ? मग हे नक्की वाचा

Spread the love

आपल्यापैकी बहुतांश जण प्रत्येक वर्षातील शेवटच्या तीन महिन्यांची अगदी आतुरतेनं वाट पाहत असतात. कारण वर्षभरामध्ये या तीन महिन्यांत सर्वांत जास्त सण-उत्सव तसंच विवाहसोहळे यासारख्या कौटुंबिक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. तर नवरात्रौत्सव, दिवाळीसारख्या सणांमुळे हे महिने महिलांसाठी खास असतात. कारण त्यांना नटण्याची हौस पूर्ण करण्याची संधी मिळते.

यादरम्यान काही घरांमध्ये लग्नकार्याची तयारी सुरू असते. तर काही ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे किंवा करू नये, या विषयावर जोरदार चर्चा सुरू असते. अशातच विवाहसोहळ्यांमध्ये नववधू सर्वांत जास्त टेन्शनमध्ये असते. मेहंदीचा कार्यक्रम, लग्नसोहळ्यापासून ते रिसेप्शनसाठी कोणत्या प्रकारचा पोषाख (Bridal Lehenga) निवडावा? लग्नाची तारीख ठरल्यापासून याच चिंतेत ती अधिक असते. तसं पाहायला गेलं तर इंटरनेटच्या युगामध्ये सर्वकाही एका क्लिकवर उपलब्ध आहे.

​हटके लुक हवाय?

पण स्वतःच्याच लग्नामध्ये हटके वेशभूषा कशी परिधान करावी? यासाठी स्वतःलाच विचार करावा लागतो. मेहंदीच्या दिवशी हिरवे कपडे, संगीतसाठी पिवळे आणि लग्नासाठी लाल रंगाचेच आउटफिट परिधान करावे का? तुम्ही देखील याच विचारामुळे गोंधळात आहात का? तर चिंता करू नका. लग्नासाठी परफेक्ट पोषाखाची निवड कशी करावी? यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

(नीता अंबानींनी सूनेसाठी डिझाइन केला होता खास लेहंगा, पाहा फोटो)

​ईशा अंबानीचा डिझाइनर लेहंगा

देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कन्या ईशा अंबानी – पीरामल (Isha Ambani) हिचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. लग्नसोहळे किंवा एखाद्या पार्टीमध्ये ईशाचे एकापेक्षा एक डिझाइन लेहंगे आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही देखील स्वतःच्या लग्नासाठी हटके डिझाइनर आउटफिटची निवड करण्याचा विचार करताय का? तर मग ईशा अंबानीनं घातलेल्या या गुलाबी रंगाच्या लेहंगाचे डिझाइन तुम्ही फॉलो करू शकता. तसेही सध्या लग्नामध्ये लाल रंगाचा पोषाख परिधान करण्याचा ट्रेंड कमी कमी होत आहे. आता नववधु कॉन्ट्रास्ट शेडमधील कपड्यांना पसंती दर्शवत आहेत.

​गुलाबी रंगाचा लेहंगा

तुम्ही सुद्धा लाल, पिवळ्या रंगाचे त्याच- त्याच डिझाइनचे कपडे घालण्याऐवजी गुलाबी रंगाच्या लेहंग्याची निवड करू शकता. ईशा अंबानीने भाऊ आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या ‘प्री-एंगेजमेंट’ कार्यक्रमात आपल्या आवडीचा गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. अबू जानी संदीप खोसला यांनी हा लेहंगा डिझाइन केला होता. ज्यामध्ये हाफ स्लीव्ह असलेले ब्लाउज आणि मॅचिंग दुपट्टा असे कॉम्बिनेशन होतं. तसंच यावर धाग्यांच्या मदतीने बारीक नक्षीकाम देखील करण्यात आले होते.

(नीता अंबानींनी लाडक्या सूनेला लग्नामध्ये दिलं होतं जगातलं सर्वात महागडं गिफ्ट)

​मॅचिंग दागिने

याव्यतिरिक्त या डिझाइनर लेहंग्यावर Bugle Beads आणि क्रिस्टल एम्ब्रोयडरी देखील होती. ज्यामुळे या लेहंग्याला एक वेगळा लुक मिळाला होता. अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या या लेहंग्यावर ईशा अंबानीने सुंदर दागिने मॅच केले होते. यामध्ये झुमर झुमके, मांगटिका, बांगड्या आणि गळ्यामध्ये चोकरसह एक हार देखील परिधान केला होता. लेहंग्याच्या ओढणीला आकर्षक लुक देण्यासाठी ईशाने कमरेमध्ये एक डायमंड साखळी देखील घातली होती.

(बिग बींच्या लेकीनं २२ वर्षांपूर्वी परिधान केला होता हा खास लेहंगा, पाहा फोटो)

​मेक अप कसा करावा?

कमीत कमी मेकअप, डोळ्यांचा मेकअप आणि न्यूड लिपस्टिक असा ईशा अंबानीचा लुक होता. हेअर स्टाइल म्हणून तिनं आपले केस मोकळे सोडले होते. जर तुम्हाला ईशा अंबानीचा हा लुक आवडला असल्यास अशा प्रकारच्या पोषाखाची तुम्ही निवड करू शकता.

(पूजेसाठी नीता अंबानी लाल रंगाचेच कपडे करतात परिधान, यामागे काय आहे कारण?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *