लग्नासाठी हवाय आकर्षक लुक? जाणून घ्या काजल अग्रवालचे डाएट आणि फिटनेस सीक्रेट

Spread the love

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा क्षण अतिशय महत्त्वाचा असतो. लग्नाच्या दिवशी आपण सुंदर आणि हटके दिसावं, अशी प्रत्येक नववधूची इच्छा असते. यासाठी कित्येक महिन्यांआधीपासूनच डाएट प्लान, फिटनेस प्लान इत्यादी गोष्टींशी संबंधित तयार देखील सुरू केली जाते. पण अपवादात्मक स्थितीमध्ये काही तरुणींना जिममध्ये जाऊन वर्कआउट करणं शक्य होत नाही. यामुळे बहुतेक मुली ब्रायडल लुकबाबत चिंतेत असतात. खरंतर यामध्ये ताण घेण्यासारखं कोणतीही गोष्ट नाहीय. घरच्या घरी सोप्या आसनांचाही तुम्ही सराव करू शकता. लग्नामध्ये स्लिम दिसण्याऐवजी निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे. सोबतच त्वचेची देखभाल करण्यासाठी नैसर्गिक उपचारांची मदत घ्यावी.

साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्धी अभिनेत्री काजल अग्रवालने देखील ३० ऑक्टोबर रोजी उद्योगपती गौतम किचलूसोबत लग्नगाठ बांधली. काजल इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तुम्ही देखील लवकरच लग्न करणार आहात का? तर मग अभिनेत्री काजल अग्रवालकडून जाणून घ्या नितळ त्वचा आणि फिटनेसशी संबंधित काही टिप्स…
(रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे सेवन का करावे? आरोग्यदायी लाभ माहीत आहेत का, जाणून घ्या)

​पौष्टिक आणि नैसर्गिक पदार्थांचे सेवन

निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी नैसर्गिक गोष्टींवर अधिक विश्वास असल्याची माहिती काजलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होती. फिटनेससाठी ती फळे, दही आणि पालेभाज्यांचा सेवन जास्त प्रमाणात करते. काजलच्या म्हणण्यानुसार चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यासाठी फळांचा रस, नारळ पाणी आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. याद्वारे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त काजल अक्रोड, प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करते.

(Health Care करीना कपूरची न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरकडून जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे)

​जेवणापूर्वी एक वाटी सॅलेड

जेवणापूर्वी नियमित एक वाटी सॅलेड खाणे आरोग्यासाठी चांगले असते, असे काजलचे म्हणणं आहे. सॅलेडमध्ये हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या भाज्या किंवा फळांचा समावेश करावा. उदाहरणार्थ गाजर, सफरचंद, काकडी, टोमॅटो आणि अ‍ॅव्होकाडो इत्यादी. सॅलेड खाल्ल्याने भूक कमी प्रमाणात लागते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. आरोग्य निरोगी (Health Care Tips) राहण्यासाठी काजल नियमित दही आणि पनीरचे सेवन करते.

(सब्जाचे सेवन करण्याची योग्य वेळ आणि पद्धत, जाणून घ्या सविस्तर माहिती)

​नियमित वर्कआउट

नियमित एकच एक्सरसाइज करण्याऐवजी काजल वेगवेगळे एक्सरसाइज करते. काजल फिटनेससाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग आणि फ्रीहँड एक्सरसाइजसह डान्स देखील करते. नियमित ३० ते ४५ मिनिटे ट्रेनरच्या देखरेखी अंतर्गत सुद्धा व्यायाम करण्यावर भर देते. याव्यतिरिक्त तिला योगासनांचा सराव करणं देखील पसंत आहे. काजल आपल्या शरीरासाठी सूर्यनमस्काराचा व्यायाम सर्वोत्तम असल्याचे मानते. काजलच्या सल्ल्यानुसार, शारीरिक तणाव दूर करण्यासाठी नववधूने लग्नाच्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी योगासनांचा सराव करण्यास सुरुवात करावी.

(हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशा पद्धतीने घ्यावी स्वतःची काळजी, जाणून घ्या माहिती)

काजल अग्रवालचा फिटनेसमंत्रा

​नारळाच्या तेलाचा वापर

आपल्या केसांची तसंच शरीराची देखभाल करण्यासाठी काजल नारळाच्या तेलाचा उपयोग करते. नारळाच्या तेलाने मसाज केल्यास केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. याव्यतिरिक्त पोटावर देखील नारळाच्या तेलाने मसाज केल्यास त्वचेवर जमा झालेली दुर्गंध दूर होण्यास मदत मिळते. तसंच शरीरातील अनावश्यक घटक देखील बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.

(चालण्याचा व्यायाम कोणत्या वेळेस करणं आरोग्यास असते अधिक फायदेशीर? जाणून घ्या)

NOTE आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा किंवा करू नये, याबाबत आपल्या आहारतज्ज्ञांचा तसंच ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे डाएट प्लान किंवा वर्कआउट प्लान फॉलो करण्याची चूक देखील करू नये.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *