लसणाचे चटपटीत आणि खमंग लोणचे

Spread the love

How to make: लसणाचे चटपटीत आणि खमंग लोणचे

Step 1: लसणाच्या पाकळ्या सोला आणि चिरून घ्या

लसणाच्या पाकळ्या मोठ्या असल्यास त्या लहान आकारामध्ये चिरून घ्या.

Step 2: मोहरी, बडिशेप आणि मेथी दाणे भाजून घ्या

पॅनमध्ये एक चमचा मोहरी टाकून भाजून घ्या. आता त्यामध्ये बडिशेप आणि मेथीचे दाणे देखील मिक्स करा. तीन ते चार मिनिटांसाठी सर्व सामग्री फ्राय करून घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली मोहरी, बडिशेप आणि मेथीचे दाणे बारीक वाटून घ्यावेत.

लोणचे मसाला

Step 3: कढईत तेल गरम करत ठेवा

आता कढईमध्ये तिळाचे तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्याबरोबर त्यात हिंग आणि कांद्याच्या बिया मिक्स करा.

मोहरीचे तेल

Step 4: लसूण फ्राय करून घ्या

आता कढईत लसणाच्या पाकळ्या मिक्स करा आणि गॅसच्या मध्यम आचेवर सर्व सामग्री परतून घ्या. हलका सोनेरी रंग येईपर्यंत लसूण फ्राय करत राहा. आता वाटलेला मसाला सामग्रीमध्ये मिक्स करा. त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ देखील टाका. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या.

लसूण

Step 5: तयार झाले आहे लसणाचे लोणचे

दोन ते तीन मिनिटांसाठी सर्व सामग्री शिजू द्यावी. यानंतर गॅस बंद करा. वरून लिंबाचा रस आणि व्हिनेगर मिक्स करा. तयार झालंय लसणाचे चटपटीत लोणचे.

लसूण लोणचे

Step 6: लसूण लोणचे रेसिपी, पाहा संपूर्ण व्हिडीओ

घरीच तयार करा लसणाचे चटपटीत लोणचे


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *