लसणात असतात हे खास गुणधर्म, रिकाम्या पोटी सेवन केल्यास होतो ‘या’ गंभीर आजारांपासून बचाव!

Spread the love

लसूण (garlic) आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. साधारणत: भारतीय आहारात मोठ्या प्रमाणात लसणाचा वापर केला जातो. एखादी भाजी असो वा डाळ, पदार्थ रुचकर बनवण्यासाठी त्याला हमखास लसणाचा तडका दिला जातो. लसणात अनेक प्रकारची खनिजे (Minerals), व्हिॅमिन्स (vitamins) व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे (immunty booster) पोषक तत्व सामावलेले असतात. रोज लसूण खाल्ल्याने प्रकृतीमध्ये सुधारणा होते.

कित्येक गंभीर आजारांवर रामबाण उपाय म्हणून लसणाचे नाव घेतले जाते. लसूण शरीरातील टॉक्सिक (toxic) म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर फेकते आणि बल्ड प्युरिफाय (blood purifying) करण्याचं कामही अगदी चोख बजावते. तसंच लसूण खाल्ल्याने डिप्रेशनची (depression) समस्या सुद्धा दूर होते. तर मंडळी, खाली लसणाचे अनेक आरोग्यवर्धक लाभ दिलेले आहेत. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने नेमकं काय होतं जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

आयुर्वेदात लसणाला प्रचंड महत्त्व आहे. यामध्ये अनेक असे औषधी गुणधर्म असतात जे गंभीर आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात. यकृताला सूज येणे किंवा यकृताशी संबंधित कोणत्याही आजारांपासून तुम्हाला सुटका हवी असल्यास मर्यादित प्रमाणात लसूणचे सेवन करावे. काही जणांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास असतो, यावर उपाय म्हणून तुम्ही लसूण खाऊ शकता. पण समस्या गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.लसूणमुळे पोट आणि आतड्यांचे (Stomach and intestines) आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. यातील औषधी गुणधर्मामुळे पोटातील लहान आतड्यांचे नुकसान होत नाही. अँटी मायक्रोबिअल (Anti microbial) गुणधर्म लहान आतड्यांचे हानिकारक बॅक्टेरियांपासून संरक्षण करते. पण लसूणचे अति प्रमाणात सेवन केल्यास छातीत जळजळ किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

(वाचा :- ‘या’ कारणामुळेच भारतीय आहारात डाळ खिचडीला आहे अनन्यसाधारण महत्त्व!)

वजन कमी करण्यासाठी

रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. लसणात असे काही खास गुणधर्म असतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकण्यास मदत करतात. इतकंच नाही तर लसूण मेटाबॉलिज्म वाढवतं ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या दूर होते. लसणात अँटी-ओबेसिटी (Anti obesity) गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. लसणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनाशी निगडीत समस्या दूर होतात.

(वाचा :- हिवाळ्यातील ‘या’ जीवघेण्या आजारापासून राहायचं असेल लांब, तर सोडू नका या खास पदार्थांची साथ!)

ब्लड शुगर करतं कंट्रोल

लसणात एलिसिन नामक एक तत्व असते जे ब्लड शुगर नियंत्रित करण्यास लाभदायक ठरतं. जर तुमची ब्लड शुगरची पातळी वाढली असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्यासोबतच दिवसातून दोन वेळा तरी लसणाच्या पाकळ्या कच्च्या चावून खाल्ल्या पाहिजेत. कच्चे लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नैराश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसूणमध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे. एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी देखील संतुलित राहते.

(वाचा :- वेट लॉससोबतच प्रदूषित हवेपासून फुफ्फुसांचं संरक्षण करतो ‘हा’ खास चहा, घरच्या घरी कसा बनवावा?)

डिप्रेशन दूर करण्यासाठी व सुंदर त्वचेसाठी

लसूण शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं. नियमित रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्यास मेंदूतील रसायने संतुलित राहतात. यामुळे मुड रिफ्रेश राहतो व डिप्रेशनची समस्याही दूर होते. मुरुमांच्या समस्येवर लसूण खाणे अतिशय लाभदायक ठरते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. लसणातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म त्वचेसाठी पोषक ठरतात. तोंडाला येणारी दुर्गंधी देखील लसणामुळे कमी होण्यास मदत मिळते. माउथ फ्रेशनर म्हणून तुम्ही लसणचा वापर करू शकता.

(वाचा :- भोपळा आवडत नाही? मग भोपळ्याचे ‘हे’ सौंदर्यवर्धक व आरोग्यदायी लाभ जाणून घ्याच!)

कॅन्सर व हायपरटेन्शन रामबाण

लसणात अ‍ॅंटीइन्फ्लामेट्री, अ‍ॅंटीबायोटीक आणि अ‍ॅंटीकार्सिनोजेनिक हे गुणधर्म आढळतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. लसणात अ‍ॅंटीऑक्सिडंड असतं जे अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून शरीराची सुरक्षा करतं. तसंच लसणाच्या सेवनाने हायपरटेन्शनही दूर होतं. रोज सकाळी लसणाच्या कच्च्या पाकळ्या चावून खाल्ल्याने वरील दोन्ही समस्या सुटतात.

(वाचा :- kareena kapoor : ‘हे’ आहे करीना कपूरच्या हॉट फिगर व स्लिम बॉडीचं सिक्रेट!)

संक्रमणाशी लढा देण्यासाठी

लसणाला नैसर्गिक अ‍ॅंटीबायोटिक मानलं जातं. लसणामुळे शरीराची कार्य करण्याची क्षमता वाढते. हे चिरंतर काळासाठी संक्रमणाशी लढा देतं ज्यामुळे आजारांपासून शरीर सुरक्षित राहतं. लसूण औषधी गुणधर्म व पोषक तत्वांनी परिपूर्ण असतं. त्यामुळे डिप्रेशन, संक्रमण, कॅन्सर यासारख्या आजारांसोबतच इतरही गंभीर आजारापासून ते शरीराचा बचाव करतं.

(वाचा :- weight loss : झटपट वजन कमी करायचं आहे? मग जाणून घ्या आयुर्वेदातील ‘ही’ ५ सिक्रेट्स!)

सुरकुत्या आणि स्ट्रेच मार्क्स

जस जसं वय वाढत जातं तस तसं चेह-यावर सुरुकुत्या दिसण्याचं प्रमाणंही वाढतं. पण काही जणांच्या चेहऱ्यावर खूप कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे, सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास होऊ शकतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये लसणाचा समावेश केल्यास सुरकुत्यांपासून तुमची सुटका होऊ शकते. गर्भावस्थेत, डिलिव्हरीनंतर किंवा वाढत्या वयोमानानुसार महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. यापासून सुटका हवी असल्यास तुम्ही लसणाची मदत घेऊ शकता.

Note : आहारामध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

(वाचा :- वयाच्या तिशीनंतर देखील राहायचं असेल फिट तर ‘या’ पदार्थांपासून ठेवा चार हाताचं अंतर!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *