लसूण व लाल मिरचीची चटणी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Spread the love

How to make: लसूण व लाल मिरचीची चटणी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Step 1: आले आणि मिरच्या चिरून घ्या

सर्व प्रथम १५० ग्रॅम आले चिरून बाजूला ठेवून द्या. आता पाच मोठ्या लाल मिरच्याही चिरून घ्या.

Step 2: तेलामध्ये आले आणि लसूण परतून घ्या

एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे परतून घ्या. आता पॅनमध्ये आल्याचे काप आणि लसणाच्या १२ ते १४ पाकळ्या देखील टाका. सर्व सामग्री नीट फ्राय करून घ्यावी.

आले लसूण

Step 3: लाल मिरच्याही फ्राय करा

लसणाच्या पाकळ्यांना सोनेरी- चॉकलेटी रंग आल्यानंतर पॅनमध्ये लाल मिरच्या घाला आणि तीन मिनिटांसाठी सामग्री शिजू द्यावी. आता त्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाका. सर्व सामग्री ढवळून घ्या.

लाल मिरची आणि लसूण

Step 4: सामग्री मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या

सर्व सामग्री शिजल्यानंतर गॅस बंद करा. सामग्री थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट वाटून घ्या. तयार झालेली लसणाची चटणी एका बाउलमध्ये काढा. त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करावा, म्हणजे चटणी खराब होणार नाही.

लसूण चटणी

Step 5: लसूण चटणी रेसिपीसाठी पाहा व्हिडीओ

लसणाच्या झणझणीत चटणीचा पोळी, भात किंवा रोटीसोबत आस्वाद घ्या.

झणझणीत लसूण चटणी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *