लहान मुलांना अशा पद्धतीने खाऊ घाला खजूर, मिळतील दुप्पट लाभ!

Spread the love

खजूरातील पोषक तत्वे

खजूर मध्ये पोषण तत्वे मोठ्या प्रमाणावर आढळतात. बाळाला ठोस आहार देण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही प्युरीच्या रुपात त्याला खजूर भरवू शकता. यात कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, मेग्नेशियम, पोटेशियम, आणि झिंक हे घटक सर्वाधिक प्रमाणात असतात. याशिवाय राइबोफ्लेविन, नाइनिस, फॉलिक एसिड, व्हिटॅमिन ‘ए’, बी6 आणि व्हिटॅमिन ‘क’ देखील असते. याशिवाय खजूर हे शुगर आणि फायबरचा एक चांगला स्त्रोत मानले जाते. यात फ्रूक्‍टोज आणि डेक्‍सट्रोज नावाच्या सिंपल शुगर असतात, ज्यामुळे त्वरित उर्जा मिळते. हे तत्व गर्भातील बाळासाठी महत्त्वाचे असून ब्रेस्ट मिल्क वाढवण्यात योगदान देते.

(वाचा :- असं करा ओव्याच्या पुरचुंडीने ० ते ५ वर्षांच्या मुलांचं सर्दी-पडसं दूर!)

बाळाला कधी खजूर भरवावे?

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईच्या दुधाशिवाय अन्य काहीच देऊ नये, तब्बल सहा महिने बाळाचा विकास हा आईच्याच दुधावर होत असतो. या काळात बाळाला ठोस आहार भरवत नाहीत कारण या वयात बाळाचे पचनतंत्र मजबूत नसते. त्याला आईच्या दुधाशिवाय अन्य आहार पचू शकत नाही. त्यामुळे तुम्ही बाळाला सहा महिन्यांनंतरच खजूर भरवू शकता. बाळाच्या आहारात खजूराचा हळूहळू समावेश करावा. बाळाला कोणतीही नवीन गोष्ट खाऊ दिल्यावर तीन दिवस वाट पहावी. जर त्याच्या शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नसेल तर तुम्ही तो पदार्थ त्याला खाऊ घालणे सुरु ठेवू शकता. हि गोष्ट खजूरला सुद्धा लागू होते.

(वाचा :- मुलांना अशाप्रकारे खाऊ घाला बीटरूट, कधीच भासणार नाही रक्ताची कमी!)

खजूराचे बाळाला मिळणारे फायदे

खजूर मधील पोटॅशियम हे मेंदूच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. खजूर हे पोटातील किडे सुद्धा साफ करते. याशिवाय खजूर हे लिवरसाठी सुद्धा अत्यंत निरोगी मानले जाते. लहान मुलांना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असतो आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या लिवर वर पडू शकतो. काही मुलांना अॅसिडीटी आणि अल्सरची समस्या सतावू शकते. खजूरात असे गुण असतात जे या दोन्ही समस्यांना कमी करू शकतात. जेव्हा बाळाचे दात येत असतात तेव्हा त्याला अवश्य खजूर भरवावे. हे हिरड्यांना मजबूत करते आणि दात वेगाने वाढण्यास मदत होते.

(वाचा :- करोना व वायू प्रदुषणापासून मुलांना सुरक्षित ठेवायचं असल्यास अशी वाढवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती!)

एका दिवसात किती खजूर भरवावे?

सुरुवातीला कोणत्याही फळासोबत बाळाला केवळ एकच खजूर भरवावा. तुम्ही खजूराला अन्य फळांसोबत मॅश करून स्टीम करून भरवू शकता. सहसा बाळाचा ठोस आहार सुरु झाल्यास त्याला एकच खजूर भरवावा आणि मग हळूहळू त्याला दिवसातून दोन किंवा तीन खजूर खायला द्यावेत. तुम्ही बाळाच्या डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेऊ शकता. त्यांच्या सल्ल्यानुसार बाळाला किती खजूर भरवावे ते ठरू शकता. बाळाच्या शारीरिक स्थितीनुसार बाळाचे डॉक्टर याबाबतीत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात.

(वाचा :- बाळाच्या हाडे व स्नायूंना द्यायची असेल बळकटी तर अशी करा खास मालिश!)

खजूर कसे भरवावे?

खजूर हे एक जाड फळ आहे. जे लहान बाळाला थेट भरवता येत नाही. त्यामुळे बाळाला खजूर हे मॅश वा स्टीम करूनच खायला द्यावे. खजूर हे पाण्यात उकळवून वगैरे नंतर बाळाला भरवू नयेत कारण यामुळे त्यातील पोषण तत्वे संपुष्टात येण्याची शक्यता असते. त्यापेक्षा दुधातून बाळाला खजूर खाऊ घालू शकता. तर मंडळी या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी अवश्य त्याला खजूर भरवा आणि बाळाला धष्टपुष्ट व निरोगी बनवा.

(वाचा :-मुलांना सतत लघुशंका होणं असू शकतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, काय काळजी घ्यावी?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *