लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवण भरवल्याने ‘या’ गंभीर आजारांपासून मिळते सुरक्षा!

Spread the love

चांदीच्या भांड्यांचे महत्त्व

चांदी हा एक असा धातू आहे जो बाळासाठी अतिशय सुरक्षित मनाला जातो. याच कारणामुळे बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर व आईचे दूध सोडून तो ठोस आहाराकडे वळल्यावर हा आहार त्याला चांदीच्या भांड्यातूनच देण्याचा सल्ला घरातील वडीलधारी मंडळी देतात. कारण चांदीमध्ये असे काही विशिष्ट गुण आणि तत्व असतात जे आहारासोबत बाळाच्या शरीरात जाऊन बाळाच्या शारीरिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतात. चला जाणून घेऊया की चांदीच्या भांड्यातून भोजन करण्याची प्रथा पाळली जाते.

(वाचा :- लहान मुलांना अशा पद्धतीने खाऊ घाला खजूर, मिळतील दुप्पट लाभ!)

केमिकल फ्री चांदी

तुम्ही जेवढी पण भांडी वापरता ती बीपीए फ्री असणे गरजेचे आहे. प्लास्टिक जास्त काळ टिकून राहावे म्हणून त्यात बीपीए नावाचे तत्व मिसळले जाते. जेव्हा आपण प्लास्टिकच्या भांड्यातून भोजन करतो तेव्हा हे बीपीए तत्व आपल्या आहारासोबत आपल्या पोटात जाते. बीपीए हे अतिघातक तत्व नसले तरी त्यामुळे अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळते. शरीरात बीपीएची मात्रा वाढल्यास हार्मोनल असंतुलन, वजन वाढणे, आणि पुढे जाऊन कर्करोगाचा धोका सुद्धा निर्माण होतो. चांदीची भांडी निर्माण करताना मात्र त्यात कोणत्याही प्रकारचे असे घातक तत्व मिसळले जात नाही आणि म्हणूनच चांदीच्या भांड्यातून भोजन करण्याचा सल्ला दिला जातो.

(वाचा :- असं करा ओव्याच्या पुरचुंडीने ० ते ५ वर्षांच्या मुलांचं सर्दी-पडसं दूर!)

आहाराची गुणवत्ता वाढते

प्लास्टिक किंवा अन्य कोणत्याही धातूंच्या भांड्यात अन्नपदार्थ ठेवले तर त्यातील घातक तत्व काळानुसार त्या आहारात मिसळले जातात. जर तुम्ही जास्त वेळ बेबी फूड साठवून ठेवू पाहत असाल तर ते सहसा चांदीच्या भांड्यातच ठेवावे. कारण चांदीच्या भांड्यात विषाणू आणि जंतू नष्ट करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे अन्नपदार्थ खराब सुद्धा होत नाहीत. म्हणूनच अनेक घरात जास्त वेळ जेवण ताजे राहावे म्हणून ते चांदीच्या भांड्यातच ठेवले जाते. चांदीच्या भांड्यात ठेवलेले पाणी आपली तहान सुद्धा लवकर भागवते आणि या पाण्याला एक वेगळी चव सुद्धा असते.

(वाचा :- मुलांना अशाप्रकारे खाऊ घाला बीटरूट, कधीच भासणार नाही रक्ताची कमी!)

जंतूमुक्त गुणधर्म

चांदीचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे यावर कोणतेही जीव जंतू जिवंत राहत नाहीत. चांदी हे विषाणूची वाढ होऊ देत नाही आणि वेळीच ती वाढ रोखते. हेच कारण आहे की चांदीला औषधी सुद्धा मानले जाते. चांदी हा धातू सहजपणे दुषित होत नाही म्हणून चांदीच्या चमच्यातून वा पळीतून बाळाला औषधे देखील पाजली जातात. तुम्ही बाळाच्या खाण्यापिण्यात जेवढा जास्त चांदीचा वापर कराल तेवढा बाळाला त्याचा फायदा होईल व बाळ स्वस्थ राहील.

(वाचा :- करोना व वायू प्रदुषणापासून मुलांना सुरक्षित ठेवायचं असल्यास अशी वाढवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती!)

चांदी विषारी नाही

प्राचीन काळापासून सांगण्यात येत आहे की चांदी हा धातू बाळासाठी अजिबात विषारी नाही. यामुळे बाळात पुढे जाऊन प्रजनन तंत्र आणि नसां संबंधित कोणतेच आजार उद्भवत नाही. इतर धातू वा प्लास्टिक मध्ये असणारे घटक तत्व शरीराला नुकसा पोहचवू शकतात. म्हणून शक्य झाल्यास बाळाला चांदीच्या भांडयातूनच आहार भरवावा. हि माहिती सामान्य पालकांना माहित नसते. त्यामुळे हा लेख जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या ओळखीतल्या पालकांना याबद्दल माहिती द्या, जेणेकरून त्याचे बाळ सुद्धा निरोगी आणि सुरक्षितपणे मोठे होईल.

(वाचा :- बाळाच्या हाडे व स्नायूंना द्यायची असेल बळकटी तर अशी करा खास मालिश!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *