लहान मुलांसाठी अशा पद्धतीने बनवा ओट्सची चविष्ट आणि पौष्टिक खिचडी!

Spread the love

बाळ गर्भात असल्यापासून ते १ वर्षाचं होईपर्यंत आई-वडिलांना सर्वात जास्त सतावणारी गोष्ट कोणती असेल तर ती असते आहार! हो, प्रत्येक आई-वडिलांना वाटतं आपलं बाळ सुदृढ आणि निरोगी व्हावं, त्याचं भविष्य कोणत्याही आरोग्याच्या तक्रारींविना आनंदात जावं आणि यासाठी सर्वात आवश्यक काय असेल तर त्याच्या शरीराला बालपणापासून झालेला पोषक तत्वांचा पुरवठा! आता हा पुरवठा कसा करावा किंवा कोणते पदार्थ खाऊ घातल्यास बाळाचे आरोग्य सुस्थितीत राहिल याविषयी नवख्या आईला जास्त काही माहिती नसते. त्यामुळे अशा कित्येक मातोश्री असतात ज्यांना आपल्या बाळाला हेल्दी काहीतरी बनवून खायला घालायचं असतं म्हणून त्या सर्वत्र अशा रेसिपींच्या शोधात असतात.

तुम्हीही अशाच कोणत्या शोधात असाल तर मैत्रीणींनो आज आम्ही आपल्याला ओट्स सारख्या पौष्टिक आणि सात्विक पदार्थांपासून बनणा-या खिचडीची रेसिपी सांगणार आहोत. ओट्स आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असतात. बाळाच्या आरोग्यासोबतच आपले ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी देखील तुम्ही दररोज आपल्या नाश्त्यात ओट्सचा समावेश करु शकता. ओट्समध्ये फायबरची मात्रा अधिक प्रमाणात असून त्यातून भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते. ओटमीलचा नाश्ता बनवणं फारच सोपं असल्यामुळे तुम्ही दररोज तो बनवू शकता. तसेच ओट्समध्ये कार्बोहायडेट्स आणि फोलिक अ‍ॅसिडदेखील असते. ओट्स ताणतणावापासूनही दूर ठेवतात जेणेकरुन बाळाला रिफ्रेश वाटू लागतं.

ओट्स कसे बनतात?

सामग्री – एक चमचा गाजर, एक चमचा टॉमेटो, एक चमचा शिमला मिरची, एक चमचा कांदा, १/४ चमचा बारीक केलेले लसूण, १/४ जीरे, १/४ चमचे किंवा पाच मोठे चमचे ओट्स, अर्धा लीटर पाणी, दोन चिमटी गरम मसाला, १/४ चमचे हळद आणि १/४ चमचे मीठ.

(वाचा :- अशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी!)

ओट्सची खिचडी बनवण्याची पद्धत

  1. गॅसवर कुकर ठेवा आणि तो गरम होताच त्यात एक चमचा साजूक तूप घाला.
  2. आता त्या तूपात जीरे आणि बारीक केलेला लसूण घाला. हे मिश्रण ३० ते ४० सेकंद चांगले परतून घ्या.
  3. त्यात सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालून पुन्हा मिश्रण दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या.
  4. भाज्या चांगल्या शिजल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला टाका.
  5. सर्व सामग्री एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घाला व एक उकळी फुटू द्या.
  6. पाण्याला उकळी फुटल्यावर त्यामध्ये ओट्स घाला.
  7. कुकरचे झाकण लावून मंद आचेवर त्याला एक शिट्टी मारुन घ्या.
  8. शिट्टी झाल्यानंतर खिचडी बाहेर काढून थंड करा.
  9. थंड झाल्यानंतर खिचडी बाळाला खाऊ घाला.

(वाचा :- १ वर्षाच्या बाळासाठी असे बनवा पौष्टिक ड्राय फ्रुट लाडू, प्रेग्नेंट महिलाही करु शकतात याचं सेवन!)

कोणत्या वयातील मुलांना ही खिचडी भरवावी?

आम्ही इथे ज्या ओट्सच्या खिचडीची रेसिपी सांगितली आहे ती १२ महिने किंवा त्यापेक्षा जास्त वय असणा-या मुलांसाठी आहे. जेव्हा तुमचं बाळ १ वर्षाचं होईल तेव्हा त्याला तुम्ही ही स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी खिचडी खाऊ घालू शकता.

(वाचा :- बाजारातील महागड्या सेरेलॅकपेक्षा जाणून घ्या घरच्या घरी स्वस्त व मस्त सेरेलॅक बनवण्याची रेसिपी!)

मुलांना ओट्स खाऊ घालण्याचे फायदे

ओट्स हे एक प्रकारचं धान्य असतं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, डायट्री फायबर, व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ असतात. तसंच ओट्सच्या खिचडीमधून बाळाला कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील मिळतं जे बाळाची हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं.

(वाचा :- बाळाला कधी, कोणत्या स्वरुपात व कोणत्या वयात हळदीचे पदार्थ खाऊ घालावेत?)

ओट्स खाल्ल्याने काय होतं?

ओट्स लोह या गुणधर्माने परिपूर्ण असतं त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन अर्थात रक्त वाढवण्यासाठी ते उपयुक्त असतं. यामध्ये असलेले मॅग्नेशियम शरीराला उर्जा प्रदान करतात. सोबतच ओट्स हाडांच्या आणि दातांच्या आरोग्याच्या मजबूतीसाठी मदत करतात. पोटॅशियम आणि सोडियम शरीरातील इलेक्ट्रोलाईटच्या मात्रेस संतुलित ठेवतात. ओट्समध्ये झिंक देखील असतं जे बाळाच्या मेंदूसाठी खूपच लाभदायक मानलं जातं. ओट्स थायमिन, नाईसिन आणि व्हिटॅमिन ‘ई’ सारख्या गुणधर्मांनी युक्त असतं. यामध्ये उच्च मात्रेत फायबर देखील आढळते.

(वाचा :- १ वर्षाच्या बाळाला द्या ‘हा’ पोषक आहार, आरोग्यास होतील लाभच लाभ!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *