लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट करायचीय? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

Spread the love

– डॉ. पराग सहस्रबुद्धे, प्लास्टिक सर्जन, पुणे
आपल्या चेहऱ्यावरील, हातावरील, पायावरील अनावश्यक केसांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी लेझर हेअर रिमूव्हल हा उत्तम पर्याय आहे. वारंवार शेव्हिंग, वॅक्सिंग, थ्रेडिंग करून त्वचा खराब होते.तसंच त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. लेझर हेअर रिमूव्हलमुळे आपण कायमस्वरूपी अनावश्यक केस काढू शकतो आणि तेही वेदनाविरहित. याबाबत डॉक्टरांनी दिलेली माहिती जाणून घ्या…

रेडिएशनचा संपर्क येतो का?
लेझर हेअर रिमूव्हलच्या उपकरणातून रेडिएशन बाहेर येऊ दिले जात नाहीत. त्यामुळे ही प्रक्रिया रुग्णाला हानिकारक नाही.
(Hair Care महिलांनो हिवाळ्यात केसांशी संबंधित या चुका अजिबात करू नका, अन्यथा होईल पश्चाताप)

​एकाच सेशनमध्ये कायमस्वरूपी केस काढता येतात का?

हा गैरसमज आहे. एका सेटिंगमध्ये केस काढून टाकण्याच्या सेशनद्वारे (सत्र) केसांच्या सर्व वाढीपासून मुक्त होणे अशक्य आहे. केस विविध चक्रांमध्ये आणि वेगवेगळ्या वेळी वाढतात. त्यामुळे आपण लेझर हेअर रिमूव्हल उपचार केसांवर करतो तेव्हा तेथील सर्व केस नष्ट होत नाहीत. प्रत्येक केसाच्या वाढण्याची गती वेगळी आहे. लेझर हेअर रिमूव्हल उपचारांचा सर्वोत्तम परिणाम अनेक सेशननंतर दिसून येतो. केसांची लक्षणीय वाढ कमी होण्यासाठी सुमारे सहा ते आठ सेशनची शिफारस केली जाते. केसांचा प्रकार आणि आनुवंशिक घटकांवरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. काही जणांना प्रारंभिक उपचारांच्या पलीकडे अतिरिक्त उपचारांचीही आवश्यकता असू शकते. दोन ते तीन सत्रानंतर आपण उपचार केलेल्या क्षेत्रात वाढणाऱ्या केसांच्या संख्येत घट झाल्याचे लक्षात येईल.

​उपचारांमुळे त्वचा जळते का?

लेझर हेअर रिमूव्हल यंत्रणेतील प्रगतीमुळे डॉक्टरला योग्य त्या उपचारपद्धतीचा वापर करतात. त्यामुळे गडद त्वचा असलेल्या व्यक्तींनादेखील हानी पोहोचत नाही. योग्य प्रकारचे लेझर वापरून आणि योग्य त्या लेझर एनर्जीचा वापर करून त्वचा जळणे वगैरे प्रकार टाळता येतात.

(केसगळती रोखण्यासाठी लाभदायक आहे ही आयुर्वेदिक औषधी पावडर, केवळ २ चमचे करा वापर)

​उपचार वेदनादायक आहेत का?

ज्यांची त्वचा अधिक संवेदननशील असते, अशा रुग्णांना केस काढून टाकण्याच्या उपचारांमध्ये थोड्या प्रमाणात वेदना होऊ शकतात किंवा अस्वस्थता वाटू शकते. काहींना उष्णतादेखील जाणवते. मात्र, असह्य वेदना होत नाहीत. बहुतेक रुग्ण असे सांगतात, की लेझर हेअर रिमूव्हल वॅक्सिंगपेक्षा अत्यंत कमी वेदनादायक आहे.

(अनुष्का शर्माच्या सौंदर्याचं सीक्रेट, फॉलो करतेय ‘या’ स्किन केअर टिप्स)

​केस कायमस्वरूपी काढून टाकण्याची हमी

  • काही सेशननंतर केसांच्या वाढीत लक्षणीय घट होत असल्याचे जाणवते. लेझरद्वारे केस काढून टाकण्याच्या उपचारांच्या यशाशी संबंधित बरेच घटक आहेत. उदा. केसांचा प्रकार, रुंदी, जाडी आणि रंग, लेझरचा प्रकार, लेझरमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण, लेझर ट्रीटमेंट प्रॅक्टिशनरचे कौशल्य इत्यादी. चांगल्या प्रतीचा लेझर वापरला नाही, तर केस परत वाढू शकतात.
  • काही रुग्णांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे जास्त प्रमाणात उपचाराची आवश्यकता असते. त्यामुळे लेझरद्वारे केस काढून टाकण्याच्या उपचारात संपूर्ण केस काढून टाकण्याची हमी देता येत नाही; परंतु केसांची वाढ कमी करणे आणि केस कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी हा एक प्रभावी उपचार आहे.
  • लेझरद्वारे केसांची संख्या ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे वर्षातून एकदा लेझर उपचार केले, तरी पुरेसे ठरते.

​वॅक्सिंगच्या तुलनेत लेझर उपचार महाग आहेत का?

वॅक्सिंगसाठी प्रतिसत्राचा खर्च कमी आहे. मात्र, ते सारखे करत राहवे लागते. याउलट लेझरद्वारे केस कायमचे नष्ट होतात. वॅक्सिंगसारख्या तात्पुरत्या उपायाच्या किमतीच्या तुलनेत कायमस्वरूपी असलेल्या लेझर हेअर रिमूव्हल उपचारांमध्ये गुंतवणूक कमी आहे. उपचार सत्रांसाठी पार्लरमध्ये केलेल्या ट्रिपची संख्या आणि वॅक्सिंग व थ्रेडिंगसारख्या पारंपरिक पद्धतींमध्ये येणाऱ्या अडचणी उदा. पिग्मेंटेशन वगैरे; तसेच लेझरद्वारे केस काढून टाकण्याच्या तंत्राच्या तुलनेत अधिक त्रासदायक, असुरक्षित व कमी कार्यक्षम आहे.

(Natural Skin Care हिवाळ्यात चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो, त्वचेसाठी करा हे ७ नैसर्गिक उपचार)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *