वजन कमी करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ फूड कॉम्बिनेशन, काही दिवसांतच व्हाल सडपातळ!

Spread the love

बदाम आणि सोया मिल्क

यूरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार बदामामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व ‘ई’ आणि हेल्दी फॅट आढळते. दर दिवशी 43 ग्रॅम भाजलेले पदार्थ खाल्ल्यास वाढलेलं वजन वेगाने घटते. सोया मिल्क मध्येही प्रोटीन, जीवनसत्त्व आणि खनिज घटक असतात. हे सर्व घटक वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. म्हणून तुम्ही सुद्धा आवर्जून बदाम आणि सोया मिल्कचे सेवन करा आणि काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसून येईल.

(वाचा :- करायची आहे पोट, मांड्या व कंबरेवरील चरबी कमी? मग प्या ‘या’ भाजीचं सूप!)

ग्रीन टी आणि मिंट

ग्रीन टीमध्ये कॅटेचीन नावाचे एक अँटीऑक्सिडेंट असते जे वजन वाढवणाऱ्या कोशिकांना नियंत्रित ठेवण्याचे काम करते. याशिवाय फॅट एनर्जीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी लिव्हरची क्षमता वाढवते. डिनरनंतर एक कप ग्रीन टी पिणे फायद्याचे असते. एका संशोधनात हे दिसून आले आहे की पेपरमिंट हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांवर रामबाण असून या समस्या कमी करते. ज्यामुळे आतडे अधिक प्रभावीपणे कार्य करतात आणि वजन वाढू लागत नाही.

(वाचा :- पाणी पिण्याचा व झोपण्याचा हा साधासोपा मुलमंत्र आचरणात आणल्यास लठ्ठपणा होईल झटपट कमी!)

काबुली चणे आणि ऑलिव काबुली चणे

काबुली चणे आणि ऑलिव काबुली चण्यात पोषक तत्वे आणि शरीरात मिसळणारे फायबर घटक असतात. हे खाद्य वजन संतुलित राखण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यातून भूक कमी होणारे हार्मोन कोलेसिस्टोकिनिन रिलीज होतात. यामुळे सारखी सारखी भूक लागत नाही. काबुली चणे आरामात एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव ऑईलमध्ये मिसळले जातात आणि सेरोटोनिनचा स्तर वाढवतात. यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असले तर हे कॉम्बीनेशन तुमच्यासाठी सर्वात उपयुक्त आहे.

(वाचा :- पावसाळ्यात जिभेचे चोचलेही पुरवा आणि फिट सुद्धा राहा ‘या’ खास पदार्थांसह!)

पालक आणि अ‍ॅव्होकाडो

पालकमध्ये कॅलरी आणि कार्बोहाइड्रेट आढळते. वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होती. अ‍ॅव्होकाडोमध्ये फायबर आणि हेल्दी फॅट आढळून येते. जर तुम्ही याचे रोज सेवन केले तर तुमच्या शरीराचे वजन योग्य प्रमाणात नियंत्रित राहील. अनेक जाणकार सुद्धा पालक आणि अ‍ॅव्होकाडोच्या सेवनाचा यामुळेच सल्ला देतात. जगभरात सुद्धा ज्यांना वजन कमी करायचे आहे ते पालक आणि अ‍ॅव्होकाडोने तयार होणाऱ्या डिशेस खाण्यावर भर देतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच हे पदार्थ ट्राय करायला हवेत.

(वाचा :- केसगळती, दातदुखी व हाडांच्या दुखण्याने त्रस्त आहात? मग ‘हे’ पदार्थ करतील वेदनेतून सुटका!)

नाचणी आणि काश्मिरी मिरची पावडर

नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड आढळते. याचे सेवन केल्याने जास्त भूक लागत नाही. वजन कमी करु इच्छिणाऱ्यांसाठी म्हणूनच नाचणी एक उत्तम पर्याय आहे. काश्मिरी मिरची पावडरमध्ये कैप्रीसिन नामक घटक असल्याने त्याच्या सेवनानसुद्धा वजन नियंत्रणात राहते. तर मंडळी ही आहेत काही उपयुक्त फूड कॉम्बीनेशन्स जी तुमची वाढत्या वजनाची समस्या दूर करून तुम्हाल सुदृढ बनवतील. आहार सोबत जर तुम्ही व्यायामावर व योगावर भर दिला तर तुम्हाला अधिक चांगले परिणाम दिसून येतील. वजन हे कधीच झटपट कमी होत नाही हे लक्षात ठेवा. ते कमी होण्यासाठी काही वेळ लागतो आणि तेवढा संयम तर तुमच्यात हवाच पण वजन कमी करण्यासाठी लागणारी मेहनत सुद्धा तुम्ही घ्यायला हवी. या सर्वांचा एकत्रित परिणाम झाल्यावरच तुम्ही वजन वाढीपासून सुटका मिळवू शकता.

(वाचा :- दुधाचे आठवडाभर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये करा सेवन, दिसतील आश्चर्यकारक फायदे!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *