वजन कमी करायचं आहे? मग फॉलो करा या बेसिक टिप्स!

Spread the love

मुंबई टाइम्स टीम

० समतोल साधणं आवश्यक

वजन कमी करायचं म्हणून आपण डाएट फॉलो करतो खरं. पण वजन कमी न होण्यामगचं प्रमुख कारण म्हणजे डाएटमुळे शरीराला लागणारी पौष्टिक घटकांची कमतरता. चरबी कमी करायची असल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलरीजचं प्रमाण कमी करणं. ते कमी करताना आहारातून सूक्ष्म घटक कमी करा. जेणेकरून, वजन घटण्यास मदत होईल.

(वाचा :- ६६ वर्षीय रेखाच्या मनमोहक सौंदर्य व फिटनेसचे ‘हे’ आहे रहस्य!)

० चुकीचा व्यायाम करणं टाळा

वजन कमी करायचं असल्यास व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. पण, तुम्ही जर चुकीचे व्यायाम करत असाल तर तुम्ही वजन कमी करण्याचा हेतू साध्य करू शकणार नाही. पोटाची चरबी कमी करणं चिकाटीचं काम आहे. लाँग जॉगसारख्या वर्कआउटमुळे काही प्रमाणत तुम्ही वजन कमी करण्यात यशस्वी झाले असाल. पण, कॅलरीज कमी होतील याची काही शाश्वती नाही. त्यामुळे तुमच्या स्नायूंवर ताण पडेल आणि ऊर्जा जास्त लागेल असे व्यायाम करा.

व्यायाम

(वाचा :- नाश्त्यात केलं ‘या’ ७ पदार्थांपैकी एका जरी पदार्थाचं सेवन तर लठ्ठपणा होईल आपोआप कमी!)

० पौष्टिक आहार घ्या

अपुरी झोप देखील वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते. मुख्य म्हणजे वाढलेलं वजन, चरबी कमी होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याच सोबत या सगळ्या गोष्टी सतत बाहेरचं खाणं यावर देखील अवलंबून आहेत, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

आहार

(वाचा :- चटपटीत व चविष्ट असण्यासोबतच आरोग्यास अगणित लाभ देते ‘ही’ पालेभाजी! नक्की खाऊन बघा)

० सकारात्मक राहा

संशोधनातून समोर आलं आहे की, चिंता आणि ताण यांचं प्रमाण जर अधिक असेल तर चयापचय प्रक्रिया मंदावते. यामुळे वजन कमी होण्यास अडथळे येतात.

सकारात्मकता

(वाचा :- Jaggery Benefits In Winter : थंडीच्या दिवसांत गुळ खाल्ल्याने ‘हे’ आजार होतात दूर!)

० साखरेचं प्रमाण कमी करा

मद्यपान केल्यानं देखील चरबी वाढते. अनेक पेयांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असल्यानं ते वजन वाढीस कारणीभूत ठरतं.

साखर

(वाचा :- थंडीच्या महिन्यात वाटाणे खाताय? मग जाणून घ्या ‘ही’ माहिती!)

संकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *