वजन घटवण्यासाठी प्रयत्न करताय? मग या प्रोटीनयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश

Spread the love

​पनीर मूग डाळ चिला

चिला हा एक लोकप्रिय भारतीय नाश्ता आहे. मूग डाळ चिला ही सर्वात सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे. हा नाश्ता अगदी काही मिनिटांमध्ये तयार होतो. ही रेसिपी तयार करण्यासाठी सर्व प्रथम मूग डाळ धुऊन थोड्या वेळासाठी भिजत ठेवा. आता बॅटर तयार करण्यासाठी मूग डाळ पाण्यासह मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. पीठ जाडसर तयार करावे. आवश्यकता पाहून त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्या.

(वजन घटवण्यासाठी आरोग्यवर्धक आहेत फळांच्या या ३ स्मूदी, पोटावरील चरबी होईल कमी)

​चिला तयार करण्याची पद्धत

आता गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करत ठेवा आणि त्यावर तूप किंवा तेल पसरवून घ्या. जेणेकरून तेल किंवा तूप पॅनवर योग्य पद्धतीने पसरेल. आता तयार केलेले बॅटर गरम तव्यावर चमच्या मदतीने टाका आणि गोलाकार आकारात पसरवा. दोन ते तीन मिनिटांपर्यंत चिला शिजू द्यावा. हलका चॉकलेटी रंग आल्यानंतर दुसऱ्या बाजूनंही चिला शेकून घ्या.

(घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या ६ फायदेशीर गोष्टी)

पनीरचे स्टफिंग

यानंतर तयार झालेला चिला दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवा आणि यानंतर त्यात पनीरचे स्टफिंग करून घ्या. पनीरचे स्टफिंग कसे तयार करायचे?

एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करत ठेवा. यानंतर छोट्या छोट्या आकारात कापलेले पनीर फ्राय करून घ्या. हवे असल्यास त्यामध्ये तुम्ही कापलेलं मशरूम देखील मिक्स करू शकता. पाच ते सहा मिनिटे स्टफिंग शिजू द्यावे. यावरून मीठ, हिरवी मिरची आणि बारीक कापलेला कांदा मिक्स करू शकता. आता हे स्टफिंग चिल्यामध्ये भरा आणि सर्व्ह करा.

(Health Care Tips आर्ट थेरपीशी गट्टी फायदेशीर!)

​मूग डाळ नारळ सूप

तुम्ही आपल्या जेवणाचा एक भाग म्हणून या स्वादिष्ट गरम सूपचा समावेश करू शकता. या सूपमुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. सूप तयार करण्यासाठी नॉन स्टिक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. यानंतर तेजपत्ता, जिरे, धणे पावडर, काळी मिरी आणि लसूण सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने भाजून घ्या. आता यामध्ये बारीक कापलेला कांदा, गाजर तसंच हळद आणि करी पावडर मिक्स करून घ्या. थोड्या वेळानं त्यामध्ये मीठ आणि उकडलेल्या चण्यांचा देखील समावेश करावा. सर्व सामग्री नीट शिजल्यानंतर गॅस बंद करा.

(नाश्त्यामध्ये काय खाताय? हे ५ तेलकट फास्ट फूड आरोग्यास हानिकारक)

​सूप तयार करण्याची पद्धत

आता यामध्ये छोट्या आकारात कापलेली कीवी मिक्स करा. आता ही सर्व सामग्री ग्राइंडरच्या मदतीने एकजीव करून घ्या आणि सर्व मिश्रण गाळणीच्या मदतीने दुसऱ्या पॅनमध्ये गाळून घ्या. तसंच उरलेली सामग्री मिक्सरमध्ये वाटून पॅनमध्ये ओता. यानंतर त्यावर नारळ क्रीम मिक्स करा. दोन मिनिटे सूप शिजू द्या आणि थोड्या वेळाने गॅस बंद करा. गार्निशिंगसाठी चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करा आणि गरमागरम सूप सर्व्ह करा.

(Pudina Benefits पुदिना खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदे)

​डाएट आणि व्यायाम

जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात मूग डाळीचे सेवन केले तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये लवकरात लवकर फरक दिसून येईल. डाएट प्लानसह नियमित ३० मिनिटांचा व्यायाम देखील करावा. असे केल्यास वेट लॉस जर्नी मध्ये नक्कीच मदत मिळेल.

Note वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबाबत आहारतज्ज्ञांकडून सल्ला घेणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून गरजेचं आहे.

(गॅसच्या समस्येमुळे त्रस्त आहात? आरोग्यासाठी या ६ गोष्टी खाणं बंद करणं गरजेचं)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *