वजन घटवण्यासाठी रामबाण उपाय आहे कांदा, असे सेवन केल्यास वजन लवकर होऊ शकते कमी

Spread the love

​वजन घटवण्यासाठी कांदा कशाप्रकारे करू शकतो मदत?

कांद्यामध्ये विशेषतः लाल कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचे फ्लेवेनॉइड असते. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ न देण्याचे कार्य ‘क्वेरसेटिन’ करते. या फ्लेवेनॉइडमुळे चयापचयाची क्षमता देखील वाढते. कांद्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करते. यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असून कॅलोरी देखील कमी आहेत. यामुळे शरीराचे वजन संतुलित राहण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये कांद्याचा कशा प्रकारे समावेश करू शकता, जाणून घ्या माहिती.

(शांत झोप हवीय? मग या ७ गोष्टी कायम ठेवा लक्षात)

​कच्चा कांदा

कच्च्या कांद्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात. हे घटक आपल्या आरोग्यासाठी पोषक आहेत. कच्चा कांदा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. लसूण प्रमाणेच कांदा देखील वजन घटवण्यासाठी लाभदायक आहे. पण कच्च्या कांद्याच्या सेवनामुळे तोंडाला दुर्गंध येण्याची समस्या निर्माण होते. वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हा त्रास सहन करू शकता. कांद्याचे स्लाइस करा आणि वरून मीठ टाका. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सॅलेडच्या स्वरुपातही तुम्ही कांदा खाऊ शकता.

(Health Care शरीर फिट ठेवण्यासाठी करा या ७ महत्त्वाच्या गोष्टी)

​कांद्याचा रस तयार करण्याची पद्धत

एका पॅनमध्ये दोन मोठ्या आकारातील कांदे घ्या आणि किंचितसचे उकडा. पॅनमधून कांदे बाहेर काढा आणि थंड करून घ्या. आता कांदे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा. आता एका ग्लासमध्ये त्याचा रस गाळून घ्यावा. हा रस तुम्ही असाही पिऊ शकता किंवा त्यामध्ये सैंधव मीठ आणि लिंबू रस मिक्स करूनही सेवन करू शकता.

NOTE : रिकाम्या पोटी कांद्याचा रस पिण्याची चूक करू नका. कारण पचन प्रक्रियेशी संबंधित समस्या होऊ शकते.

(Pudina Benefits पुदिना खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदे)

​कांद्याचे सूप

पुढील उपाय आहे कांद्याचे सूप. या पाककृतीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा समावेश करू शकता. हे सूप स्वादिष्ट तसंच आरोग्यवर्धक देखील आहे.

सूप तयार करण्याची पद्धत :

सहा कांदे आणि अन्य भाज्या चिरून घ्या. एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करत ठेवा. यामध्ये लसूण आल्याची पेस्ट आणि कांदे टाका. आता अन्य भाज्यांचाही समावेश करा. हा सर्व भाज्या चांगल्या पद्धतीने शिजू द्या. मिश्रणात मीठ, काळी मिरी आणि तुमच्यानुसार अन्य आवश्यक गोष्टींचा समावेश करावा. कांद्याचे सूप तयार झाल्यानंतर त्याचे सेवन करा.

(गॅसच्या समस्येमुळे त्रस्त आहात? आरोग्यासाठी या ६ गोष्टी खाणं बंद करणं गरजेचं)

​पचन प्रक्रिया

कांद्यामधील औषधी गुणधर्मांमुळे आपली पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारखी समस्या दूर होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर झाल्यानंतर पोटदुखी, पोटामध्ये जंतू होणे यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहिल्यास शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जाऊ शकतात. ज्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी देखील जमा होणार नाही.

(नियमित या वेळेस हळदीचं पाणी प्या, मिळतील भरपूर आरोग्यदायी लाभ)

Note वजन घटवण्यासाठी आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा किंवा करू नये, याबाबत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्या डाएटमध्ये कोणतेही बदल करू नये. दुसऱ्यांचे डाएट प्लान फॉलो करण्याची चूक करू नका.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *