वडिलांशिवाय का अपूर्ण असतं मुलीचं संगोपन?

Spread the love

या जगात आल्यावर सर्वात आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या जीवावर जगणं, हसणं, बोलणं, चालणं सुरु करतात तो असतो त्यांचा लाडका बाबा! खरं तर असं म्हटलं जातं की मुलगी या जगात येण्याआधीपासून तिच्यावर कोणी जीव ओवाळून टाकत असेल तर ते वडिल असतात. आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि तिचं स्वागत करता यावं यासाठी काही काही पुरुष तर ९ महिने डोळे लावून वाट पाहत असतात. जन्माला आल्यानंतर आई त्या बाळाचं खाणं-पिणं पाहते पण वडिल मात्र तिच्या उठण्यापासून झोपेपर्यंतच्या वेळात तिच्याकडे कौतुकाने पाहत तिची प्रत्येक गोष्ट आपुलकीने करतो. कधीतरी आपली लेक मोठी होणार आणि उंबरठा ओलांडून सासरी जाणार हे माहित असूनही आपल्या श्वासापेक्षा जास्त जपतो आणि गरजेपेक्षा अधिक देण्यात कमी पडत नाही ते वडिल असतात.

सहाजिकच मुलींनाही वडिल कितीही कडक असले तरी त्यांच्याप्रती वेगळाच जिव्हाळा असतो. असणारच ना! शेवटी आयुष्यात आलेला एकमेव तो असा पुरुष असतो जो तिच्याकडून काहीच न घेताही तिला भरभरुन देतच राहतो अगदी मरेपर्यंत. हो, लेक उंबरठा ओलांडून सासरी गेल्यावरही जो निस्वार्थ भावाने तिच्यासाठी झटत राहतो. तिच्यावर चांगले संस्कार करणे, खेळीमेळीच्या वातावरणात तिचा अभ्यास घेणे, तिला रिलॅक्स वाटावं म्हणून फिरायला नेणे, तिच्या आवडत्या गोष्टी खाऊ घालणे, दरारा वजा आधार बनून सतत तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहणे या सर्व भूमिका बाबा अगदी सहज पार पाडतो. म्हणूनच मुलींच्या संगोपनात वडिलांची महत्त्वाची भूमिका असते.

आयुष्यातील पहिला खास व्यक्ती

आदर्श घ्यायचा म्हटला तर मुलींच्या तरी आयुष्यात एकमेव पहिला पुरुष म्हणजे तिचा लाडका बाबा असतो. वडिल काय करतात, कसं करतात, मुलींप्रती त्यांचा व्यवहार काय आहे, ते कसं बोलतात, ते कसं हसतात, ते कसं चालतात अगदी छोट्यात छोट्या गोष्टींचा परिणाम मुलींवर होत असतो. वडिल मुलींसाठी एका चांगल्या पुरुषाची प्रतिमा असतात आणि पुढे जाऊन मुली आपल्या नव-यात वडिलांच्या गोड स्वभावाची झलक शोधण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांच्यासाठी या जगातला सर्वश्रेष्ट पुरुष हा त्यांचा बाबाच असतो.

(वाचा :- ‘या’ तेलाने मालिश केल्यास बाळाची हाडे होतील मजबूत!)

मुलीला देतात संरक्षण

आई नंतर नव्हे तर तिच्या बरोबरीने मुलींवर जीव ओवाळून टाकणारं कोणी असेल तर ते असतात वडिल. जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या प्रवासात जितके खाचखळगे, संकटं, समस्या, मोठ मोठे निर्णय असो प्रत्येक गोष्टीत वडिल मुलींचं संरक्षण करतात. जेव्हा आपल्यासोबत आपले वडिल उभे असतात तेव्हा कोणतीच व्यक्ती आपलं काही बिघडवू शकत नाही इतकी ताकद वडिलांच्या प्रेमात आणि संरक्षणात असते. कोणत्या गोष्टीसाठी आईने दटावण्यास सुरुवात केली तर मुली लगेच बाबाच्या पाठीचा आसरा घेऊन लपतात. बाबा मुलीला ठेवतोच एखाद्या परीसारखा!

(वाचा :- मुलांसाठी बनवा ‘या’ पदार्थापाासून झटपट नाश्ता, आरोग्यास होतील लाभच लाभ!)

नव-यातही वडिलांचे गुण शोधणे

या जगातील प्रत्येक मुलगी आपल्या होणा-या नव-यात वडिलांची छबी शोधत असते. तिच्यासाठी तिचा बाबा जगातील परफेक्ट आणि ग्रेट व्यक्ती असतो. त्यामुळे आपल्या वडिलांसारखेच लाड आणि हट्ट नव-यानेही पुरवावेत असं तिला वाटत असतं. वडिलांच्या प्रेमाची आणि आधाराची त्यांना इतकी सवय होते की नव-यानेही आपल्याला तसंच प्रेम, आधार आणि साथ द्यावी असं तिला वाटू लागतं. इतकंच काय तर ज्या मुलींची आपल्या वडिलांसोबत चांगली मैत्री आहे त्यांचा आपल्या आजुबाजूच्या लोकांसोबत व मित्रमंडळींसोबत चांगला व्यवहार असतो. कारण ती वडिलांची शिकवण आणि संस्कार असतात.

(वाचा :- आईच्या गर्भात असताना बाळ कोणत्या गोष्टी सर्वात जास्त एन्जॉय करतं?)

आईच्या रागापासून बचाव

जसं आम्ही वरच सांगितलं की एखादं चुकीचं काम केलं आणि आई चिडलेली असेल तर मुली धावत जाऊन वडिलांच्या पाठीचा आसरा घेऊन लपतात. कारण त्यांना चांगलंच माहित असतं की लेकीची चुक असेल तरी बाबा समजावून सांगणार आणि आईचा रागही तोच शांत करु शकतो याचा त्या फायदा घेऊन आईच्या मारापासून वाचतात.

(वाचा :- बाळाला ‘हा’ पदार्थ खाऊ घातल्यास बुद्धी होईल तल्लख!)

वडिलांसाठी प-या असतात मुली

मुलगी दिसायला, बोलायला, वागायला कशीही असो ती कायम आपल्या वडिलांसाठी एक परी असते जिच्या असण्याने त्याचं जग समृद्ध झालेलं असतं. मुलगी सासरी जावो, मुलीचे केस पिकले जावो, नातवंड येवोत तरीही एका वडिलांसाठी मात्र मुलगी लहान ती लहानच असते. त्यामुळे तिचे नखरे कोणत्याही वयात पूर्ण करताना ते थकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वडिल असणं हिच तिच्या सुखी आयुष्याची व्याख्या असते.

(वाचा :- शिस्त लागावी म्हणून मुलांवर हात उचलताय? मग परिणाम जाणून घ्याच!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *