वरुण धवनच्या मते मुली आपल्या जोडीदारात ‘ही’ एक गोष्ट आवर्जून शोधतात!

Spread the love

वरुण धवन (varun dhawan) नवीन पिढीतील सर्वात आकर्षक अभिनेत्यांपैकी एक आहे. याच कारणामुळे कितीतरी मुली त्याच्या डाइ हार्ड फॅन आहेत. पण हा हिरो ख-या आयुष्यात मात्र आधीच कोणालातरी आपलं ह्रदय अर्पण करुन बसला आहे. वरुण धवन सध्या तरी आपली प्रेयसी नताशा दलाल (natasha dalal) सोबत एक आनंदी जीवन जगत आहे. कित्येक वर्षे पालटली पण नातं चिरतरूण ठेवण्यासाठी वरुण एका गोष्टीशी कधीच तडजोड करत नाही.

हीच गोष्ट तो दुस-या मुलांनाही फॉलो करण्याचा सल्ला देतो आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती आणि तिचा स्वभाव जसा वेगवेगळा असतो अगदी तसंच प्रत्येकाचं रिलेशनशीपही वेगळं असतं. पण मुलींच्या आपल्या जोडीदाराकडून असणा-या काही अपेक्षा या अगदी सारख्या असतात. याच गोष्टीमुळे ही एक गोष्ट प्रत्येक मुलीला अपेक्षित असावी असा अंदाज बांधून वरुण सल्ला देतो आहे.

मुलींना काय हवं असतं?

एका कार्यक्रमात आलेल्या वरुण धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव शेअर करत त्याच्या मते प्रत्येक मुलगी कोणती अशी एक गोष्ट आहे जी आपल्या जोडीदारात शोधतात? हे सांगितले. त्याच्या मते प्रत्येक मुलीला आपल्या जोडीदारात प्रामाणिकपणा हा एक गुण हवा असतो. तो म्हणाला की, प्रामाणिकपणाची किंमत त्याला तेव्हा समजली जेव्हा तो स्वत: रिलेशनशीपमध्ये आला. त्याने हे देखील जाहिर केलं की, त्याला अशी जोडीदार भेटली आहे जी कायम त्याच्याशी प्रामाणिक राहते. यामुळे तो तिच्यावर खूप खुश आहे.

(वाचा :- एकत्र कुटुंब पद्धतीत लग्न होत असेल तर अशी बनवा सर्वांच्या मनात खास जागा!)

प्रामाणिकपणा नाही तर काहीच नाही

खरं तर हेच आहे की नात्यात प्रामाणिकपणा नाही तर ते नातंच खोटं असतं. कधी कधी काही लोक अशा नात्यात सापडतात ज्यामध्ये जोडीदार सतत खोट्यावर खोटं बोलत जातो आणि रंगेहात सापडल्यावर माफी मागतो. जर तुम्हीही अशा नात्यात फसला असाल आणि प्रेम आहे म्हणून सतत जोडीदाराची चूक मान्य करत जात असाल तर असं अजिबात करू नका. कारण तो व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असता तर त्याने खोट्याचा आधार कधी घेतलाच नसता. त्याच्यापासून वेगळं होणंच तुमच्या मानसिक व इमोशनल हेल्थसाठी बेस्ट असेल.

(वाचा :- मुलींच्या ‘या’ ५ सवयींमुळे मुलांचं डोकं होतं खराब, पळू लागतात नात्यापासून दूर!)

पर्सनॅलिटीतील अंतर एन्जॉय करा

वरुणने सांगितले की, तो व नताशा एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. पण ते दोघेही या अंतराला इश्यू बनवण्यापेक्षा एन्जॉय करतात. त्याने या गोष्टीचं उदाहरण देण्यासाठी एक किस्सा सांगितला की, जेव्हाही दोघं लॉंग ड्राईव्हवर जातात तेव्हा वरुणला ९०च्या दशकातील गाणी ऐकायला आवडतात तर नताशाला हॉलिवूड सिंगर्सची गाणी आवडतात. ही वेगवेगळी आवड त्यांच्या आयुष्यात अजून आनंद भरते आणि हा वेगळेपणा दोघेही एन्जॉय करतात. याचाच अर्थ आपल्या जोडीदाराला किंवा त्याचा स्वभाव, आवड निवड बदलायला जाण्यापेक्षा हे अंतर एन्जॉय करा यामुळे नात्यात कधीच कटूता येणार नाही.

(वाचा :- ‘या’ ५ गोष्टी सांगतात की तुमचा जोडीदार का करत नाही तुम्हाला स्वत:हून पहिला मेसेज!)

प्रेम आणि सकारात्मकता

सिनेमा किंवा मालिकांमध्ये नेहमीच असं दाखवलं जातं की, प्रेमाशिवाय आयुष्यात दुसरा काही कामधंदाच नाही. वरुण देखील हे मान्य करतो की फक्त प्रेमावर कोणी जगू शकत नाही. व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी पैसा व करियर देखील आवश्यक असतं. तेव्हाच तो हे देखील म्हणाला की, आपल्या आयुष्यात असा एखादा खास माणूस असणं अत्यंत गरजेचं असतं जो कायम आपल्या सुख-दु:खात सोबत उभा राहिल. हे जग प्रॅक्टिकल गोष्टींवर चालत असल्याने फक्त प्रेमच आपल्याला नक्कीच जगवू शकत नाही. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की, तुम्ही पैशामागे इतके धावाल की त्या स्पेशल व्यक्तीलाच गमावून बसाल, जो खरंच तुमची खूप काळजी घेतो. दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधून जगणंच आनंदी नातं देऊ शकतं.

(वाचा :- माधुरीसोबत नाव जोडलं गेल्यानंतर अनिल कपूरने केलं ‘हे’ ह्रदयस्पर्शी वक्तव्य!)

विश्वास

प्रत्येक मुलीला आपला जोडीदार प्रामाणिक व आपल्यावर विश्वास ठेवणारा असावा असंच वाटतं. कधी कधी काही मुलगे अत्यंत संशयी असतात. इतर मुलांनी आपल्या प्रेयसीसोबत बोलणं, तिच्याशी मैत्री करणं हे त्यांना अजिबात रूचत नाही. अशी बंधनं लादणं मुलींना कुठेतरी आवडत नाहीत. यामुळे नात्यात त्यांचा श्वास कोंडला जाऊ लागतो. त्यामुळे प्रामाणिकपणासोबतच विश्वास दाखवणं हे देखील मुलींसाठी तितकंच महत्त्वाचं असतं.

(वाचा :- बिपाशा बासूला सोडून ‘या’ कारणामुळे जॉन अब्राहमने केलं एका साधारण मुलीशी लग्न!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *