वांग्याचे झणझणीत भरित

Spread the love

How to make: वांग्याचे झणझणीत भरित

Step 1: वांगी शिजवून घ्या

वांगी स्वच्छ धुवून चिरून घ्या. थोड्या वेळानंतर कुकरमध्ये वांगी शिजत ठेवा. दोन ते तीन शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.

Step 2: हिंग – जिऱ्याची फोडणी

आता एका कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरे, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग आणि ६-८ अख्ख्या लाल मिरच्या घालाव्यात. दोन ते तीन मिनिटांसाठी सर्व सामग्री परतवून घ्या.

फोडणी

Step 3: फोडणीमध्ये शिजवलेली वांगी मिक्स करा

आता कढईत कढीपत्ता घालावा. नंतर उकडलेली वांगी घालून मॅश करा. ५० ग्रॅम चिंचेची पेस्ट मिश्रणात मिक्स करा. तीन ते चार मिनिटांसाठी सामग्री शिजू द्यावी. यानंतर ५० ग्रॅम गूळ आणि नंतर चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करावे.

वांगी आणि फोडणी

Step 4: वांग्याचे गरमागरम भरित

आता गॅस बंद करा आणि भरित रूम टेम्परेचरवर थंड होण्यास ठेऊन द्या.

वांग्याचे भरित

Step 5: वांग्याचे खमंग भरित

पोळी किंवा भातासोबत तुम्ही वांग्याच्या भरिताचा आस्वाद घेऊ शकता.

साऊथ इंडियन स्टाइल वांग्याचं भरीत


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *