वादविवादांव्यतिरिक्त ‘Bigg Boss 14’ अभिनेत्री गौहर खानच्या ‘या’ गोष्टीमुळे आहे चर्चेत

Spread the love

टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ चे १४ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. एकीकडे बिग बॉसच्या घरामध्ये राहता यावे, यासाठी स्पर्धक धडपड करताना दिसताहेत. तर दुसरीकडे हिना खान, सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खान ही कलाकारमंडळी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासह स्टायलिश अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. फॅशनेबल आउटफिटमुळे हिना खान देखील चर्चेत आहे. पण अभिनेत्री गौहर खानची स्टाइल जरा अधिकच हटके आणि स्टायलिश आहे, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.

स्ट्रेट फिटिंग ड्रेस, स्टायलिश बॉडीकॉन, हॉल्टर नेकलाइन आणि शरारा सेट यासारख्या एकापेक्षा एक सुंदर आउटफिट्सचे कलेक्शन गौहरच्या वॉर्डरोबमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गौहरला साधी पण मोहक स्टाइल अतिशय प्रिय आहे, ही बाब तिच्या चाहत्यांना नक्कीच माहीत असावी. ‘बिग बॉस १४’ च्या घरातही असेच काहीसे घडताना दिसत आहे. दरम्यान सर्वसामान्य तरुणीला खासगी आयुष्यात काही खास पॅटर्नचे स्टायलिश आउटफिट एकदा तरी घालायला नक्की आवडतील, अशा पद्धतीची स्टाइल फॉलो करताना गौहर सध्या दिसतेय.
(Kareena Kapoor करीना कपूरची ही साडी पाहून लोक भडकले होते, म्हणाले…)

​शिमरी फिशटेल गाउन

‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना गौहर खानचा स्टायलिश लुक पाहायला मिळाला. गौहरने ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर स्टीव्हन खलीलने डिझाइन केलेला शिमरी निळ्या रंगाचा गाउन घातला होता. या बॉडीफिटिंग गाउनवर तुम्ही बोटकट नेकलाइनने डिझाइन पाहू शकता. संपूर्ण गाउनवर मायक्रो गोल्डन बुटी प्रिंट डिझाइन दिसतंय. मोहक मेकअपसह वर्मिलियन (Vermillion) लिप कलर, साधी हेअर्स स्टाइल आणि Diosa Paris by Darshan Dave चे डिझाइनर स्टड्स ईअररिंग्स अशा लुकमध्ये गौहर सुंदर दिसत होती.

(चमकते रहो! स्टायलिश लुक देणाऱ्या सिक्विन पॅटर्नची तरुणींना भुरळ)

​बॉसी पँटसूट

ऑफिस मीटिंगसाठी तुम्हाला एखादे स्टायलिश आउटफिट परिधान करण्याची इच्छा असल्यास गौहर खानचा हा लुक ट्राय करून पाहू शकता. फिकट जांभळ्या रंगाचा बॉसी पँटसूट फॅशन डिझाइनर सोनम परमारने डिझाइन केला आहे. मॅचिंग ट्युब टॉप आणि गुलाबी रंगाच्या पाइपिंग लाइनमुळे या आउटफिटला परफेक्ट लुक मिळाला आहे. (फोटो क्रेडिट- A Fashionista’s Diary)

(नीता अंबानींची सून श्लोका मेहताचे ‘या’ दागिन्यांवर आहे अत्यंत प्रेम, पाहा फोटो)

​कोरल ड्रेप ड्रेस

स्टायलिश पोषाखाव्यतिरिक्त तुम्हाला आरामदायी कपडे परिधान करण्याची आवड असल्यास गौहर खानचा हा लुक आपल्यासाठी परफेक्ट आहे. छवी अग्रवाल यांनी हा ड्रेस डिझाइन केला आहे. या ड्रेससाठी तिने कमीत कमी मेकअप केला होता. फिरायला जाताना किंवा मित्रमैत्रिणींसोबत पार्टी सेलिब्रेशनसाठी एखादा स्टायलिश आणि कम्फर्टेबल आउटफिटच्या शोधात असाल तर या कोरल ड्रेप ड्रेसची तुम्ही निवड करू शकता.

(गुलाबी रंगाची क्रेझ : कपड्यांपासून ते फॅशनेबल वस्तूंपर्यंत हवाहवासा गुलाबी रंग)

​सिल्वर मिनी ड्रेस

वीकेंड वॉरमध्ये गौहरने दिलनाज फॅशन लेबलचा डिझाइनर सिल्वर मिनी ड्रेस घातला होता. ज्यावर मिरर वर्कसह स्टायलिश टच देण्यात आला आहे. तसे पाहायला गेलं तर हा ‘ए लाइन’ ड्रेस परिधान केल्यानंतर ज्वेलरी परिधान करण्याची आवश्यकता नव्हती. पण अभिनेत्रीने यावर डायमंड स्टड्स ईअररिंग्स मॅच केले होते. शिवाय साइड पार्टेड हेअर स्टाइल केली होती. नाइट पार्टीसाठी हटके लुक हवा असल्यास अशा पद्धतीच्या ड्रेसची तुम्ही निवड करू शकता.

(ऐश्वर्या राय आणि मलायका अरोराचा स्टायलिश ‘बटरफ्लाय’ रेड कार्पेट लुक)

​पेस्टल साडी

महिलांमध्ये पेस्टल साडी पॅटर्नची भरपूर क्रेझ पाहायला मिळतेय. बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते सर्वसामान्य महिलांनाही या पॅटर्नची साडी नेसणं पसंत आहे. एखादी पार्टी किंवा कार्यक्रमासाठी स्टायलिश साडी लुक हवा असल्यास तुम्ही पेस्टल साडीचा नक्की विचार करून पाहा. पेस्टल साडी नेसल्यानंतर मेकअप अतिशय हलक्या स्वरुपात करावा.

(मेटॅलिक लुक ठरतोय हिट! तरुणींमध्ये ‘या’ पॅटर्नची का आहे इतकी क्रेझ)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *