वायू प्रदूषणामुळे गुदमरु शकतो बाळाचा श्वास, खालील टिप्स करतील बाळाची सुरक्षा!

Spread the love

डब्ल्यूएचओचा अहवाल

डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने २०१६ साली एक सर्वेक्षण केले. ज्यात त्यांना आढळले की त्या वर्षी ५,४३,००० बालकांना या वायू प्रदूषणामुळे विविध आजार झाले. ज्यात श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार, अपंग, बौद्धिक क्षमता कमी होणे यांसारख्या समस्यांचा समावेश होता. एवढंच नाही तर वायू प्रदूषणामुळे मुदतपूर्व जन्म आणि जन्मावेळी बाळाचे वजन कमी होणे यांसारख्या समस्या वाढल्याचे दिसून आले. यावरून मंडळी तुम्ही अंदाज लावू शकता की हे वाढते प्रदूषण किती मोठी समस्या बनत चालले आहे.

(वाचा :- मुलांना ‘या’ वयाआधी चुकूनही देऊ नका चॉकलेट्स नाहीतर येईल पश्चातापाची वेळ!)

घरात सुद्धा आहे वायू प्रदूषण

तुम्हाला हे ऐकून थोडं विचित्र नक्कीच वाटलं असेल पण मंडळी ही अगदी खरी गोष्ट आहे. हे वायू प्रदूषण आपल्या घरात सुद्धा ठाण मांडून बसतं. त्यामुळे ज्यांची घरे सर्वाधिक प्रदूषित शहरात आहेत त्यांना या गोष्टीचा सर्वाधिक धोका आहे. खास करून जेव्हा घरात बाळ असते तेव्हा अशी घरे त्या बाळासाठी असुरक्षित होतात. मात्र काही टिप्स वापरून बाळाचे रक्षण करता येते.

(वाचा :- फेसबुक सीईओ व मोठ मोठ्या कलाकरांनी सुद्धा घेतली होती पॅटर्निटी लिव्ह! का गरजेची असते ही गोष्ट?)

बाहेर कमी जा

सध्या तर करोनाचा काळ सुरू आहे. त्यामुळे बाहेर जाऊच नये. पण इतर वेळी सुद्धा घराबाहेर कमीच पडावे. बाहेरची प्रदूषित हवा घातक ठरू शकते. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्ती जास्त करून या प्रदूषणाला बळी पडतात आणि या व्यक्तींमध्ये लहान मुले व वृद्धांचा समावेश होतो. म्हणून लहान मुलांना घेऊन सहसा घराबाहेर जाणे टाळावे. जर जायचे झाले तर करोना असो वा नसो बाळाला अवश्य मास्क घालावा. मास्कमुळे बऱ्यापैकी दूषित हवा रोखली जाईल. बाजारात लहान मुलांसाठी विशेष मास्क उपलब्ध असतात, त्यांचा वापर करणे उत्तम!

(वाचा :- मुलीला पहिल्यांदा पिरीयड्स येण्याआधी आईला मिळतात ‘हे’ संकेत व मुलीमध्ये दिसून येतात काही बदल!)

या गोष्टींपासून दूर ठेवा

घरात असणाऱ्या गोष्टी जसे की परफ्यूम आणि पेंट मध्ये पीएम 2.5 चे काही कण आढळतात. जे श्वासावाटे शरीरात गेल्यास नुकसानदायक ठरू शकतात. जर घरात लहान मूल असेल तर अशा गोष्टी त्याच्या पासून लांबच ठेवाव्यात. त्या अशा ठिकाणी ठेवाव्यात जेथून त्या त्याच्या हाताला लागणार नाहीत. कारण यातुन जर बाळाला संक्रमण झाले तर त्याच्या आरोग्याला मोठा धोका उद्भवू शकतो.

(वाचा :- मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा व बुद्धी तल्लख व्हावी म्हणून घरच्या घरी बनवा हेल्दी व टेस्टी ड्रिंक्स!)

खिडकी आणि दारे बंद ठेवा

हे प्रदूषण आता घरात सुद्धा ठाण मांडून बसले आहे हे तुम्ही जाणताच. जर तुमचे घर प्रदूषित वातावरणात असेल तर बाहेरून कोणतीही हवा आत येणार नाही याची काळजी घ्यावी. दारे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात. घरात जास्त व्हेंटिलेशन राहील याची सोय इंटेरियर डिजाईनर मार्फत करून घ्यावी. आपले घर आपल्यासाठी आणि बाळासाठी सुरक्षित राहावे यासाठी शक्य तितक्या सगळ्या गोष्टी कराव्यात. शेवटी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे बाळाला चांगला आहार देऊन त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्यावा. जेणेकरून त्याची शारीरिक क्षमता रोगांशी लढा देईल.

(वाचा :- कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करतानाही सोनाली बेंद्रेने असा केला आपल्या मुलाचा सांभाळ!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *