विद्या बालनला प्रसिद्ध डिझाइनर सब्यसाची मुखर्जीचा चेहरा सुद्धा पाहण्याची इच्छा का नाही?

Spread the love

बॉलिवूड तसंच अन्य क्षेत्रातील कित्येक दिग्गज मंडळींनी सब्यसाजी मुखर्जी यांच्याकडून डिझाइनर आउटफिट तयार करून घेतले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तसंच अभिनेत्यांचे फेव्हरेट डिझाइनर म्हणून देखील सब्यसाची प्रसिद्ध आहेत. दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा आणि सिनेसृष्टीतील जवळपास सर्वच अभिनेत्री सब्यसाची यांनी डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये आपल्याला कोणत्या- न्- कोणत्या कार्यक्रमात दिसतात.

पण बॉलिवूडमधील एक अभिनेत्री यास अपवाद आहे. जी सब्यसाची यांनी डिझाइन केलेले पोषाख तर दूरच, पण त्यांना भेटण्याचीही तिची इच्छा नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आहे. नेमका काय आहे या दोघांमधील वाद? हा वाद निर्माण होण्यामागील काय आहे कारण? जाणून घेऊया माहिती
(Ankita Lokhande सुंदर साडीतील अंकिता लोखंडेच्या मोहक अदा, पाहा फोटो)

​मैत्री

विद्या बालन आणि सब्यसाची मुखर्जी हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते, असं म्हटलं जातं. सब्यसाची यांनीच डिझाइन केलेल्या आउटफिट्स परिधान करणं विद्या बालनला पसंत होतं. इतकेच नव्हे तर विद्याने स्वतःच्या लग्नसमारंभासाठी देखील सब्यसाची यांच्याकडून खास साडी डिझाइन करून घेतली होती. लाल आणि सोनेरी रंगाचे कॉम्बिनेशन असलेल्या साडीमध्ये विद्या बालन सुंदर आणि मोहक दिसत होती. तिच्या ब्रायडल लुकचे सर्वांनी भरभरून कौतुकही केलं होतं.

(जुन्या कपड्यांचा असा करा वापर आणि घराला द्या नवा लुक)

वर्ष २०१३

वर्ष २०१३मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलसाठी विद्या बालनला जूरी मेम्बर होण्याची संधी मिळाली होती. तिच्यासाठी ही एक मोठी संधी होती. या फिल्म फेस्टिव्हलवर जगभरातील मीडियाची नजर असते. याच पार्श्वभूमीवर सर्व जण रेड कार्पेट लुकसाठी एकापेक्षा एक सुंदर ड्रेसची निवड करतात. सब्यसाची यांनी डिझाइन केलेले आउटफिट परिधान करून आकर्षक लुकवर वाहवाई मिळवणाऱ्या विद्याने या कार्यक्रमासाठीही आपल्या पोषाखाची जबाबदारी साहजिक त्यांच्यावरच सोपवली होती.

(Sara Ali Khan सारा अली खानचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतार)

साडी आणि लेहंग्यामध्ये दिसली विद्या

विद्या बालनला पारंपरिक कपडे परिधान करणं भरपूर पसंत आहे, हे आपण सर्वांनाच माहिती आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून सब्यसाची यांनी कान फिल्म फेस्टिव्हलसाठीही साडी आणि लेहंग्याची डिझाइन केली होती. विद्याचा एक – एक अपीयरन्स लुक परफेक्ट दिसावा यासाठी सब्यसाची यांनीही तिच्यासोबत कानपर्यंत प्रवास केला होता. पण विद्याच्या सर्वच रेड कार्पेट लुकवर कौतुकाऐवजी भरपूर टीका करण्यात आली. ‘बोअरिंग लुक’, ‘इंडियन वेडिंग लुक’ अशा प्रकारे टीका करत लोकांनी तिच्या वेशभूषेची निवड चुकीची ठरवली.

(अनुष्का शर्मा आणि कियाराचे एकसारखेच जम्पसूट, कोणी कोणाला केलंय कॉपी?)

​…मैत्रीत निर्माण झाला दुरावा

आपल्या पोषाखावर सर्वच स्तरातून टीका झाल्याने विद्या बालन बरीच दुखावली गेली होती. कान फिल्म फेस्टिव्हलहून मायदेशी परतल्यानंतर तिच्यातील आणि सब्यसाचीमध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क नव्हता. एवढेच नव्हे तर विद्याने सब्यसाची यांनी डिझाइन केलेले कपडे देखील परिधान करणं बंद केलं. विद्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, फेस्टिव्हल पार पडल्यानंतर ती सब्यसाची यांच्या संपर्कातही नाही. शिवाय त्यांनी डिझाइन केलेले आउटफिट देखील परिधान करत नाही.

(जेव्हा करीना कपूरवर भारी पडली होती या टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल, पाहा फोटो)

​सब्यसाची प्रतिक्रिया

या सर्व प्रकरणावर प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने सब्यसाची यांनी देखील स्वतःची बाजू सर्वांसमोर मांडली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होतं की, ‘विद्याला आउटफिटमध्ये जास्त प्रयोग करणं पसंत नाही. ती जशी आहे त्यामध्येच आनंदी असते, ही देखील चांगली गोष्ट आहे’. तर दुसरीकडे सब्यसाची यांनी आपल्या डिझाइन्सबाबत म्हटलं होतं की, ‘प्रत्येक डिझाइनरचे स्वतःचे सिग्नेचर डिझाइन असते. अशातच जर कोणी त्याचेच कपडे वारंवार परिधान करत असतील. तर समानता दिसणं स्वाभाविक आहे’. पुढे त्यांनी असंही सांगितलं होतं की, ‘कान फिल्म फेस्टिव्हलसाठी विद्याला सुद्धा वेगवेगळे डिझाइनर आउटफिट परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्या सल्ल्याचा विचार केला गेला नाही’.

(Importance Of Nath नथीचा नखरा! नथ घालण्याची बदललेली फॅशन)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *