वेट लॉसनंतर शहनाज गिलचं ‘स्टाइल’ टशन सुरूच, एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो करतेय शेअर

Spread the love

​लेदर आउटफिटमधील फोटोने जिंकलं चाहत्यांचे हृदय

इन्स्टाग्रामवरील लेटेस्ट फोटोमध्ये शहनाज गिलने (Shehnaaz Gill Fashion) लेदरचं आउटफिट परिधान केल्याचे दिसत आहे. काळ्या रंगाच्या ब्रालेटसह तिनं सॉलिड लेदर बाइक जॅकेट घातले होते. हे जॅकेट क्रॉप्ड स्टाइलमधील आहे. स्टडिड डिझाइनमुळे जॅकेट अधिकच स्टायलिश दिसत आहे. यावर अभिनेत्रीने त्याच मटेरिअलपासून तयार करण्यात आलेली स्किनफिट पँट परिधान केली होती. पँटमध्ये थाई पोर्शनवर नेट फॅब्रिक जोडण्यात आलं होतं. या लुकसाठी शहनाज गिलने ब्लॉक हील्स बूट्स मॅच केले होते. या फोटोंमध्ये ही पंजाबी गायिका जबरदस्त ग्लॅमरस दिसत आहे.

(जेनेलियाचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पती रितेशनंही व्यक्त केली अशी प्रतिक्रिया)

​फोटोशूटमध्ये दिसला हॉट लुक

यापूर्वीही शहनाजने आपल्या हटके फोटोशूटमधील काही निवडक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिनं पेस्टल गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस टॉप, फ्लोरल प्रिंट शॉर्ट्स आणि स्ट्रॅप हील्स घातल्याचे दिसत आहे. हा लुक अधिक सुंदर दिसावा यासाठी तिनं फॉल्स फरचा मोठा कोट देखील घातला होता. कर्ल्स हेअर स्टाइलमुळे तिला आकर्षक लुक मिळाला आहे. तिनं नॅचरल टोन मेकअप केला होता. शहनाजनं आपल्या मादक अदांनी चाहत्यांना पुरते घायाळ केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसतेय.

(को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान)

​अ‍ॅथलेजरमध्ये दिसतेय कमाल

शहनाजचं फिटनेस आणि स्लिम फिगरची झलक तिच्या फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिनं अ‍ॅथलेजर पोषाखातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटोमध्ये शहनाजने फिकट गुलाबी रंगाचा वर्कआउट लोअर आणि हुडी परिधान केल्याचे आपण या फोटोमध्ये पाहू शकता. हा रंग शहनाज गिलवर सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या घायाळ करणाऱ्या अदांमुळे हा लुक अधिकच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसतोय. या अ‍ॅथलेजर लुकसाठी अभिनत्रीने स्ट्रेट हेअरस्टाइल, लाइट टोन मेकअप आणि जांभळ्या रंगाचे फुटवेअर मॅच केले होते.

(अनुष्का शर्मा ‘या’ क्लोदिंग ब्रँडची आहे मालकीण, स्वस्त किंमतीत मिळतात मस्त स्टायलिश कपडे)

​डेनिममधील सुपर ग्लॅमरस

डेनिममध्येही स्टायलिश आणि ग्लॅमरस कसं दिसावं, याच्याशी संबंधित फॅशन टिप्स आपण शहनाज गिलकडून घेऊ शकता. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये शहनाजने डेनिम ड्रेस परिधान केला आहे. या वन शोल्डर स्टाइलमुळे तिला जबरदस्त स्टायलिश लुक मिळाला आहे.

(अपूर्वा नेमळेकरचा मोहक पारंपरिक अवतार, पाहा हे ५ फोटो)

तर दुसरीकडे आपल्या डेनिम जॅकेट लुकवर तिनं पांढऱ्या रंगाचा नेकपीस मॅच केला होता. या दोन्ही लुकमध्ये शहनाज गिलने चेहऱ्यावरील शॉर्प फीचर्स हाईलाइट केले होते. लाइट टोन मेकअपमुळे तिला मोहक आणि सुंदल लुक मिळालाय.

(Sonam Kapoor ‘या’ स्टायलिश ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी सोनम कपूरला केलं ट्रोल, म्हणाले…)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *