व्यायामासाठी कशाला हवा खास वेगळा वेळ? बसल्या जागी असा करा व्यायाम!

Spread the love

मुंबई टाइम्स टीम

सक्रिय राहणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. बैठकाम करणाऱ्यांनी तर मध्ये-मध्ये व्यायाम करणं गरजेचं असतं. विशेषत: घरकामं करता-करता व्यायाम करणं सहज शक्य आहे, असं तज्ज्ञ सांगतात. घरातील काम करता-करता कोणत्या प्रकारचे व्यायाम करता येऊ शकतात, याविषयी…

० चलते रहो

कॉफी बनवताना, दुपारचं जेवण गरम करताना किंवा पाणी उकळताना वेळ मिळतो तो व्यायामासाठी वापरु शकता. त्या वेळेत तिथल्या तिथे चालू शकता.

(वाचा :- कोरफडीच्या गराचे सेवन करत नसाल तर आजच सुरुवात करा, दिसून येतील अगणित लाभ!)

० किचन काऊंटर पुश-अप्स

स्वयंपाकघरातील कट्ट्याच्या दिशेनं तोंड करुन उभे राहा आणि कट्ट्याचा आधार मिळेल असे हात ठेवा. आता हळूहळू पाय मागे घ्या. नंतर टाचा उचला आणि छाती कट्ट्याच्या दिशेने खाली न्या. पुन्हा वर या आणि पुशअपची कृती करा.

(वाचा :- चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब करा ‘हे’ उपाय, काही सेकंदातच डोकं होईल शांत!)

० वॉटर बॉटल स्विंग्स

दूध, पाणी किंवा फळांच्या रसाची बाटली घ्या. आता दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून उभे रहा आणि दोन्ही हातांनी बाटली पायाकडे घेऊन वरती खांद्याच्या दिशेनं घ्या. गुडघे थोडेसे वाकले तरीही चालतील. शरीराचं वजन टाचांवर येईल असं बघा. यामुळे मांड्याच्या आणि पोटऱ्यांच्या स्नायूंचा व्यायाम होतो.

(वाचा :- Juice Vs Soup : ज्यूस व सूप यापैकी काय असतं अधिक लाभदायक? जाणून घ्या नाश्त्यात काय प्यावं?)

० सोफा क्लाइम्बर्स

सोफ्याकडे तोंड करुन उभे राहा. खाली वाकून दोन्ही हात सोफ्यावर टेकवा आणि पाय मागे-मागे न्या. असं प्लँकच्या स्थितीत दहा सेकंद थांबा. नंतर आधी एक गुडघा छातीच्या दिशेनं पुढे आणा. मग तो पूर्वस्थितीत न्या. नंतर दुसरा गुडघा छातीच्या दिशेनं पुढे आणा. आता या कृतीचा वेग वाढवा. जेणेकरून, तुम्ही चालत आहात असं वाटेल. ही कृती सलग ३० सेकंद करत राहा.

(वाचा :- घ्या जाणून पोटाच्या समस्यांवर उपाय काय?)

० हिप थ्रस्ट्स

पलंगावर आडवे व्हा. पाठ पलंगाला व्यवस्थित टेकवा. आता पोट वरच्या बाजूने उचला. पावलं पलंगावर असू द्या आणि गुडघे थोडेसे वाकवा. हात डोक्यामागे मागे असू द्या. आता पोट पलंगावर टेकवा आणि पुन्हा वर न्या. ही कृती दहा वेळा करा.

(वाचा :- तुमचेही केस झपाट्याने सफेद होतायत? मग जाणून घ्या यामागील कारणे व साधेसोपे घरगुती उपाय!)

० ट्रायसेप्स डिप्स

खुर्चीकडे पाठ करुन खाली बसा आणि हात खुर्चीवर टेकवा. हात न उचलता वर या. पुन्हा खाली बसा. हे करताना शरीराचं वजन तळव्यांवर टाका. असं १०-२५ वेळा करा.

(वाचा :- Make Eyes Beautiful : डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त आहात? मग ट्राय करा ‘हे’ ५ घरगुती उपाय!)

० टूथब्रश स्क्वॅट्स

मांडीच्या स्नायूंचा व्यायाम होण्यासाठी दात घासताना स्क्वॅट्स म्हणजेच उठा-बशा काढा. हे करताना पुढे वाकू नका. नाही तर पाठीच्या आणि कंबरेच्या स्नायूंवर ताण येईल. तसंच खाली बसताना गुडघे बाहेरच्या दिशेने आणि मांड्या सरळ रेषेत असाव्यात.

(वाचा :- तुम्हाला जाणवतायत ‘ही’ ५ लक्षणं? मग समजून जा शरीरात झाली आहे पाण्याची कमतरता!)

० मॉपिंग लंजेस

घरात केर काढताना लंजेसचा व्यायाम करु शकता. हा व्यायाम करताना ओटीपोटातील स्नायूंना गुंतवायचं आहे हे विसरु नका. एक पाऊल पुढे टाका आणि गुडघ्यातून खाली वाका. मग आजूबाजूच्या भागातील केर काढा. आता पुन्हा एक पाऊल पुढे टाका आणि गुडघ्यातून खाली वाका. मग आजूबाजूच्या भागातील केर काढा.

(वाचा :- या २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका!)

० डिशवॉशिंग लिफ्ट्स

बेसिन भांडी घासण्यासाठी उभे असताना मांड्यांच्या मागील भागाचा आणि पोटऱ्यांच्या मागील भागाचा व्यायाम करा. यासाठी पायांच्या बोटांचा आधार घेऊन उभे राहा आणि टाचा वर उचला. नंतर टाचा टेकवा आणि पुन्हा वर उचला. असं तीस वेळा करा. यामध्ये तीन प्रकार आहेत. एकदा पावलं सरळ ठेवून टाचा वर उचला. दुसऱ्या वेळी पावलं बाहेरच्या दिशेनं ठेवून टाचा वर उचला आणि तिसऱ्या वेळी पावलं आतल्या दिशेनं ठेवून टाचा वर उचला.

(वाचा :- सांधेदुखीने त्रस्त आहात? मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय!)

००००

टिप्स

– तुम्ही कॉफी किंवा जेवण बनवण्यासाठी उभे असताना हाताचे किंवा पायाचे व्यायाम करु शकता.

– व्हिडीओ कॉल सुरु असताना शक्य असेल तर कॅमेरा ऑफ करुन स्ट्रेचिंगचे व्यायाम करा.

– फोनवर बोलताना तिथल्या तिथे चालण्याचा प्रयत्न करा.

संकलन- अभिषेक तेली, रुईया कॉलेज


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *