व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ आणि खाज येते का? जाणून घ्या हे ५ घरगुती उपाय

Spread the love

​उपाय काय?

या समस्येवर कायमस्वरुपी उपाय काय? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का. कारण व्हॅक्सिंग करणंही गरजेचं आहे आणि त्यानंतर होणाऱ्या त्रासापासून सुटका होणेही महत्त्वाचे आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपण काही सोपे घरगुती – नैसर्गिक उपाय पद्धती जाणून घेऊया.

महत्त्वाच्या गोष्टी:

  • मासिक पाळीदरम्यान व्हॅक्सिंग करू नये, कारण या दिवसांत आपली त्वचा अधिक संवेदनशील असते.
  • व्हॅक्सिंग केल्यानंतर लगेचच प्रदूषण किंवा गरम-दमट वातावरण असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे.

(केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर टाळा, सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याची अशी घ्या काळजी)

​कोरफड जेल

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर येणारे बारीक पुरळ कमी करण्यासाठी कोरफड जेलची मदत तुम्ही घेऊ शकता. व्हॅक्सिंगमुळे हाता-पायांवर आलेली सूज आणि त्वचेवर होणारी जळजळ कोरफड जेलमुळे कमी होते. घरामध्ये कोरफडीचे रोप असल्यास त्यापासून घरच्या घरी नैसर्गिक कोरफड जेल तयार करून घ्या. व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर हे जेल लावा. त्वचेवर रात्रभर कोरफड जेल लावून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर हात-पाय पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

(Korean Skincare चेहऱ्यावर मेकअप टिकून राहण्यासाठी कोरियन तरुणी करतात ‘हा’ उपाय)

​साखर स्क्रब

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर येणारे पुरळ आणि जळजळ कमी करण्यासाठी घरामध्ये तयार केलेल्या साखरेच्या स्क्रबचा वापर करून पाहावा. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाच्या तेलामध्ये अर्धा कप साखर मिक्स करावी. हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा.

(Navratri 2020 उपवासादरम्यान चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो? डाएटमध्ये या ६ गोष्टींचा करा समावेश)

​नारळ तेल आणि टी ट्री ऑइल

ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही त्वचेवर नारळ तेल आणि टी ट्री ऑइल देखील लावू शकता. या तेलांमधील पोषण तत्त्वांमुळे त्वचेवर येणारी खाज कमी होते. याव्यतिरिक्त तुम्ही बेबी पावडरचाही वापर करू शकता.

(मॉडेल्सची त्वचा मेकअपशिवाय कशी दिसते इतकी नितळ? जाणून घ्या त्यांचे १० मोठे ब्युटी सीक्रेट)

​ओल्या कापडाचा वापर

वरील कोणतेही उपाय तुम्हाला करायचे नसल्यास किंवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असल्यास तुम्ही एक साधा आणि सोपा उपाय करू शकता. कॉटनचे स्वच्छ कापड पाण्यात भिजवून ओले करा आणि आपल्या हाता-पायांवर ठेवा. यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल. यामुळे त्वचेचा लालसरपणा आणि पुरळ देखील कमी होण्यास मदत मिळेल.

(मुरुम, काळवंडलेल्या त्वचेपासून हवीय सुटका? वापरा आयुर्वेदिक मुलतानी मातीचे फेस पॅक)

​बर्फ

दुसरा सोपा म्हणजे व्हॅक्सिंगनंतर तुम्ही त्वचेवर बर्फाने मसाज करू शकता. पुरळ कमी होईपर्यंत हलक्या हाताने बर्फाने मसाज करावा. एका कापडामध्ये बर्फ गुंडाळून घ्या आणि मग त्याचा उपयोग करावा. बर्फासोबत कोरफड आणि काकडीचाही वापर तुम्ही करू शकता. पाण्यामध्ये कोरफड किंवा काकडीचा रस मिक्स करा आणि आइस क्युब तयार करून घ्या. कोरफड – काकडीच्या आइस क्युबने आपल्या त्वचेचा हलक्या हातानं मसाज करा. त्वचा चुकूनही रगडू नये.

(Navratri 2020 नवरात्रौत्सव 2020 : उपवास करण्याचे सौंदर्यवर्धक व आरोग्यवर्धक लाभ माहीत आहेत?)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *