शरीराला घामामुळे येते दुर्गंधी? बाभळीच्या उटण्याचा करा उपयोग, जाणून घ्या लाभ

Spread the love

हिवाळा असो किंवा पावसाळा, काही जणांच्या शरीराला भरपूर दुर्गंधी येते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर या समस्येचा सर्वात जास्त सामना करावा लागतो. आपण देखील या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर नैसर्गिक आणि रामबाण उपाय म्हणून आपण बाभळीच्या पानांपासून तयार केलेल्या उटण्याचा उपयोग करू शकता.

यामुळे तुम्हाला अनेक सौंदर्यवर्धक लाभ देखील मिळू शकतील. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने या उटण्याचा उपयोग केल्यास शरीराला दुर्गंध येण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
(Natural Skin Care महिनाभर गाजराच्या फेस पॅक असा करा वापर, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो)

​बाभळीचे सौंदर्यवर्धक फायदे

 • बाभळीपासून मिळणारे सौंदर्यवर्धक फायद्यांबाबत खूप कमी जणांनी माहिती आहे. बाभळीच्या उपयोगामुळे दात पांढरेशुभ्र आणि मजबूत होतात.
 • हिवाळ्यामध्ये उबदार कपडे परिधान केल्यानं काही जणांच्या त्वचेला खाज येण्याची समस्या निर्माण होते. यापासून सुटका हवी असल्यास बाभळीचा उपयोग करू शकता. तसंच बाभळीच्या उपयोगामुळे शरीराला घामामुळे येणारी दुर्गंध देखील कमी होते.
 • शरीराला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी आपण बाभळीच्या पानांपासून तयार केलेल्या उटण्याचा उपयोग करू शकता. यामुळ तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

​बाभळीच्या पानांचे उटणे

 • बाभळीच्या झाडाची पाने आकाराने अतिशय छोटी आणि पातळ असतात. पण या पानांपासून त्वचेला सर्वाधिक लाभ मिळतात. बाभळीच्या पानांपासून तयार केलेले उटणे लावल्याने त्वचेवर अतिरिक्त होणारा तेलाचा स्त्राव नियंत्रणात येण्यास मदत मिळते.
 • तसंच शरीरास दुर्गंध येण्यास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूची निर्मिती देखील होत नाही. एकूणच शरीलाला येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येतून सुटका होण्यास मदत मिळते.
 • हिवाळ्यामध्ये उबदार कपडे घातल्यानंतर काही जण रॅशेज, त्वचेला खाज येणे आणि त्वचेशी संबंधित अन्य समस्यांचा सामना करतात. या लोकांनी बाभळीच्या उटण्याचा उपयोग करावा. बाभळीतील नैसर्गिक औषधी गुणधर्मांमुळे त्वचेची पीएच (pH) पातळी समतोल राहण्यास मदत मिळते.

(Skin Care Tips चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, कॉफी आणि साखरेचा असा करा वापर)

​असे तयार करा बाभळीच्या पानांचे उटणे

 • बाभळीची पाने छोट्या हिरड्यांसह अतिशय बारीक स्वरुपात वाटून घ्या. हे मिश्रण तयार करण्यासाठी आपण गुलाब पाण्याचा उपयोग करू शकता. यामुळे त्वचा उजळते आणि त्वचेला थंडावा देखील मिळतो.
 • हिरड्याची पावडर आणि बाभळीची सुकलेली पाने तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्येही मिळेल. अथवा भाजीवाल्याकडे तुम्हाला बाभळीची पाने मिळू शकतात.

(त्वचा सुंदर व तरूण राहण्यासाठी माधुरी दीक्षितनं सांगितले हे उपाय)

​एवढा वेळ लावून ठेवा उटणे

 • उटणे तयार झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर लावा. जवळपास १५ ते २० मिनिटांसाठी उटणे शरीरावर लावून ठेवा आणि यानंतर आंघोळ करून घ्या.
 • नियमित स्वरुपात या उटण्याचा उपयोग केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल. शरीराला दुर्गंध येत नाही आणि तुमचे सौंदर्यही खुलण्यास मदत मिळते.
 • या नैसर्गिक उपचारामध्ये सातत्य टिकवून ठेवल्यास तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हळूहळू सकारात्मक बदल जाणवतील. पण यासाठी उटणे नियमित लावणे आवश्यक आहे.

(कोरियन महिलांच्या सौंदर्याचे सीक्रेट माहीत आहे? नियमित या नॅचरल फेशिअल एसेंसचा करतात वापर)

​घरच्या घरी तयार बाभळीच्या पानांची पेस्ट

 • घरच्या घरी देखील बाभळीच्या पानांची पावडर तयार केली जाऊ शकते. यासाठी सावलीमध्ये पाने सुकत ठेवा, उन्हात नव्हे.
 • ही पाने एखाद्या हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवा. उटणे तयार करण्यासाठी आपल्या आवश्यकतेनुसार पानांचा उपयोग करावा.
 • बाभळीच्या पानांमध्ये बेसन किंवा चंदन पावडर आणि हळद मिक्स करा. हे फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. या फेस पॅकमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल आणि त्वचा मऊ देखील होईल.

(तुळशीची पाने व दोन चमचे दूध, या नैसर्गिक उपचारामुळे तुमच्या त्वचेला मिळतील हे फायदे)

NOTE त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे स्किन केअर रुटीन फॉलो करू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *