शरीर फिट ठेवायचंय? प्या १ ग्लास तुळस व ओव्याचं पाणी, जाणून घ्या लाभ

Spread the love

​वजन घटवण्यासाठी तुळस आणि ओव्याचे पाणी

तुळस आणि ओव्याचे पाणी वजन कमी करण्यासाठी भरपूर लाभदायक आहे. तुळशीतील घटक आपल्या शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. तर ओव्यातील पोषण तत्त्व पोटाचे आरोग्य निरोगी ठेवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

(टीव्ही पाहत खाण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या कसं ठेवावे नियंत्रण)

​तुळस आणि ओव्याचे पेय कसं तयार करावं?

  • एक ग्लास पाण्यात ओवा (छोटा अर्धा चमचा) रात्रभर भिजत ठेवा.
  • दुसऱ्या सकाळी हे पाणी पॅनमध्ये गरम करत ठेवा.
  • पाण्यामध्ये मुठभर तुळशीची पाने मिक्स करा आणि उकळा.
  • गॅस बंद करा आणि उकळलेलं पाणी ग्लासमध्ये गाळून घ्या.
  • वजन कमी करण्यासाठी या पाण्याचे नियमित सेवन करा. पण या पेयाचे अधिक प्रमाणात सेवन करणं टाळावं. अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

(Health या गोष्टींमध्ये दडलीय तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती)

​आरोग्यासाठी तुळशीचे फायदे

तुळस आपल्या शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स प्रमाणे कार्य करते. यातील पोषण तत्त्व आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. सोबतच पचनप्रक्रिया देखील सुधारते. यामुळे चयापचयाची क्षमता वाढते. याव्यतिरिक्त श्वसनाशी संबंधित विकार दूर होतात आणि रक्तदाबाची समस्या देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तुळशीच्या सेवनामुळे तणाव सुद्धा कमी होतो. तसंच यातील औषधी गुणधर्मांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हाडांचे आरोग्य देखील निरोगी राहते.

(Priyanka Chopra Fitness प्रियंका चोप्राच्या आकर्षक फिगरचे सीक्रेट, जाणून घ्या तिचा फिटनेस मंत्रा)

​तणाव दूर करण्यासाठी

धावपळीच्या आयुष्यामध्ये कित्येक जण मानसिक ताणतणावाचाही सामना करत असतात. हा ताण कमी करण्यासाठी रामबाण घरगुती उपाय म्हणून आपण तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. तुळशीच्या पानांमध्ये अँटी- स्ट्रेस गुणधर्म असतात. जे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक आहेत.

(‘रश्मी रॉकेट’मध्ये तापसी पन्नू साकारणार अ‍ॅथलीटची भूमिका, जाणून घ्या न्युट्रिशनिस्टने कसं तयार केलंय डाएट प्लान)

​ओव्याचे फायदे

चयापचयाची क्षमता वाढवण्यासाठी ओवा आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. चयापचयाची क्षमता चांगली असेल तर वजन कमी करणं सोपं जाते. ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आहेत. हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकण्याचे कार्य करतात. यातील औषधी गुणधर्म रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करतात. ओव्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास संधिवात आणि दम्याची समस्या दूर होण्यासही मदत मिळते.

(Pumpkin Seeds Health Benefits नियमित भोपळ्याच्या बियांचे सेवन करण्याचे हे आहेत फायदे, जाणून घ्या)

NOTE हा उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *