शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करा फक्त १५ मिनिटांचा व्यायाम, मिळतील भरपूर लाभ

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
धावपळीच्या दिवसांत कित्येकांना व्यायाम करण्यासाठी वेळ काढता येत नाही. आता तर घरी असलो तरीही कंटाळा आणि आळस यापुढे व्यायाम करण्याची इच्छा होत नाही, अशी तक्रार अनेक जण करतात. पण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी (Health Care) व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. योगचा पर्यायही प्रभावी आहे. कमीत कमी वेळेत करता येण्यासारख्या आसनांनी शरीराला जास्तीत जास्त फायदा होतो. यासाठी दिवसातील फक्त १५ मिनिटं योगसाठी दिली तरीही पुरेसं आहे. अगदी १५ मिनिटांत होणाऱ्या आसन आणि व्यायामाविषयी…

० ताडासन
ताठ उभे राहा. दोन्ही पाय समांतर असू द्या. दोन्ही पावलांचा स्पर्श होणार नाही, असे उभे राहा. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून हात हळूहळू वरच्या दिशेने न्या. चौड्यावर उभं राहून हात वरच्या दिशेनं खेचण्याचा प्रयत्न करा. कंबरेतून वाकू नका आणि समोर बघा. काही सेकंदं या स्थितीत राहा.

किती वेळा करावं? पाच ते दहा वेळा
किती वेळ करावं? पाच मिनिटं

(Weight Loss Journey ‘माझं १०३ Kg वजन होतं, ६ महिने डाएट फॉलो करून ३४ Kg वजन घटवलं’)

० त्रिकोणासन
दोन्ही पायांमध्ये तीन ते चार फूट अंतर ठेवून उभे राहा. आता उजव्या पायाला काटकोनात आणि डाव्या पायाचं पाऊल सरळ ठेवा. दोन्ही हात दोन दिशांना लांब करा. हाताची बोटं सरळ ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना शरीराला उजवीकडे झुकवा. उजवा हात खाली आणि डावा हात वरच्या बाजूला असू द्या. कंबरेतून वाकू नका आणि उजव्या पायाकडे बघा. जेवढं शक्य असेल तेवढं या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. नंतर हे आसन डाव्या बाजूनेसुद्धा करा.

किती वेळा करावं? तीन ते चार वेळा
किती वेळ करावं? पाच मिनिटं
(गॅसच्या समस्येमुळे त्रस्त आहात? आरोग्यासाठी या ६ गोष्टी खाणं बंद करणं गरजेचं)

० डोळ्यांसाठी
– दोन तासांत किमान २० वेळा पापण्यांची उघड-झाप झाली पाहिजे. यामुळे डोळ्यांत ओलावा राहतो.
– डोळे दहा सेकंदासाठी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरवा. आता विरुद्ध दिशेनंसुद्धा फिरवा.
– दोन्ही हातांचे तळवे घासून हात डोळ्यांवर ठेवा. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत पार पडते.

किती वेळ करावं? दोन मिनिटं
(नाश्त्यामध्ये काय खाताय? हे ५ तेलकट फास्ट फूड आरोग्यास हानिकारक)

० मान आणि खांद्यांसाठी…
– खुर्चीवर ताठ बसा. दीर्घ श्वास घेऊन मान डावीकडे आणि उजवीकडे वळवा. नंतर दोन-तीन सेकंदं थांबून पुन्हा हाच व्यायाम करावा.
– आता दोन्ही समोर घेऊन वर-खाली करा. यामुळे खांद्यांचा व्यायाम होईल आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत पार पडेल.

किती वेळ करावं? तीन मिनिटं

Note शारीरिक दुखापती टाळण्यासाठी योगप्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार तसंच देखरेखी अंतर्गतच योगासनांचा अभ्यास करावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *