शाहिदसोबत फोटो काढण्यासाठी मीराने इतके महाग कपडे केले परिधान, फोटो व्हायरल

Spread the love

​एथनिक ड्रेस

मीरा राजपूतच्या (Mira Rajput Style) वॉर्डरोबमध्ये ए लिस्टर्स फॅशन डिझाइनर्स अनीता डोंगरे यांच्यापासून ते रिद्धि मेहरा, पुनीत बलाना, मनीष मल्होत्रा आणि मोनिका अँड करिश्मा यांनी डिझाइन केलेले एथनिक ड्रेसचे कलेक्शन पाहायला मिळतं. स्टार अभिनेत्याच्या (Shahid Kapoor Fashion) पत्नीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्सचे सुंदर कलेक्शन आहे. तिच्या एक-एक पोषाखाची किंमत हजार- लाखो रुपये एवढी असते.

(करीना कपूरच्या स्टायलिश लुकवर भारी पडली सारा अली खानची ‘ही’ फॅशन)

​वेलवेट कुर्त्यांमध्ये सुंदर दिसत होती मीरा

मीराची अशीच काहीशी सुंदर वेशभूषा दिवाळीदरम्यान देखील पाहायला मिळाली. मीरा राजपूतने पती शाहिद कपूरसोबत काढलेला सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोशूटसाठी तिनं सुंदर पोषाखाची निवड केली होती. दिवाळीसारखा खास सण उत्साहात साजरा करण्यासाठी तसंच हटके लुक मिळावा यासाठी मीरा राजपूतने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर तोरानीने डिझाइन केलेला निळ्या रंगाचा वेलवेट ड्रेस खरेदी केला. डिझाइनरच्या लेटेस्ट कलेक्शनमधील हा ड्रेस आहे. मीरा राजपूतने या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडला.

(करीना कपूरच्या स्टायलिश अवतारावर भारी पडला मीरा राजपूतचा मोहक लुक)

​पारंपरिक एम्ब्रॉयडरी डिझाइन

मीरा राजपूतने तोरानीच्या Makhmal Qurbat Khat कलेक्शनमधून मोनोक्रोमॅटिक पोषाखाची निवड केली. हा ड्रेस पूर्णतः सिल्क वेलवेट फॅब्रिकपासून डिझाइन करण्यात आला होता. या ऑर्गेना पोषाखामध्ये निळ्या रंगाचा कुर्ता, फ्लोरल प्रिंट एम्ब्रॉयडरीसह मॅचिंग पँट आणि नेट फॅब्रिक असणाऱ्या ओढणीचा समावेश होता. ओढणीवर देखील सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क तुम्ही पाहू शकता. या निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये स्क्वेअर पॅटर्न विणकामासह छोट्या-छोट्या आरशांचे वर्क करण्यात आलं होतं. यामुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे.

(को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान)

​मीरा राजपूतच्या ड्रेसची किंमत

मीरा राजपूतला अति मेकअप करणं अजिबात पसंत नाही. कोणत्याही प्रकारच्या आउटफिटवर ती अतिशय कमी आणि मोहक स्वरुपातील मेकअप करते. साधा आणि बेसिक मेकअप करणं तिला पसंत आहे. पण या मोनोक्रोमॅटिक पोषाखावर तिनं मीराने किचिंतसा हेवी मेकअप केला होता. या ड्रेसवर तिनं पर्ल ड्रापडाउन ईअरिंग्ससह डॅनी ब्रेसलेट, काजळ, लिपस्टिक आणि बीमिंग हाइलाइटर अशा पद्धतीचा मेकअप केला होता. ज्यामुळे तिला आकर्षक लुक मिळाला आहे.

(भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांच्या ग्लॅमरस पत्नी, ज्या आहेत जगभरात प्रसिद्ध)

मीरा राजपूतच्या या कुर्ता सेटची किंमत ६२ हजार रुपये एवढी असल्याचे समजते. यामध्ये ३९ हजार ५०० रुपयांचा कुर्ता आणि ओढणी व पँटची किंमत २२ हजार ५०० रुपये असल्याचे म्हटलं जात आहे.

(दीपिका पादुकोणचा ‘हा’ ग्लॅमरस अवतार पाहुन नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या अशा प्रतिक्रिया, म्हणाले…)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *