शिमला मिरची रायता, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

Spread the love

How to make: शिमला मिरची रायता, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

Step 1: ओल्या नारळाची पेस्ट वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यामध्ये ३/४ (तीन चतुर्थांश) कप किसलेले नारळ, एक चमचा जिरे, एक चमचा मोहरी, तीन हिरव्या मिरच्या आणि चिमूटभर हिंग एकत्र घ्या व सर्व सामग्री वाटून पेस्ट तयार करा.

Step 2: शिमला मिरची फ्राय करा

आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग, एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून परतून घ्या. यानंतर आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने तेलात फ्राय करा. थोड्या वेळानं चिरलेली शिमला मिरची मिश्रणात घाला आणि परतून घ्या. यानंतर चवीनुसार मीठ घालून शिमला मिरची चार ते पाच मिनिटांसाठी शिजू द्या.

capsicum

Step 3: खोबऱ्याची पेस्ट

मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट पॅनमध्ये मिक्स करा. त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री पुन्हा ढवळून घ्या.

ground paste

Step 4: मिश्रणात दही मिक्स करा

गॅस बंद करा आणि तयार केलेला मसाला रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेऊन द्या. आता सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढा व वरून एक कप दही मिक्स करा.

add curd

Step 5: बिर्याणी, पुलावसोबत रायत्याचा घ्या आस्वाद

तयार आहे शिमला मिरची रायता. बिर्याणी, पुलाव किंवा प्लेन राइससोबतही तुम्ही ही कोशिंबीर खाऊ शकता.

शिमला मिरची रायता


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *