शिल्पा शेट्टीनं आपल्या ६ महिन्यांच्या लेकीसाठी तयार करून घेतला स्पेशल ड्रेस

Spread the love

सर्वसामान्यांनप्रमाणेच बॉलिवूडकर देखील गणेशोत्सव जल्लोषात साजरा करताना दिसत आहेत. प्रत्येक वर्षी लाडक्या बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत केलं जाते. पण यंदा करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून सण-समारंभ साधेपणाने साजरे केले जात आहेत. पण गणेशोत्सवासाठी असलेला भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रानेही (Shilpa Shetty- Kundra) गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले होते.


बाप्पाच्या आगमनामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे,उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिल्पा शेट्टीनं थाटामाटात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आणि आपली लाडकी लेक समिशासह गणेशोत्सव अनोख्या अंदाजामध्ये साजरा केला. शिल्पाच्या लेकीचा हा पहिलाच गणेशोत्सव. यासाठी तिनं समिशासाठी एक खास ड्रेस तयार करून घेतला होता. हा ड्रेस शिल्पाच्या आउटफिटसह मिळताजुळता होता.
(Importance Of Nath नथीचा नखरा! नथ घालण्याची बदललेली फॅशन)

गणेश पूजनाच्या एक दिवसापूर्वीच शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एकूण तीन व्हिडीओ शेअर केले होते. ज्यामध्ये बॉलिवूड डिझाइनर पुनीत बलानाकडून पाठवण्यात आलेले आउटफिट दिसत होते. डिझाइनरने शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबासाठी कपडे डिझाइन केले होते. ज्यामध्ये शिल्पा, राज आणि वियानच्या शानदार आउटफिट्ससह समीशाच्या कपड्यांचाही समावेश होता. पण समिशाच्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. गणेश पूजेसाठी समिशा कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करणार आहे, याबाबतचा व्हिडीओ शिल्पा शेट्टीने शेअर केला होता.
(ईशा अंबानीने लग्नासाठी फॉलो केला होता आईसारखा ब्रायडल लुक,पाहा ३५ वर्षांपूर्वीचे हे फोटो)

पाहा शिल्पा शेट्टीने शेअर केलेला व्हिडीओ


शिल्पाच्या आउटफिटबाबत सांगायचे झाले तर उत्सवासाठी तिने ब्लॉक प्रिंट असणाऱ्या पलाझो सेटची निवड केली होती. ज्यावर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचे नक्षीकाम करण्यात आले होते. शिवाय, आउटफिटला मोनोग्राम टच देत पलाझो पँटला कुर्त्यासोबत मॅचिंग लुक देण्यात आला होता. यावर बुटी प्रिंट आणि मॅचिंग बेल्ट देखील दिसत आहे.

(लग्नासाठी लेहंगा, साडी खरेदी करण्यावरून आहे गोंधळ? मग हे नक्की वाचा)


या ड्रेसवर तिने स्टेटमेंट ईअररिंग परिधान केले आहेत.

दुसरीकडे, वियान आणि राज कुंद्राचे कपडे देखील शिल्पा शेट्टीच्या आउटफिटशी मॅचिंग होते. यापूर्वीही कित्येकदा शिल्पा शेट्टीचं संपूर्ण कुटुंब एकसारख्याच कपड्यांमध्ये दिसले आहेत. २०१९ मधील गणेशोत्सवामध्येही त्यांनी अशीच काहीशी वेशभूषा परिधान केली होती. दरम्यान शिल्पा शेट्टी आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते.
(आराध्याने आई ऐश्वर्या रायला अशी केली होती मदत, फोटो पाहून चाहते म्हणाले…)
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *