श्रीदेवींच्या लेकींची चर्चा! जान्हवी-खुशीने आपल्या स्टाइलने वेधून घेतले सर्वांचं लक्ष

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्रींनी यंदाच्या दिवाळीसाठी देखील नेहमी प्रमाणे आकर्षक आणि हटके वेशभूषेची निवड केली होती. सोशल मीडियावर एकापेक्षा एक सुंदर आउटफिट्स पाहायलाही मिळाले. यामध्ये प्रियंका चोप्रापासून ते दीपिका पादुकोण यासह अन्य अभिनेत्रींच्या नावाचाही समावेश आहे. पण या सर्वांवर जान्हवी आणि खुशी कपूरची स्टाइल भारी पडल्याचे दिसलं.

यंदाच्या दिवाळीसाठी जान्हवी कपूर आणि खुशी कपूरने सुंदर व आकर्षक पारंपरिक कपड्यांची निवड केली होती. सोशल मीडियावर तुम्ही प्रत्येक सेलिब्रिटीचा दिवाळी लुक पाहिल्यास, त्यामध्ये या बहिणींची वेशभूषा सर्वात मोहक व सुंदर होती, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
(फोटो क्रेडिट : इन्स्टाग्राम आणि योगेन शाह)
(करीना कपूरने पुन्हा सर्वांचं लक्ष घेतलं वेधून, ‘या’ आकर्षक ड्रेसमध्ये दिसतेय सुपर स्टायलिश)

​क्लासिक पिवळ्या रंगाची साडी

जान्हवी कपूरने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून पारंपरिक सिक्स यार्ड आउटफिटची निवड केली होती. या अभिनेत्रीने दिवाळी सणासाठी क्लासिक येलो सिल्क पॅटर्न साडी नेसली होती. साडीच्या बॉर्डरवर गोल्डन जरी वर्क तुम्ही पाहू शकता. हेच डिझाइन तिनं परिधान केलेल्या हाफ स्लीव्ह्ज ब्लाउजवरही दिसतंय. जान्हवीने मनीष मल्होत्राचे लेबल असलेले दागिने देखील परिधान केले होते.

(काजल अग्रवालचा सुंदर ब्रायडल लुक, लेहंगा तयार करण्यासाठी लागले इतके दिवस)

​कमीत कमी ज्वेलरी लुक

जान्हवीने या सुंदर साडीवर कमीत कमी दागिने परिधान केले होते. तिनं गोल्ड अँड पर्लचे डँगलर्स आणि मॅचिंग फोर फिंगर रिंग या दागिन्यांची निवड केली होती. अभिनेत्रीनं लाइट वेव्स हेअर स्टाइल केली होती. तर लाइट टोन मेकअप करत तिनं केवळ गाल व डोळ्यांचा भाग हाइलाइट केला होता. या साडीवर जान्हवीने स्ट्रॅप हाय हील्स घातले होते.

(सारा अली खान व पूजा हेगडेच्या ड्रेसची एकसारखीच स्टाइल, नेमकं कोणी केलंय कोणाला कॉपी?)

​खुशीची पारंपरिक वेशभूषा

खुशी कपूरने देखील डिझाइनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधूनच आउटफिटची निवड केली होती. खुशीने दिवाळीसाठी मनीषचं लेटेस्ट कलेक्शन रूहानियतमधून गरारा निवडला. या आउटफिटमध्ये डबल लेअर सदरी जॅकेट होते, पेशवाज कुर्ता आणि त्याखाली फ्लोरलेंथ गरारा होता.

(Bridal Look ‘या’ नववधूने संगीत सोहळ्यासाठी फॉलो केली अनुष्का शर्माची स्टाइल, पाहा फोटो)

जरी वर्कमुळे मिळाला आकर्षक लुक

खुशीने परिधान केलेल्या पारंपरिक कपड्यांवर बारीक स्वरुपातील जरी वर्क करण्यात आलं होतं. यामुळे आउटफिटला मोहक लुक मिळाला आहे. निळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये रंगीबेरंगी फॅब्रिकही जोडण्यात आलं होतं. सिल्क मेड आउटफिटवर टूल मेड दुपट्टा देण्यात आला होता. यावरही जरी वर्कने बॉर्डर तयार करण्यात आली होती. खुशीने चोकर नेकपीस, मॅचिंग रिंग, लो बन आणि लाइट टोन मेकअप अशी हटके स्टाइल केली होती.

(दीपिका पादुकोणचा ‘हा’ ग्लॅमरस अवतार पाहुन नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या अशा प्रतिक्रिया, म्हणाले…)

​साराचे देखील ‘रूहानियत’ कलेक्शनमधील आउटफिट

अशाच रंगसंगतीच्या कपड्यांमध्ये सारा अली खानचे फोटो देखील पाहायला मिळाले. साराने देखील मनीष मल्होत्राच्या ‘रूहानियत’ कलेक्शनमधील आउटफिट परिधान केले होते. साराने सिल्क पॅटर्नमधील निळ्या रंगाचा कुर्ता आणि चुडीदार पायजमा घातला होता. तिच्या कपड्यांवरही तुम्ही जरी वर्क पाहू शकता. तिच्या ड्रेसच्या दुपट्ट्यावरही जरी वर्क करण्यात आलं होतं. तसंच साराने आउटफिटसाठी मनीष मल्होत्राच्या ‘Raniwala 1881’ कलेक्शनमधील ईअररिंग्सचीही निवड केली होती.

(जेनेलियाचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पती रितेशनंही व्यक्त केली अशी प्रतिक्रिया)

​ताराचा फेस्टिव्ह लुक

तारा सुतारियाने देखील मनीष मल्होत्राच्या लेटेस्ट कलेक्शनमधूनच दिवाळीसाठी पोषाख निवडला होता. या अभिनेत्रीने लाल रंगाचा प्लीटिड डिझाइन कुर्ता परिधान केला होता. या कुर्त्यावर डीप यू कट नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्ज डिझाइन होतं. तसंच यावर अँटीक जरी वर्क देखील करण्यात आलं होते. कुर्त्यासह तिनं हिरव्या रंगाची पँट मॅच केली, ज्यावर फ्लेअर्ड डिझाइन होतं. तसंच या ड्रेसमध्ये गडद निळ्या रंगाचा दुपट्टा होता. ताराने या लुकसाठी गोल्डन झुमके आणि क्लासिक बन हेअरस्टाइ केली होती.

(करीना कपूरच्या स्टायलिश अवतारावर भारी पडला मीरा राजपूतचा मोहक लुक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *