सचिन तेंडूलकरच्या १३१ किलोच्या चाहत्याने केलं तब्बल ६० किलो वजन कमी! काय आहे वेट लॉस सिक्रेट?

Spread the love

क्रिकेटमधील देव मानला जाणारा सचिन तेंडूलकर भले कोणाची प्रेरणा नाही? “आयुष्यात फिट राहणं सर्वात गरजेचं असतं” हा आपल्या आदर्श असणा-या व्यक्तीचा एक मेसेज त्यावेळी ३१ वर्षांचा असणा-या अमेय भारत भागवतसाठी आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कधीकाळी बटर चिकन क्षणार्धात फस्त करणा-या या पट्ट्याचं आजच्या घडीला जे डाएट प्लान आहे त्यानुसार त्याच्या समोर अख्खी कोंबडी ठेवली तरी त्याचं मन व संयम ढळत नाही.

एवढेच नव्हे तर त्याने अनेक अडथळ्यांना ताटा-बाय बाय केलं आहे. अमेयची Weight loss story अप्रतिम आहे. अमेयला पाहून आता विश्वासच बसणार नाही की त्याचं वजन कधीकाळी १३१ किलो होतं. एका कॅफेचा मालक आणि फ्रिलान्स लेखक असलेल्या अमेयने आपली फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी आपल्या तोंडाने इथे सांगितली आहे.

कसा आला टर्निंग पॉइंट?

सचिन तेंडूलकरनी कायमच मला प्रेरित केलं आहे. मी त्यांची पूजा करते हे म्हटलं तरी योग्य होईल. मला त्यांच्या व्यापारातून कपडे खरेदी करायचे होते पण मला माझ्या मापाचे (size) कपडे काही मिळालेच नाही. XXXL ही साइज देखील मला येत नव्हती. मला खूप दु:ख झालं आणि स्वत:चीच लाज देखील वाटली. सचिन तेंडूलकर सोशल मीडियावरही एक मोहीम देखील राबवतात आणि तेथे ते लोकांना ‘तंदुरुस्त राहा, निरोगी रहा’ असा देतात. मी माझ्या Fb प्रोफाइलवरून त्यांची ती इमेज टाइमलाईनवर शेअर केली आणि कॅप्शन लिहिलं की, “देव बोलला फिट व्हायचं तर मग व्हायचंच” त्यावेळी मला गुडघ्याच्या समस्या, हायपरटेन्शन, अॅसिड रिफल्क्स, अॅलर्जिक ब्राँकायटिस अशा बर्‍याच आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण झाल्या होत्या आणि सर्वांसाठी औषधे दिली गेली होती. बहुतांश वेळा मला धाप लागायची आणि काही पाय-या चढल्यानंतरही वेदना जाणवू लागायच्या. त्याचवेळी मी समजून गेलो होतो की आता अजून दुर्लक्ष करून चालणार नाही. बस्स.. तेव्हापासूनच माझ्या Weight loss story ची सुरूवात झाली. आता मी ६० किलो वजन कमी करून ७१ किलोचा आहे. आता मी ५० मिनिटांत १० किलोमीटर धावू शकतो आणि कोणत्याही ब्रेकविना १०० किलोमीटर पर्यंत सायकल चालवू शकतो.

(वाचा :- थकल्यानंतरही लागत नाही शांत सुखाची झोप? मग झोपण्याआधी तुम्ही करताय ‘या’ चुका!)

अमेयचं रोजचं डाएट

  1. ब्रेकफास्ट – ४० ग्रॅम ओट्स, ५० ग्रॅम नट्स, ५ ग्रॅम ऑलिव्ह ऑइल, ७५ ग्रॅम लसूण, टोमॅटो आणि कांदा
  2. लंच – ८० ग्रॅम भाकरी, ३०० ग्रॅम भाजी, २०० ग्रॅम चिकन, १२५ ग्रॅम पनीर, ५० ग्रॅम चंक्स, १०० ग्रॅम मटण,
  3. डिनर – १५० ग्रॅम भात, ६ अंड्यांचा सफेद भाग, २५ ग्रॅम मल्टीग्रेन पावडर, २०० ग्रॅम डाळ, सलाड व स्प्राउट्स

(वाचा :- सतत एकटेपणा व मानसिक स्ट्रेस जाणवतोय? मग यावर मात करण्यासाठी ट्राय करा ‘या’ खास टिप्स!)

वर्कआऊट व फिटनेस सिक्रेट

आपल्या Weight loss story अंतर्गत अमेय आठवड्यातून चार वेळा इन्टेन्स मसल्स ट्रेनिंग घेतो. आठवड्यातून एकदा इन्टेन्स कॉर्डियो अॅक्टिव्हिटी व आठवड्यातून दोन वेळा सोपी कॉर्डियो अॅक्टिव्हिटी! तो म्हणतो की भूक, मजबूती, पक्का विचार हे सर्व आपल्या विचारांचे खेळ आहेत. आपल्याला फक्त स्वत:ला पुश करायचं असतं. आपलं शरीर आपोआप त्या हिशोबाने अॅडजस्ट होतं. मी फक्त माझी बेस्ट वर्जन बनू इच्छितो. फिटनेस आपली तात्पूर्ती गरज नव्हे तर कायमची लाइफस्टाइल असली पाहिजे. मी माझ्या वेळापत्रकानुसार माझी फिटनेस पथ्यांची योजना आखली आहे.

(वाचा :- अशा पद्धतीने केळी खाल्ल्यास करतात Fat burner चं काम, खाताच होईल वेट लॉस!)

मोटिवेशन सिक्रेट

मी स्वत:ला बेस्ट वर्जन होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी किंवा ध्येय म्हणून ठेवतो. आपण आपल्या ध्येयापासून मागे हटू नका आणि शिस्तीत त्याचे अनुसरण करा. मला तीन महिन्यांत सकारात्मक बदल दिसून आल्यामुळे मला स्वतःलाच प्रोत्साहन मिळत जाते. जर तीन महिन्यांत काहीच बदल दिसला नाही तर ते मला पुन्हा पुढे चालत राहण्यासाठी प्रवृत्त करत राहतं. माझ्या Weight loss story मध्ये Fitter चं मोठं योगदान आहे. जो एक ऑनलाइन फिटनेस प्लॅटफॉर्म आहे. तिथे टान्सफॉर्मेशन कहाण्या बघून माझा ध्येयावरील फोकस अजूनच वाढत जातो. याव्यतिरिक्त सचिन तेंडूलकरमुळे माझा फोकस कधी हटतही नाही.

(वाचा :- स्त्रियांमध्ये हमखास उद्भवते White Dischargeची समस्या, ‘या’ घरगुती उपायामुळे मिळू शकतो आराम!)

लाइफस्टाइलमध्ये काय बदल केले व यातून काय शिकला?

माझ्या Weight loss story चा जेवण हा सर्वात महत्तवाचा भाग आहे. जंक फूड खाणं मी पूर्णपणे सोडून दिलं आहे. मी आता कायम सात्विक व पौष्टिक जेवणच खातो जेणे करून मला कॅलरीजवर कंट्रोल ठेवता येईल. गेल्या दिड वर्षापासून मी फास्ट फुड, जंक फुड, पाकिटबंद पदार्थ, बेकरी प्रोडक्टस, गोड, बटर चिकन, रोटी, नान, पराठा, पेये, तळलेले पदार्थ यातील कोणतीच गोष्ट खाल्ली नाही. हेल्थच्या समस्यांमुळे मला खूपच त्रास होत होता. प्रवास करताना मला माझ्याबरोबर औषधांचा एक मिनी बॅकपॅक सोबत घ्यावा लागायचा आणि तेही फक्त ३१ वर्षांचा असताना! पण हो, सर्वच पदार्थ आपल्यासाठी वाईट नसतात आणि हेल्दी असणारे पदार्थ कधीच बोरिंग नसतात हेच मी या वेट लॉस प्रवासात शिकलो. पण जे काही खाणार असाल ते योग्य प्रमाणात खा. पौष्टिक डाएट म्हणून तुम्ही खूप काही टेस्टी व हेल्दी बनवून खाऊ शकता.

(वाचा :- Periods पुढे ढकलण्यासाठी करू नका औषधांचे सेवन, ट्राय करा ‘हे’ सुरक्षित घरगुती उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *