सणसमारंभासाठी तयार करा पेरूची स्पेशल खीर

Spread the love

How to make: सणसमारंभासाठी तयार करा पेरूची स्पेशल खीर

Step 1: पेरू सोलून घ्या

सर्व प्रथम तीन मध्यम आकाराचे पेरू घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर त्याची साल काढा. पेरू मध्यभागी कापा आणि एका चमच्याच्या मदतीनं त्यातील गर आणि बिया काढून घ्या. यानंतर लहान- लहान आकारामध्ये पेरू कापून घ्या आणि मिक्सर वाटून त्याची पेस्ट तयार करा.

Step 2: गुळाचा पाक तयार करा

एक भांडे घ्या. त्यामध्ये एक कप गूळ आणि आवश्यकतेनुसार पाणी एकत्र घ्या. गॅसच्या मध्यम आचेवर गुळाचा पाक तयार करा. पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण उकळू द्यावे. थोड्या वेळाने गॅस बंद करा आणि पाक थंड होऊ द्यावा.

गुळाचा पाक

Step 3: काजू, मनुके फ्राय करून घ्या

एका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करत ठेवा. यामध्ये काजू आणि मनुके फ्राय करून घ्या. फ्राय केलेले काजू आणि मनुके वेगळ्या डिशमध्ये ठेवा.

काजू फ्राय करा

Step 4: पेरूची पेस्ट शिजवून घ्या

याच पॅनमध्ये पेरूची पेस्ट तुपामध्ये परतून घ्या आणि अंदाजे १० मिनिटांसाठी ही पेस्ट शिजू द्यावी. आता पॅनमध्ये थोडे-थोडे करून दूध देखील मिक्स करा आणि मिश्रण ढवळत राहा.

तुपामध्ये पेरूची पेस्ट परतून घ्या

Step 5: गुळाचा पाक मिक्स करा

आता मिश्रणामध्ये गुळाचा पाक आणि चवीनुसार वेलची पावडर घाला. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या. तीन ते चार मिनिटे खीर उकळू द्यावी. थोड्या वेळाने यात फ्राय केलेले काजू आणि मनुके देखील मिक्स करा. तयार झाली आहे आपली पेरूची खीर. जेवणानंतर या स्वीट डिशचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

पेरूची खीर

Step 6: पेरूची खीर : VIDEO द्वारे पाहा संपूर्ण पाककृती

रेसिपीमध्ये साखरेऐवजी गुळाचाच वापर करावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *