सना खानची त्वचा आहे प्रचंड मऊ व तजेलदार, मुरुम न येण्यासाठी सकाळी उठून करते ‘हे’ महत्त्वाचे काम

Spread the love

डबल क्लींझिंग

सना आपल्या ब्युटी केअर रुटीनची सुरुवात डबल क्लींझिंगपासून करते. मेकअप करण्याची सवय असल्याने तिला डबल क्लींझिंग करण्याची आवश्यकता भासते. सना खान दोन क्लींझर प्रोडक्टच्या मदतीने आपला चेहरा स्वच्छ करते, याबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी ती ऑइल बेस्ड आणि वॉटर बेस्ड क्लींझरचा उपयोग करते.

(करीना-अनुष्‍कासह अन्य सेलिब्रिटीही करतात मुरुमांचा सामना, करतात हे नैसर्गिक उपाय)

​​स्क्रबिंग

आपल्या चेहऱ्यावर मुरुम येऊ नये, यासाठी सना प्रत्येक दिवशी स्क्रबिंग करते. रोमछिद्रांमध्ये जमा झालेली दुर्गंध, धूळ, मातीचे कण स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग करणं आवश्यक आहे. स्क्रब ट्रीटमेंट त्वचेवरील मृत पेशी दूर करण्याचंही कार्य करते. ती बाजारातील स्क्रब प्रोडक्टव्यतिरिक्त घरामध्ये तयार केलेल्या स्क्रबचाही उपयोग करते. सना कॉफी, साखर आणि नारळाच्या तेलापासून घरच्या घरी स्क्रब तयार करते.

(त्वचा भाजणे म्हणजे नेमके काय? यावर कोणते उपचार करावेत, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती)

​टोनिंग

सना आपल्या चेहऱ्याची त्वचा टोन करण्यास कधीही विसरत नाही. टोनरमुळे आपली त्वचा सैल पडत नाही. रोमछिद्रांचा आकार कमी होतो. यानंतर ती फेशिअल एसेंसचाही वापर करते. यादरम्यान आपण त्वचेवर एसेंशिअल ऑइल लावू शकता. पण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार एसेंशिअल ऑइलचा वापर करणं आवश्यक आहे.

(Natural Skin Care हिवाळ्यात त्वचा मऊ राहण्यासाठी वापरा हे घरगुती बॉडी बटर)

​मॉइश्चराइझर

त्वचा तरुण दिसावी, यासाठी सना मॉइश्चराइइरचा वापर करते. त्वचेला मॉइश्चराइझरची आवश्यकता असो किंवा नसो, पण नियमित स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चराइझरचा वापर होणे आवश्यक आहे. त्वचा तेलकट असल्यास किंवा चेहऱ्यावर मुरुम अधिक असल्यास जेल बेस्ड मॉइश्चराइइरचा वापर करावा.

(थंडीत बॉडी मसाज का करावा, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ? जाणून घ्या)

​​सनस्क्रीन

ऋतू कोणताही असो, सना आपल्या त्वचेवर सनस्क्रीनचा वापर करतेच. हा आपल्या स्किन केअर रुटीनमधील महत्त्वाचा भाग आहे. सनस्क्रीनमुळे आपल्या त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. मुरुमांची समस्याही उद्भवत नाही.

नाइट स्किन केअर रुटीन : सना रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर नाइट क्रीम लावते. यामुळे तिची त्वचा निरोगी राहते.

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या व्यक्तींचे स्किन केअर रुटीन फॉलो करण्याची चूक करू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *