‘सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना’, अली फजलच्या टी-शर्टनं वेधून घेतलं लक्ष

Spread the love

​स्टाइलऐवजी कम्फर्टेबल लुक

अभिनेता अली फजल प्रेयसी आणि अभिनेत्री रिचा चड्ढासोबत मुंबई विमानतळावर दिसला होता. आपल्या कूल लुक आणि वाइब्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या या कपलचा यावेळेस अवतार अतिशय साधा होता. दोघांनीही लूज फिटिंग आउटफिट परिधान केलं होतं. या वेशभूषेवरून दोघांनी स्टाइलऐवजी कम्फर्टेबल लुकची निवड केल्याचे दिसत होतं. दरम्यान चेहरे झाकलेले असल्याने अली आणि रिचाला पटकन ओळखणं थोडं कठीण होतं. (फोटो क्रेडिट : योगेन शाह)

(अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडची हटके फॅशन, तिचे स्टायलिश फोटो पाहिले का?)

​रिचाचा पलाझो आणि टी- शर्ट लुक

पलाझो आणि टी शर्ट अशा साध्या लुकची अभिनेत्री रिचा चड्ढाने निवड केली होती. तिने निळ्या रंगाचं ए सिमेट्रिकल पलाझो परिधान केलं होतं. पलाझोचं डिझाइन धोती पॅटर्नसारखे दिसत आहे. पलाझोवर तुम्ही रफल्स डिझाइन पाहू शकता. यावर रिचाने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते. शिवाय तिने ‘टाय अँड डाय’ पॅटर्न स्कार्फ देखील कॅरी केला होता. रिचाने आउटफिटसह पायामध्ये गोल्डन स्लिप ऑन्स, काळ्या रंगाची कॅप आणि चॉकलेटी रंगाचे गॉगल घातलं होते. (फोटो क्रेडिट : योगेन शाह)

(मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख)

​पँट आणि टी-शर्ट लुक

अली फजलने खाकी रंगाची अँकल लेंथ लूज फिटिंग पँट घातली होती. ही वेलव्हेट पँट त्यानं पायाजवळ दुमडली होती. अलीने खाकी रंगाच्या पँटवर काळ्या रंगाचे हाफ स्लीव्ह्ज टी-शर्ट परिधान केले होतं. यावर पँटच्या रंगाशी मिळता – जुळता स्टोल देखील त्याच्या गळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आपला साधा लुक परफेक्ट दिसण्यासाठी त्यानं डोक्यात कॅप देखील घातली होती. तर चेहरा मास्क ऐवजी कापडाने झाकला होता.

(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)

​‘सपनों का मर जाना…’

दरम्यान अली फजलने परिधान केलेले टी – शर्ट सध्या चर्चेत आले आहे. या टी शर्टवर ‘सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना’ असा प्रिटेंड मेसेज होता. सोबत उर्दू आणि अन्य भाषेमध्येही काही गोष्टी प्रिटेंड स्वरुपात दिसत होत्या. पण स्टोलमुळे ते शब्द स्पष्टपणे दिसत नाहीत. अलीच्या टी-शर्टवर जे काही लिहिले होते, ते सध्याच्या परिस्थितीशी मिळते जुळते आहे का,अशी चर्चा केली जातेय. पण टी शर्टवरील संदेशामागे या अभिनेत्याच्या नेमक्या कोणत्या भावना दडल्या गेल्या आहेत, याबाबतची माहिती तोच सांगू शकतो.

(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)

​स्टायलिश कपल

दरम्यान या बॉलिवूड (Bollywood) कपलमधील बाँडिंग सर्वांनाच माहिती आहे. रिचा चड्ढा (Richa Chadda) आणि अली फजल (Ali Fazal) एप्रिल महिन्यामध्ये लग्न करणार होते. पण लॉकडाउनमुळे त्यांचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) या कपलचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला नाही. पण हे दोघंही हटके आणि फॅशनेबल स्टाइलसाठी ओळखले जातात.

(जेव्हा सनी लियोनीला स्टायलिश ड्रेसवरून करण्यात आलं होतं ट्रोल)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *