समंथापासून ते सौंदर्या रजनीकांपर्यंत, या अभिनेत्रींच्या साखरपुड्याच्या अंगठीवर करण्यात आला होता इतका खर्च

Spread the love

कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न असते तेव्हा आपण लग्नातील पोषाखापासून ते लग्नस्थळ, सजावट, फोटोग्राफी, साखरपुड्याच्या अंगठीचं डिझाइन इत्यादी गोष्टींची आयडिया घेण्यासाठी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रींचे (Bollywood) इन्स्टाग्राम अकाउंट तपासून पाहतो. कारण प्रत्येकाला लग्नसोहळ्यामध्ये हटके आणि सुंदर दिसायचे असते. लग्न घरातल्या मुलाचे असो किंवा मुलीचे, हे कार्य प्रत्येकासाठी खास असते. दरम्यान, या सर्व गोष्टीमध्ये साखरपुड्यासाठी कशा पद्धतीच्या डिझाइनची अंगठी निवडायची? यावरून मात्र ‘वर’ आणि ‘वधू’ अत्यंत गोंधळलेले असतात.

अंगठीचे डिझाइन, खड्यांचा रंग, कॅरेटपर्यंत… एका परफेक्ट अंगठीची निवड करताना बरेच पैलू लक्षात ठेवावे लागतात. इतक्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतरही काही- न – काही तपासणे राहून जातेच. यासाठी आज आम्ही तुम्हाला साउथमधील काही लोकप्रिय अभिनेत्रींच्या साखरपुड्यातील अंगठींबाबतची माहिती देणार आहोत.
(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)

​समंथा अक्किनेनी

साउथ इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री समांथा अक्किनेनी एक स्टाइल आयकन म्हणून देखील प्रसिद्ध आहे. टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री अशी समांथाची ओळख आहे. एखाद्या सिनेमाच्या प्रमोशनसाठीचा लुक असो किंवा पती नागा चैतन्यसोबत हॉलिडे एन्जॉय करताना दिवस असो… आपल्या स्टाइलमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची पुरेपूर काळजी समांथा घेते. स्टाइल स्टेटमेंट चर्चेत राहील, असे आउटफिट ती कॅरी करते. असेच काहीसे तिच्या साखरपुड्याच्या अंगठीच्या बाबतीतही पाहायला मिळाले. २०१७मध्ये समांथाने स्वतःचे थाटामाटात लग्न थाटले. लग्नकार्याच्या दिवशी तिनं हिऱ्याची अंगठी परिधान केली होती. ही अंगठी प्रचंड महागडी होती.

(करीनापासून ते रायमापर्यंत, या अभिनेत्रींनी फोटोशूटसाठी घेतला असा बोल्ड निर्णय)

​असिन थोट्टूमकल

साउथ इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्येही आपल्या हटके स्टाइलसाठी असिन थोट्टूमकल ओळखली जाते. असिनने २०१६ साली उद्योगपती राहुल शर्मासोबत लग्नगाठ बांधली. असिनने आपल्या लग्नाच्या वेळेस २० कॅरेटची सॉलिड सॉलिटेअर असणारी अंगठी परिधान केली होती. खास असिनसाठी ही डिझाइनर अंगठी बेल्जियमहून मागवण्यात आली होती. एवढंच नव्हे तर राहुलने या अंगठीवर एक खासगी संदेश देखील लिहिला होता. या अंगठीची किंमत जवळपास ६ कोटी रुपये एवढी होती, असे म्हटलं जाते.

(Nita Ambani नीता अंबानींच्या वॉर्डरोबमध्ये नेहमी मिळतील या पाच गोष्टी)

​सौंदर्या रजनीकांत

साउथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या रजनीकांतने ११ फेब्रुवारी रोजी अभिनेता आणि उद्योगपती विशगन वनंगमुडीसोबत विवाह केला होता. लग्नसोहळ्यातील सर्व समारंभांसाठी सौंदर्याने एकापेक्षा एक कपडे आणि दागिने परिधान केले होते. पण यामध्ये सर्वाधिक चर्चा तिच्या अंगठीचीच झाली. तिच्या अंगठीच्या डिझाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. सौंदर्या रजनीकांतने साखरपुड्यासाठी पियर शेप मधील डायमंड रिंगची निवड केली होती. या अंगठीच्या चारही बाजूंना छोटे-छोटे अनकट डायमंड तुम्ही पाहू शकता. दरम्यान सौंदर्याच्या या अंगठीची किंमत आतापर्यंत समोर आलेली नाही. पण अंगठीची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे म्हटलं जाते.

(सिनेमातील त्या सीनसाठी जेव्हा मनीष मल्होत्राने वापरलं चक्क राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र)

​मिहिका बजाज

‘बाहुबली’ मधील भल्लालदेव म्हणजेच राणा डग्गुबाती आणि त्याची प्रेयसी मिहिका बजाजने ८ ऑगस्ट २०२० मध्ये लग्न केले. दोघांनीही हैदराबाद येथील रामानायडू स्टुडिओमध्ये आपापल्या परंपरेनुसार लग्न थाटले. लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी म्हणजेच हळद, मेहंदीपासून ते संगीत कार्यक्रमासाठी मिहिका बजाजने एकापेक्षा एक सुंदर आउटफिट आणि ज्वेलरीची निवड केली होती. पण तिच्या साखरपुड्याच्या अंगठीचीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होती. मिहिकाने आपल्या साखरपुड्यासाठी अनकट डायमंड डिझाइन असणाऱ्या अंगठीची निवड केली होती.

(करीना कपूरचे शूटिंगमधील फोटो केले शेअर, सुंदर फोटो पाहून चाहते झाले घायाळ)

​ज्योतिका सूर्या

साउथमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्योतिकाने ११ सप्टेंबर २००६ मध्ये अभिनेता सूर्यासोबत धुमधडाक्यात लग्न केलं होतं. आपल्या साखरपुड्याच्या दिवशी या अभिनेत्रीने एक सुंदर डबल बँडेड असणारी हिऱ्याची अंगठी परिधान केली होती. ज्योतिकासाठी ही अंगठी व्हेनिसहून खरेदी करण्यात आली होती. दरम्यान, साउथ इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये ज्योतिकाच्या नावाचा समावेश आहे.

(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *