समाजाच्या ‘या’ प्रश्नांमुळे स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही भोगावा लागतो मनस्ताप!

Spread the love

आई आणि बायकोपैकी कोणाची निवड करशील?

हा प्रश्न अनेकदा मुद्दाम पुरुषाची खोड काढण्यासाठी विचारला जातो. कधी काही जण मुद्दाम हा प्रश्न आई व बायकोसमोर विचारतात आणि हा प्रश्न विचारण्यामागे प्रश्न विचारणाऱ्याचा वाईट हेतू सुद्धा असू शकतो. पण प्रत्येक पुरुषाला आयुष्यात एकदा तरी या प्रश्नाला तोंड हे द्यावेच लागते. अशावेळी पुरुष जर हजरजबाबी असले तर बरोबर वेळ मारून नेतो. पण जर साध्या स्वभावाचा पुरुष असेल तर तो मात्र गोंधळतो. अशावेळी पुरुषाने हसून दोघींचे महत्त्व अधोरेखित करावे आणि दोघीही मला हव्या असल्याचे अभिमानाने कबूल करावे.

(वाचा :- ‘या’ कारणामुळेच आजची तरुण मंडळी अरेंज्ड मॅरेजपेक्षा प्रेमविवाहावर ठेवतात विश्वास!)

तुझी बायको परमिशन देईल का?

हा प्रश्न मित्रच गमतीने विचारतात. लग्नानंतर साहजिक मित्रांसोबतच्या नात्यामधील स्वातंत्र्य कमी झालेलं असतं. उठसुठ कधीही जाऊन मित्रांना भेटणे, सतत फोनवर गप्पा मारणे, त्यांच्या सोबत गेम्स खेळणे या गोष्टी कमी होतात. मित्रांसोबतच्या पार्ट्या, ट्रिप्सवर सुद्धा लगाम बसते. अशावेळी जे सिंगल मित्र असतात ते तुमची खेचायची संधी अजिबात सोडत नाही आणि कुठे जायचा प्लान झाला तर बायको तुझी परमिशन देईल का हा प्रश्न हमखास विचारतात. अशावेळी त्या प्रश्नावर काहीही प्रतिक्रिया न देता गप्प राहणे उत्तम! कारण तुम्हाला ती खरंच परमिशन देईल का हे तुम्हाला सुद्धा माहित नसते.

(वाचा :- तुम्हीही पाहिली का? सोशल मीडियावर पसंतीस उतरलेली बाप्पासाठी केलेली अनोखी सजावट!)

तू घरातली किती कामे करतो?

लग्न झाल्यावर आपल्या बायकोला प्रत्येक कामात साथ देणे आणि तिला मदत करणे हे प्रत्येक नवऱ्याचे कर्तव्य असते आणि त्यात काहीच वावगं नाही. बहुतांश स्त्री पुरुष समानता मानणारे चांगल्या मनाचे पुरुष अगदी बिनदिक्कतपणे बायकोला घर कामात मदत करतात. त्यामुळे जर कोणी असा प्रश्न मुद्दाम विचारला तरी त्याला सडेतोड उत्तर तिथेच द्यावे. जेणेकरून पुन्हा कधी यावरून ती व्यक्ती तुम्हाला चिडवणार नाही आणि तुम्हीही अभिमानाने ही गोष्ट कबूल करायला हवी. कारण कुठेही असे लिहून ठेवलेले नाही की घरकाम फक्त बायकोनेच करायला हवं.

(वाचा :- ‘या’ कारणामुळे पसरली होती अभिषेक-ऐश्वर्या बच्चनच्या घटस्फोटची अफवा!)

बायकोसोबत भांडणे होतात का?

हा प्रश्न तुम्हाला काही जण कुतुहूल म्हणून विचारतात तर काही जण अर्थातच मज्जा घेण्यासाठी. पण हा तुमच्या आयुष्याचा खाजगी प्रश्न असतो आणि तुम्ही त्याचे उत्तर स्वत:पुरतेच ठेवले बरे. कारण भांडणे तर प्रत्येक नवरा बायकोमध्ये होत असतात आणि ही गोष्ट सर्वांनाच माहित असते. मात्र ही खाजगी ठेवलीत तर समोरचा तुमच्या नात्याबद्दल तर्क लावणार नाही. जर तुम्ही विश्वासाने त्याला सगळं सांगितलंत तर कदाचित तो तुमचं नातं पोकळ समजू शकतो. त्यापेक्षा सकारात्मक गोष्टी सांगून आपल्या नात्याचा आदर्श निर्माण करणे उत्तम!

(वाचा :- नाती तुटतात पण प्रेम अतुट राहतं, आशा नेगीचं वक्तव्य का ठरतं खास?)

लग्नात हुंडा मिळाला का?

हा प्रश्न लग्न झाल्या झाल्याच अनेकांकडून हमखास विचारला जातो आणि प्रत्येक पुरुषाला त्याचे मित्र वा नातेवाईकांमधून कोणी ना कोणी विचारतंच. मुळात हुंडा हा कायद्याने गुन्हा असून सुद्धा आजही लोक ती गोष्ट मानतात हीच खेदाची गोष्ट आहे. पण जर तुम्ही अशावेळी त्या माणसाचं हुंड्याबद्दलचं मत बदलण्याचा प्रयत्न करायला हवा आणि अशा गोष्टी समाजासाठी किती वाईट आहेत हे त्याला त्याच्याच भाषेत अगदी शांत राहून समजवायल्या हव्यात. त्याला कळल्या तर ठीक, पण आपण आपले कर्तव्य करावे.

(वाचा :- राशि का कुकर षड्यंत्र सोशल मीडिया पे व्हायरल करनेवाला ‘वो’ कौन है?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *