सर्दी व खोकल्यापासून आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

Spread the love

सर्दी आणि खोकला सध्या जगभरासाठी मोठी समस्या ठरत आहे. दरम्यान कडाक्याच्या थंडीमध्ये तसंच उन्हाळ्यातही सर्दीचा त्रास होऊ शकतो. बदलते हवामान, धूळ, माती, प्रदूषण, थंड खाद्यपदार्थांचे सेवन इत्यादी कारणांमुळे सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवू शकते. यावर आपण घरच्या घरी देखील नैसर्गिक-आयुर्वेदिक उपचार करू शकतो.

याव्यतिरिक्त सर्दी-खोकला होऊ नये, यासाठी स्वच्छता बाळगणं देखील आवश्यक आहे. यासाठी आपले कपडे, वस्तू आणि कपड्यांची योग्य ती स्वच्छता करावी. तसंच बाहेरुन घरी आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत. कधी-कधी ही सामान्य समस्याही भरपूर त्रासदायक वाटते. यापासून सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया रामबाण घरगुती उपचार…
(Health या गोष्टींमध्ये दडलीय तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती)

सर्दी-खोकला झाल्यानंतर होणाऱ्या समस्या

 • डोकेदुखी
 • सर्दी होणे
 • शिंका येणे
 • डोळे जळजळणे किंवा डोळ्यांना खाज येणे
 • शारीरिक वेदना होणे किंवा शरीर जड होणे
 • कफची समस्या
 • ताप येणे

(Pumpkin Seeds Health Benefits नियमित भोपळ्याच्या बियांचे सेवन करण्याचे हे आहेत फायदे, जाणून घ्या)

​मधाचे सेवन

 • मधामध्ये अँटी व्हायरल आणि अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर आहेत. मध हे एक नैसर्गिक औषध आहे. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास आपण दिवसातून दोन ते तीन वेळा मधाचे सेवन करू शकता.
 • दिवसातून दोन ते तीन वेळा आपण एक-एक चमचा मध खाऊ शकता किंवा कोमट दुधामध्ये मध मिक्स करून या दुधाचे सेवन करू शकता. पण खोकल्यासोबत कफ बाहेर पडत असल्यास दूध पिऊ नये.
 • दोन ते तीन वेळा मधाचे सेवन करा. तहान लागल्यास कोमट पाणी प्या आणि घशामध्ये खवखव किंवा दुखत असल्यास तोंडामध्ये लवंग ठेवावी. या सोप्या घरगुती उपचारांमुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याच्या त्रासातून सुटका मिळण्यास मदत मिळेल.
 • मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी मधाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(शरीर फिट ठेवायचंय? प्या १ ग्लास तुळस व ओव्याचं पाणी, जाणून घ्या लाभ)

​मध आणि आल्याचा चहा

आल्यामध्ये अँटी- व्हायरल आणि अँटी -इंफ्लामेट्री गुणधर्म असतात. या घटकांमुळे घशाचे दुखणे, छातीतील वेदना आणि डोकदुखीपासून सुटका होण्यास मदत मिळते आणि सर्दी पसरणारे विषाणू देखील समूळ नष्ट होतात.

(डान्स करा, ताण विसरा! शफल डान्स व हुपिंगचे ‘हे’ आहेत फायदे)

​कसा तयार करायचा चहा?

 • मध आणि आल्याचा चहा तयार करण्यासाठी एक कप पाणी घ्या. त्यामध्ये आल्याचा अर्ध्या इंचाचा तुकडा आणि एक ते दीड चमचा मध मिक्स करा.

चहा तयार करण्याची पद्धत

 • सर्व प्रथम गॅसवर पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेले आले मिक्स करा आणि दोन मिनिटांसाठी पाणी उकळू द्या.
 • यानंतर पाणी गाळून थंड होण्यास ठेवून द्या आणि चहा थंड झाल्यानंतर त्यात मध मिक्स करा. तुमचा मध आणि आल्याचा चहा तयार झाला आहे. सर्दीची समस्या दूर करण्यासाठी या चहाचे आपण दिवसातून दोनदा सेवन करू शकता.

(ट्रेनने प्रवास करताना आरोग्यासाठी अशी घ्या खबरदारी, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती)

​गुळण्या करा आणि गरम पाण्याची वाफ घ्या

 • सर्दी आणि खोकला झाल्यानंतर आपण गरम पाण्याच्या गुळण्या केल्यास आणि गरम पाण्याची वाफ घेतल्यासही आराम मिळेल.
 • सर्दीमुळे घसा खवखवत असेल किंवा घसा दुखत असेल तर गरम पाण्यामध्ये मीठ टाका आणि या पाण्याने गुळण्या करा.
 • सर्दीमुळे नाक बंद झाले असल्यास गरम पाण्याची चेहऱ्यावर वाफ घ्या. हा उपाय केल्यास शरीरात जमा झालेला कफ बाहेर पडेल. श्वासोच्छवास करताना त्रास होणार नाही. घशातील खवखव तसंच वेदना, डोकेदुखीचाही त्रास कमी होईल.

(Health Care : या ६ फायदेशीर कारणांमुळे पुरुषांनी आरोग्यासाठी नियमित केलं पाहिजे अश्वगंधाचं सेवन)

NOTE सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होत नसल्यास याकडे दुर्लक्ष न करता आपल्या ओळखीच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सर्दी-खोकला दूर करण्यासाठी रामबाण घरगुती उपाय

सर्दी-खोकला दूर करण्यासाठी घरगुती उपाय


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *