सांधेदुखीने त्रस्त आहात? मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय!

Spread the love

हे गुण असतात

हळदीचे तेल हे हळदी सारखेच गुणकारी असते. यात शरीरावर येणारी सूज रोखणारे गुण असतात आणि म्हणूंच सांधेदुखीवर हळदीचे तेल रामबाण ठरते. या शिवाय त्वचेवर कोणत्याही प्रकारचे फंगस हळदीच्या तेलाच्या वापरामुळे वाढत नाहीत. तसेच विषाणू आणि जंतू यांना नष्ट करण्याची क्षमता हळदीच्या तेलामध्ये असते. शरीरातील निरुपयोगी झालेल्या पेशींना नीट करण्याची क्षमता सुद्धा हळदीच्या तेलामध्ये आढळून येते. म्हणूनच मंडळी आवर्जून हळदीच्या तेलाचा एकदा तरी सांधेदुखीवर वापर करून पहा.

(वाचा :- Fiber Rich Fruits : ‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!)

त्वचेवर गुणकारी

हळदीचे तेल हे त्वचेशी निगडीत समस्यांवर सुद्धा अतिशय उपयुक्त मानले जाते. हे तेल त्वचेवर कोणत्याही प्रकारचे फंगस विकसित होऊ देत नाहीत. या व्यतिरिक्त हळदीचे तेल त्वचेचे सौंदर्य सुद्धा वाढवते. त्वचेवरील काळे डाग आणि त्वचेचे सौंदर्य खराब करणारे घटक नष्ट करते. तुम्हाला वाटत असेल की हळदीचे तेल केवळ त्वचेच्या बाहेरील सौंदर्य टिकवण्याचे काम करते तर मंडळी नाही हळदीचे तेल हे त्वचेच्या आत सुद्धा परिणाम करते आणि त्वचेतील कोशिकांना निरोगी राखण्याचे काम करते. हळदी प्रमाणे हळदीच्या तेलामध्ये सुद्धा करक्युमीन असते. ते आरोग्यासाठी एक उपयुक्त तत्व आहे जे हाडे आणि सांध्यांना मजबूत बनवते.

(वाचा :- पोटाचा घेर कमी करण्यासाठी साध्यासोप्या टिप्स!)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

जे लोक नियमितपणे हळदीच्या तेलाचा वापर करतात त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य लोकांच्या रोगप्रतिकार शक्तीपेक्षा जास्त सक्षम असते. हे यामुळे होते कारण हळदीचे तेल हे शरीरात खोलवर जाऊन रक्त प्रवाह वाढवण्याचे काम करते. रक्तप्रवाह वाढल्याने शरीरात ऑक्सिजनचा स्तर संतुलित राहतो. ऑक्सीजनचे प्रमाण योग्य असल्याने शरीर उत्साही राहते. यामुळे जर एखादा विषाणू वा जंतू शरीरात प्रवेश करून दुष्परिणाम टाकत असेल तर त्याला नष्ट करण्याचे कार्य आपले शरीर करते.

(वाचा :- बॉलीवूडमध्ये का आहे ड्रग्सचं इतकं वेड? ड्रग्स शरीरावर नेमका काय परिणाम करतात?)

सांधेदुखीपासून मुक्तता

आपण आता हळदीच्या तेलाचा मुख्य उपयोग पाहुया जो सांधेदुखीने त्रस्त असणाऱ्या लोकांना होतो. ज्या प्रकारे जखम झाल्यास ती ठीक करण्यास वा धरून ठेवण्यास हळद मदत करते त्याप्रमाणे सांधेदुखी आणि त्यामुळेहोणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी वा त्या रोखण्यासाठी हळदीचे तेल मदत करते. जिथे सांधेदुखीची समस्या सतावत आहे तिथे हलक्या हाताने हळदीचे तेल चोळावे. यामुळे तुम्हाला काही दिवसांत आराम दिसून येईल. जेवणात सुद्धा हळदीच्या तेलाचा उपयोग केल्याने शरीराला त्याचा फायदा होतो आणि पचनतंत्र चांगले राहते.

(वाचा :- ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय? मग घ्या ‘ही’ काळजी!)

किती सुरक्षित आहे हा उपाय?

हळदीच्या तेलाचा शरीरावर तसा कोणताही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त न घाबरता हळदीच्या तेलाचा वापर करू शकता. पण जर तूमचे अन्य उपचार सुरु असतील आणि तुम्हाला हा उपाय सुद्धा वापरून पहायचा असेल तर तुमच्या डॉक्टरांचा एकदा सल्ला आवर्जून घ्यावा. त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही या उपायाच्या वापराचा आणि किती प्रमाणात तो वापरायचा याचा निर्णय घेऊ शकता. बाजारात तुम्हाला चांगल्या कंपन्यांचे हळदीचे तेल सहज उपलब्ध होईल.

(वाचा :- Health Benefits Of Star Fruit : कॅन्सर व इतर आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास प्रभावी ठरतं ‘हे’ खास फळ!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *