साऊथ इंडियन स्टाइल व्हेजिटेबल मसाला भात

Spread the love

How to make: साऊथ इंडियन स्टाइल व्हेजिटेबल मसाला भात

Step 1: मसाला भातासाठी फोडणी द्या

कुकरच्या भांड्यात तेल गरम करत ठेवा. यानंतर तूप घाला. आता यामध्ये एक चमचा मोहरी, लवंग, जायफळ, काजू, बेडगी मिरच्या आणि कढीपत्ता फ्राय करून घ्या. दोन ते तीन मिनिटांसाठी सर्व सामग्री नीट फ्राय करा.

Step 2: भाज्या मिक्स करा

आता पॅनमध्ये चिमूटभर हळद आणि हिंग मिक्स करा. यानंतर चिरलेल्या भाज्या (गाजर, मटार, बटाटे आणि फरसबी) फ्राय करून घ्याव्यात. थोड्या वेळाने एक बाउल चिरलेला टोमॅटो देखील पॅनमध्ये घालावा आणि व्यवस्थित मिक्स करा. दोन ते तीन मिनिटांसाठी सर्व सामग्री नीट शिजू द्यावी. भाज्या मिक्स केल्यानंतर एक कप बारीक किसलेले खोबरे देखील घालावे. यानंतर मसाला पावडर घालून सामग्री नीट ढवळा.

chopped vegetables

Step 3: डाळ आणि तांदूळ शिजवून घ्या

यानंतर भिजवलेली डाळ आणि तांदूळ भांड्यामध्ये घालावेत. पाणी ओतून सर्व सामग्री नीट शिजवून घ्या. आता आवश्यकतेनुसार गूळ आणि मीठ घाला. सर्व सामग्री पुन्हा एकदा ढवळा आणि कुकरचे झाकण लावा.

Add the rice and soaked moongdal

Step 4: गरमागरम राइस प्लेट आहे तयार

दोन ते तीन शिट्या येईपर्यंत भात शिजू द्यावा. गरमागरम व्हेजिटेबल मसाला भात तयार आहे.

Bisi Bele Bath

Step 5: रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा संपूर्ण व्हिडीओ

व्हेजिटेबल मसाला भात |


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *