साऊथ कोरियातील जोडप्यांची डेटिंग स्टाईल पाहून सारेच होतात थक्क!

Spread the love

मॅचिंग आऊटफिट्स

साऊथ कोरियामध्ये कपल्स मॅचिंग आऊटफिट्स घालतात आणि त्यांच्यासाठी ही अगदीच साधारण गोष्ट आहे. खास करुन तरुण जोडपी हा ट्रेंड फॉलो करताना दिसून येतात. ही त्यांची खास पद्धत असून यावरुन ते इतरांना दाखवतात की आम्ही रिलेशनशीप मध्ये आहोत. त्यांच्याकडे हे इतकं फॉलो केलं जातं की जवळ जवळ प्रत्येक दुकानात कपल्ससाठी मॅचिंग आऊटफिट्स विकायला ठेवले जातात.

(वाचा :- प्रेमविवाह करणा-या जोडप्यांनाच का असते नातं तुटण्याची जास्त भीती?)

कपल रिंग्स

फक्त मॅचिंग आऊटफिट्सच नाही तर साऊथ कोरियातील जोडपी एकसारखी अंगठी अर्थात रिंग घालून देखील खुलेआम रिलेशनशीप जाहीर करतात. ही कमिटमेंटच्या पुढची पायरी दाखवण्याची एक पद्धत आहे. सोबतच यातून हे देखील समजतं की हा मुलगा किंवा मुलगी माझा प्रियकर किंवा माझी प्रेयसी आहे. या पद्धतीमुळे तिसरा कोणी व्यक्ती नात्याच्या आड येऊन समस्या निर्माण करुच शकत नाही आणि जोडपं आनंदात एकमेकांसोबत नांदू शकतं.

(वाचा :- साधारण मुलगी ते गुगलच्या सीईओची पत्नी, सुंदर-अंजली पिचाईंची मनमोहक प्रेमकहाणी!)

बिल

आता डिनर किंवा लंच डेट म्हणाल तर ती साऊथ कोरियाच काय तर इतर सर्वच देशात प्रसिद्ध आहे. कारण ही सर्वात सोपी आणि सुंदर पद्धत आहे. पण असं म्हटलं जातं की डेटवर गेल्यावर साधारणत: मुलंच बिल भरतात पण साऊथ कोरियामध्ये कधी मुलीने बिल भरण्याची व्यक्त केली किंवा तिने बिल भरला तर मुलांना ते खटकतं. त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो अशा चर्चा होताना दिसतात.

(वाचा :- ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते… प्रत्येक स्त्रीची कहाणी अगदी या गौराईवाणी!’)

गप्पागोष्टी

एकीकडे आपल्या देशात पर्सनल स्पेस किंवा स्वत:चा वेळ या गोष्टीला अनेक जोडपी महत्त्व देतात तर साऊथ कोरियामध्ये मात्र २४ तास जोडपी मॅसेजद्वारे एकमेकांशी बोलत असतात किंवा कनेक्ट असतात. गुड मॉर्निंगपासून गुड नाईटपर्यंतच्या मधल्या काळात घडणारी प्रत्येक गोष्ट ते ताबडतोब आपल्या जोडीदारासोबत शेअर करतात. या गोष्टीत जराही हयगय होताना दिसली तर त्यांचं नातं ब्रेकअपपर्यंतही पोहचतं. यावरुन समजून येतं की संवाद या गोष्टीला तेथिल कपल्स किती गांभिर्याने घेतात.

(वाचा :- सोहा-कुणालने सांगितला त्यांचा लिव्ह इन रिलेशनशिपचा अनुभव! खरंच हा पर्याय योग्य असतो?)

अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन

नाही, आम्ही इथे आपल्या भारतात करतात तसं एक वर्षानंतर साज-या केल्या जाणा-या अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनबद्दल नाही बोलत. तर १०० दिवस, २०० दिवस, ६ महिने अशा अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनबद्दल बोलत आहोत. साऊथ कोरियातील कपल्स प्रत्येक महिन्याची अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करण्याबद्दल खूपच हिशोबी असतात आणि हे दिवस खास बनवण्यासाठी ते खूप आधीपासूनच प्लानिंग करायला सुरुवात देखील करतात. म्हणजे कोणत्याच कारणाने आपला जोडीदार आपल्यापासून दूर जाऊ नये व नातं त्याला कंटाळवाणं वाटू नये यासाठी ही जोडपी किती प्रयत्न करतात.

(वाचा :- करोना काळातही गणेशोत्सव करायचा आहे खास? मग या परदेशी मंडळींच्या आयडिया येतील कामी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *