साधारण मुलगी ते गुगलच्या सीईओची पत्नी, सुंदर-अंजली पिचाईंची मनमोहक प्रेमकहाणी!

Spread the love

मध्यमवर्गीय परिवारात जन्म

सुंदर पिचाई यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात असल्याने त्यांना आज ते त्या जागी उभे आहेत त्याची जाण आहे. एका मुलाखती मध्ये त्यांनी सांगितले होते की त्यांच्याकडे लहानपणी टीव्ही सुद्धा नव्हता अशी त्यांची स्थिती होतो. पण आई वडिलांनी शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही. म्हणूनच आज श्रीमंत असूनही त्यांना कशाचाच गर्व नाही. त्यांची हीच गोष्ट अंजली यांना आवडते आणि म्हणून त्यांनी सुंदर यांना आयुष्याचा जोडीदार निवडलं आणि कोणत्याही स्थितीत त्यांच्या सोबत आयुष्य काढण्यासाठी त्या तयार झाल्या.

(वाचा :- सोहा-कुणालने सांगितला त्यांचा लिव्ह इन रिलेशनशिपचा अनुभव! खरंच हा पर्याय योग्य असतो?)

कॉलेजमध्ये झाली ओळख

आयआयटी खड्गपूरमध्ये सुंदर आणि अंजली यांची भेट झाली होती. पहिले तर दोघे चांगले मित्रच होते पण मैत्रीच प्रेमात रुपांतर व्हायला कितीसा वेळ लागतोय आणि पुढे दोघ प्रेमाच्या नात्यात कायमसाठी जोडले गेले. डिग्रीच्या शेवटच्या वर्षात सुंदर यांनी अंजली यांना प्रपोज केले आणि अंजली यांनी सुद्धा केवळ आणि केवळ त्यांचा स्वभाव पाहून होकार दिला. त्यांन आपलं भविष्य काय असले माहित नव्हतं पण त्यांना सुंदर यांच्यावर खूप विश्वास होता.

(वाचा :- सुशांतचा मृत्यु व धोनीची निवृत्ती! अनोळखी असलेल्या दोघांसाठी का होतायत लोक इतके भावूक?)

6 महिने संवाद खुंटला

6-

आयआयटी पास झाल्यावर सुंदर पिचाई मास्टरस डिग्री घेण्यासाठी अमेरिकेमध्ये गेले पण आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अमेरिकेवरून अंजली यांना फोन करण्याएवढे पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. याच कारणामुळे तब्बल 6 महिने त्यांचे एकमेकांशी बोलणे सुद्धा झाले नाही. पण या गोष्टीमुळे त्यांचे नाते तुटले नाही. दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास होता. त्यामुळे त्यांचे नाते अबाधित राहिले. अगदी 2 दिवसही बोलणे न झाल्यास आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवणाऱ्या आणि नाते तोडणाऱ्या कपल्सनी या मधून बोध घ्यायला हवा.

(वाचा :- लग्नाचा वाढदिवस विसरल्याने पत्नी झाली नाराज तर अशी काढा तिची समजूत!)

कुटुंबाच्या परवानगीने लग्न

मास्टर्स झाल्यावर सुंदर यांना एका कंपनीमध्ये नोकरी लागली आणि त्यांना बऱ्यापैकी पगार त्यातून मिळू लागला व आर्थिक स्थिती हळूहळू सुधारायला लागली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व अंजली यांच्या घरच्यांच्या परवानगीने त्यांनी लग्न केले. लग्न करतानाही अंजली यांनी केवळ आणि केवळ सुंदर पिचाई यांच्या मनाची श्रीमंती पाहिली आणि हा व्यक्ती आपली साथ कधीही सोडणार नाही अशी शाश्वती त्यांना होती. सुंदर यांच्याशी लग्न करून त्यांही खरे प्रेम सिद्ध केले.

(वाचा :- ऐश्वर्यातील या गुणांवर प्रभावित होऊन अमिताभ बच्चन यांनी केला तिचा सून म्हणून स्वीकार!)

गुगल सोडू नकोस

सुंदर पिचाई यांनी जी मेहनत घेतली होती त्याचे फळ त्यांना अल्पावधीतच मिळू लागले. एका कंपनी मधून दुसऱ्या कंपनीमध्ये असे करत करत ते गुगल पर्यंत येऊन पोहोचले. इथे त्यांच्या करियरने भरारीच घेतली दरम्यानच्या काळात त्यांची कामगिरी पाहून त्यांना मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटर सारख्या कंपन्यांनी सुद्धा ऑफर दिली. पण अंजली यांनी सुंदर यांना गुगल न सोडण्याचा सल्ला दिला आणि अंजली यांचा तो सल्ला किती मौल्यवान होता हे आपण पाहतो आहोच. या सर्व घटना दर्शवतात की आयुष्यातला जोडीदार हा असाच हवा जो तुमच्या सोबत कोणत्याही स्थितीत राहण्यास तयार असेल आणि तुमची सोबत कधीही सोडणार नाही.

(वाचा :- लॉकडाऊनने तुमच्यातील ही व्यक्ती जिवंत केली असेल तर मग तुम्हीही म्हणाच ‘थॅंंक यू लॉकडाऊन’!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *