सारा अली खानचा ‘हा’ लुक पाहून लोक भडकले, म्हणाले…

Spread the love

​पॉपी पिंक बिकिनी

सारा अली खानला समुद्रकिनारा किंवा स्विमिंग पूलमध्ये हॉलिडे एन्जॉय करायला आवडते. यादरम्यान बहुतांश वेळा तिचा बिकिनी लुक चाहत्यांना पाहायला मिळतो. अशा वेळेस ती स्टायलिश बिकिनीची निवड करते. तिच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक स्विमिंग सूटचे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. काही दिवसांपूर्वीच तिनं हलक्या गुलाबी रंगाच्या स्विमिंग सूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हा लुक कॅरी करताना साराने कमीत कमी मेकअप केला होता. काही जणांनी तिच्या या लुकचे कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं.

(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)

​नियॉन बिकिनी

तसं पाहायला गेलं तर नियॉन पॅलेटची फॅशन जुनी आहे. सारा अली खानने नियॉन रंगाच्या बिकिनीतील फोटो देखील शेअर केले होते. ज्यामध्ये ती स्टायलिश दिसत होती. एवढंच नव्हे तर या बिकिनीवरील नूडल स्ट्रॅप सुपर स्टायलिश आहेत. या स्टायलिश अवतारातील फोटो साराने जेव्हा सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत म्हटलं की, ‘कोणत्या नशेमध्ये आहात मॅडम’, तर काहींनी म्हटलं की ‘हे भारत देशाचे संस्कार नाहीत’.

(सिनेमातील त्या सीनसाठी जेव्हा मनीष मल्होत्राने वापरलं चक्क राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र)

अ‍ॅनिमल प्रिंट

अ‍ॅनिमल प्रिंट ही फार जुनी फॅशन आहे. परदेशातील बहुतांश महिलांना अशा प्रकारच्या डिझाइनमधील बिकिनी घालणे पसंत असते. जेव्हा सारा अली खानने या बिकिनीतील फोटो शेअर केले तेव्हा तिला भरपूर ट्रोल करण्यात आले. तर काही जणांनी तिच्या या लुकचे कौतुक देखील केलं.

(समंथापासून ते सौंदर्या रजनीकांपर्यंत, या अभिनेत्रींच्या साखरपुड्याच्या अंगठीवर करण्यात आला होता इतका खर्च)

स्ट्राइप बिकिनी

‘लव आजकल’ सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकल्यानंतर सारा अली खान आपली आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खानसोब मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी पोहोचली होती. येथे पोहोचल्यानंतर तिनं आपले एकापेक्षा एक स्टायलिश फोटो चाहत्यांसोबतत शेअर केले. आपल्या भावासोबतही काही फोटो तिनं पोस्ट केले होते. पण जसं तिने आपला बिकिनी अवतारातील फोटो शेअर केला तसे नेटिझन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

(अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुलचे एकसारखेच कपडे? फोटो झाले होते व्हायरल)

​पेस्टल नियॉन

यानंतर साराने आपले पेस्टल नियॉन लुकमधील फोटो देखील शेअर केले होते. ज्यामध्ये सारा अतिशय सुंदर दिसत होती. साराला समुद्रकिनाऱ्यांवर हॉलिडे एन्जॉय करणं अतिशय पसंत आहे. कदाचित याच कारणामुळे साराला वॉटर बेबी असेही म्हटलं जातं.

(Sara Ali Khan सारा अली खानचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतार)

(विद्या बालनला प्रसिद्ध डिझाइनर सब्यसाची मुखर्जीचा चेहरा सुद्धा पाहण्याची इच्छा का नाही?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *