सारा अली खानची ‘ही’ साडी पाहून नेटिझन्सना हसू आवरेना, अशा केल्या होत्या कमेंट्स

Spread the love

​साराचा हटके साडी लुक

सारा अली खाने एका मासिकाच्या फोटोशूटसाठी लाल रंगाची स्टायलिश साडी नेसली होती. साडीला युनिक पॉइंट रफल आणि टेल डिझाइन देण्यात आलं होतं. संपूर्ण साडीवर लाल, पिवळा आणि गुलाबी रंगाचे छोटे-छोटे रफल डिझाइन जोडण्यात आल्याचे तुम्ही पाहू शकता.

(तुम्हाला स्टायलिश बॅग वापरायला आवडतात का? जाणून घ्या हे पाच प्रकार)

तर हेअर स्टाइल म्हणून तिला बॅक कॉम्ब करून मेसी लुक देण्यात आला होता. साराचा मेकअप न्यूड टोन स्टाइलमध्ये करण्यात आला होता. डोळे अधिक आकर्षक दिसावेत, यासाठी आइलाइनरच्या मदतीने हाइलाइट करण्यात आलं होतं.

(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)

​लोकांनी म्हटलं ‘नटराज पेन्सिल’, ‘पक्षी’

सारा अली खानचे या स्टायलिश साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर नेटिझन्सनी लगेचच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिचा हा लुक लोकांना पसंत न आल्याचे त्यांनी केलेल्या कमेंट्सवरून दिसत होते. काही नेटिझन्सनी या अवताराची खिल्ली देखील उडवली. काही लोकांनी लाफिंग इमोजी पोस्ट करत साराचा हा लुक ‘नटराज पेन्सिल’ सारखा दिसत असल्याचे म्हटलं.

(ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर)

​हा लुक देखील होता स्टायलिश

साराने यापूर्वी साडीसह स्टायलिश प्रयोग केलेले आहेत. लाल रंगाची साडी नेसून तिनं एका वेडिंग रिसेप्शनमध्ये उपस्थिती दर्शवली होती. या साडीचे डिझाइन युनिक होतं. फ्युजन लुक असणाऱ्या या साडीमध्ये सोनेरी रंगाच्या चुडीदारचा समावेश होता.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

यावर साराने फुल स्लीव्ह्ज ब्लाउज परिधान केला होता. तिच्या या लुकवर नेटिझन्सची संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली. काही जणांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर काहींनी टीकास्त्र देखील सोडलं.

(सोनमच्या लग्नात जॅकलीनने परिधान केला होता साडेसात लाख रुपयांचा लेहंगा, तर करीनाच्या ड्रेसची होती एवढी किंमत)

साध्या साडीवर परिधान केला स्टायलिश डिझाइनर ब्लाउज

सारा अली खानचा पांढऱ्या रंगाच्या साडीतील असाच एक अनोखा लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की साराने नेसलेली साडी अतिशय साधी आणि सुंदर आहे. पण ही साडी क्लासिक स्टाइलने नेसण्यात आलीय.

(चोकर्सची चलती! ट्रेंडनुसार निवडा स्टायलिश नेकलेस)

या साडीवरील ब्लाउजचे डिझाइन अतिशय हटके आणि सुंदर दिसत आहे. ब्लाउजचे स्लीव्ह्ज बलुन डिझाइनचे होते. ज्यावर कोल्ड शोल्डर डिझाइन देखील तुम्ही पाहू शकता. साराचा हा लुक अतिशय हटके आणि स्टायलिश होता.

(Navratri 2020 नवरात्रौत्सवासाठी ५ सुंदर साड्यांचा पर्याय, वजनाने हलक्या व स्टाइलमध्येही आहेत जबरदस्त)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *