सारा अली खानने परिधान केला होता ‘हा’ वजनदार लेहंगा, नेटकऱ्यांनी म्हटलं…

Spread the love

अभिनेत्री सारा खानने (Sara Ali Khan) २०१८ मध्ये बॉक्सऑफिसवर झळकलेल्या ‘केदारनाथ’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये (Bollywood) दमदार एंट्री केली. तेव्हापासून ते आतापर्यंत सारा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सारा शानदार अभिनयाव्यतिरिक्त आपल्या आगळ्या-वेगळ्या स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. थिंक प्रिंटेड, क्लासिक वाइट चिकन वर्क कुर्ता, डिझाइनर फुटवेअर, रंगीबेरंगी बांगड्या, सिल्वर चंकी ज्वेलरी, स्टेटमेंट ईअररिंग्स आणि टाई-डाई ब्लॉक प्रिंट दुपट्टा इत्यादी सुंदर- सुंदर गोष्टींचे शानदार कलेक्शन साराच्या वॉर्डरोबमध्ये पाहायला मिळते.

दरम्यान, खूपच कमी वेळामध्ये सारा अली खानने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. सारा फॅशनच्या बाबतीत अप-टू-डेट असते. पण कधी-कधी अति स्टायलिश दिसण्यामुळे साराला ट्रोलर्सचा सामना देखील करावा लागतो. असाच काहीसा किस्सा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या Blenders Pride Fashion Tour दरम्यान पाहायला मिळाला. या शोदरम्यान साराने रॅम्प वॉक करण्यासाठी स्वतःच्या वजनापेक्षा जड ड्रेस परिधान केला होता. यावरून नेटकऱ्यानी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
(सारा अली खान व पूजा हेगडेच्या ड्रेसची एकसारखीच स्टाइल, नेमकं कोणी केलंय कोणाला कॉपी?)

​साराची हटके स्टाइल

नवी दिल्लीमध्ये वर्षाच्या सुरुवातीस Blenders Pride Fashion Tour हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये भारतातील सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर्सनी तयार केलेल्या शानदार आउटफिट्सचे कलेक्शन पाहायला मिळते. याव्यतिरिक्त बॉलिवूड शोस्टॉपर्ससाठीही हे एक खास व्यासपीठ मानले जाते. यंदा सारा अली खानला शो-स्टॉपरचा मान मिळाला होता. रॅम्प वॉक करण्यासाठी साराने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अबू जानी संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधील सुंदर लेहंग्यांची निवड केली होती.

(सारा अली खानवर भारी पडली करीना कपूरची स्टाइल, या ड्रेसमुळे मिळाला मोहक लुक)

… ​पण प्रेक्षकांना आवडली नाही साराची स्टाइल

या भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी सारा अली खानने डिझाइनरने डिझाइन केलेले एक नव्हे तर दोन वेगवेगळ्या पोषाखांची निवड केली होती. यामध्ये गुलाबी रंगाच्या वजनदार लेहंग्याचा समावेश होता. यावर सुंदर एम्ब्रॉयडरीसह गोटा पट्टी डिझाइन जोडण्यात आलं होतं. तर दुसरीकडे सारानं गडद मरून रंगाचा लेहंगा देखील परिधान केला होता. या आउटफिटला आकर्षक लुक देण्यासाठी रफल स्टाइल 3/4 स्लीव्ह्ज डिझाइन देण्यात आलं होत. साराचे या पोषाखातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिच्या या स्टाइलवर नापसंती दर्शवली. गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये सारा सुंदर दिसत होती, पण मरून रंगाच्या लेहंग्यामुळे साराचा लुक खराब दिसत होता.

(करीना कपूरच्या स्टायलिश लुकवर भारी पडली सारा अली खानची ‘ही’ फॅशन)

​अजब-गजब स्टायलिंग

सारा अली खानच्या सोनेरी आणि मरून रंगाच्या लेहंग्याबाबत सांगायचे झाले तर अभिनेत्री या आउटफिटवर वजनदार नेकपीस घातले होते. ज्यामुळे स्वीटहार्ट नेकलाइन असणारं ब्लाउज पूर्णपणे झाकले गेले. एवढंच नव्हे तर मोठमोठ्या पफी बलून स्लीव्ह्जमुळे आउटफिटचा लुक खराब दिसत होता. दरम्यान गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये सारा सुंदर व मोहक दिसत होती. तिच्या या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या लेहंग्यावर वजनदार एम्ब्रॉयडरी करण्यात आल्याचे आपण पाहू शकता. लेहंग्याच्या ओढणीवर काळ्या रंगाचे पॅच वर्क देखील जोडण्यात आलं होतं.

(कांजीवरमपासून ते गोल्ड जरीपर्यंत, रेखा यांच्या ‘या’ सुंदर साड्यांसमोर फिके पडतील महागडे लेहंगे)

​नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मरून रंगाच्या लेहंग्यामुळे नेटकऱ्यांनी सारा अली खानला (Sara Ali Khan) ट्रोल केलं. तिचे या अवतारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. साराच्या या लुकवर लोकांनी थेट नापसंती दर्शवली. काही जणांनी तर साराने कंगना राणावतचा लुक कॉपी केल्याचीही प्रतिक्रिया व्यक्ती केली.

(काजोलनं शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केला शेअर, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव)

सारा अली खानचा मोहक लुक
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *