सारा अली खान व पूजा हेगडेच्या ड्रेसची एकसारखीच स्टाइल, नेमकं कोणी केलंय कोणाला कॉपी?

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्रींनी हटके डिझाइनचे एखादं आउटफिट परिधान केल्यानंतर त्यांच्या फॅशनचा ट्रेंड मार्केटमध्येही पाहायला मिळतो, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. कित्येक अभिनेत्री सोशल मीडियावर अकाउंटद्वारे आपले स्टायलिश फोटो, लेटेस्ट लुक, ट्रेंडी स्टाइल आणि सुंदर अवतारातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण कधी- कधी स्टायलिश दिसण्याच्या नादात बॉलिवूड अभिनेत्री कळत- नकळत दुसऱ्या व्यक्तीचीही स्टाइल कॉपी करतात.

आतापर्यंत अशी कित्येक उदाहरणे आपण पाहिली असतीलच. असेच काहीसे बॉलिवूडमधील फॅशनिस्ता सारा अली खान (Sara Ali Khan) आणि पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) आउटफिटसोबतही झाल्याचे पाहायला मिळालं. या दोघींच्या ड्रेसचं डिझाइन बरंच मिळते-जुळते होतं. दरम्यान सारा आणि पूजाची स्टाइल एकमेकींवर भारी देखील पडली होती.
(रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)

​साराची फॅशन

सारा अली खानचा फॅशन सेन्स अप्रतिमच आहे. ही अभिनेत्री बदलत्या ट्रेंडनुसार स्टायलिश लुक सहजरित्या कॅरी करते. साराच्या वॉर्डरोबमध्ये अबू जानी संदीप खोसला, मनीष मल्होत्रा, सब्यसाची, फाल्गुनी शेन पीकॉक यासारख्या मोठमोठ्या डिझाइनरचे शानदार कलेक्शन पाहायला मिळते. तर दुसरीकडे तिला स्पोर्ट्सवेअर परिधान करणंही पसंत आहे. साराचा रेड कार्पेट लुक देखील हटके असतो. एका पुरस्कार सोहळ्यासाठीही सारा अली खाननं गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.

(ऐश्वर्या राय-बच्चन आणि करीना कपूरने नेसली एकसारखीच साडी? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी)

​गुलाबी रंगाचा स्टायलिश गाउन

एका पुरस्कार सोहळ्यासाठी सारा अली खानने फिकट गुलाबी रंगाच्या ग्लॅमरस गाउनची निवड केली होती. हा गाउन प्रसिद्ध लेबनानी फॅशन डिझाइनर Georges Chakraनं डिझाइन केला होता. या फ्लोर-स्वीपिंग स्ट्रॅपलेस गाउनमध्ये फेदर डेटलिंगसह मायक्रो प्रिंट हँडवर्क एम्ब्रॉयडरी तुम्ही पाहू शकता. साराच्या या ड्रेसचं डिझाइन अतिशय आकर्षक होते. या ड्रेसवर साराने चंदेरी रंगाच्या हाय हील्स मॅच केल्या होत्या. तसंच लाइट टोन मेकअपसह पोनीटेल हेअर स्टाइल केली होती.

(करीना कपूरने पुन्हा सर्वांचं लक्ष घेतलं वेधून, ‘या’ आकर्षक ड्रेसमध्ये दिसतेय सुपर स्टायलिश)

​पूजा हेगडेचा ग्लॅमरस लुक

दरम्यान अशाच मिळत्या-जुळत्या डिझाइनर गाउनमध्ये सारा अली खान पूर्वी अभिनेत्री पूजा हेगडेचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. Filmfare Glamour & Style Awards साठी पूजाने ऑफ शोल्डर बेबी पिंक फ्लोरलेंथ गाउनची निवड केली होती. हा ड्रेस साउथमधील प्रसिद्ध फॅशन डिझाइनर Shriya Som ने डिझाइन केला आहे. डिझाइनर श्रियारफल स्टाइल डिझाइन ड्रेससाठी ओळखली जाते.

(Kareena Kapoor करीना कपूरने पार्टी लुकसाठी ‘या’ लाख रुपयांच्या फुटवेअर केली निवड)

​पूजाचा बार्बी लुक

पूजा हेगडे या डिस्नी प्रिंसेस मल्टी लेअरिंग रफल गाउनमध्ये मोहक दिसत होती. या ड्रेससाठी तिनं लाइट टोन मेकअपसह स्टायलिश हेअरस्टाइल केली होती. पूजाचा हा ट्युल गाउन इतका सुंदर होता की उपस्थितांची नजर अभिनेत्रीच्या लुकवर खिळून राहिली होती.

(सारा अली खानची ‘ही’ साडी पाहून नेटिझन्सना हसू आवरेना, अशा केल्या होत्या कमेंट्स)

​कोणाचा लुक आहे सर्वात स्टायलिश?

फ्लोर-स्वीपिंग स्ट्रॅपलेस गाउन स्टाइलमध्ये पूजा हेगडे आणि सारा अली खान; दोघींचाही लुक हटके आणि ग्लॅमरस होता. दोघींचीही स्टाइल एकमेकींवर भारी पडल्याचं दिसलं. साराचा लुक ग्लॅमरस दिसतोय तर पूजा हेगडे या ड्रेसमध्ये मोहक व सुंदर दिसतेय. दोघींच्याही चाहत्यांनी त्यांच्या या स्टाइलवर कौतुकाचा वर्षाव केला होता.

(सारा अली खान व कृति सेनॉनने परिधान केलं एकसारखं आउटफिट? कोणाचा लुक आहे सुपर स्टायलिश)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *