सारा अली खान ही गोष्ट सर्वात जास्त करतेय मिस, म्हणून स्वतःचे स्टायलिश थ्रोबॅक फोटो करतेय शेअर

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून आपले स्टायलिश अवतारातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी सारा अली खानने (Sara Ali Khan) स्वतःमध्ये भरपूर बदल केले आहेत. तिची फॅशन स्टाइलही सुंदर आणि आकर्षक असते. सध्या ती आपले वेगवेगळ्या पोषाखातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

हे थ्रोबॅक फोटो शेअर करून सुटीचे (हॉलिडे) दिवस मिस करत असल्याचे ती सांगत आहे. वेगवेगळ्या अवतारातील फोटो पोस्ट करून ती आपला मूड व्यक्त करत आहे. तसंच फोटोंसाठी मजेशीर कॅप्शनही लिहीत आहे. दरम्यान यानिमित्ताने साराचे एकापेक्षा एक सुंदर फोटो चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहेत.
(मलायका अरोराचा ग्लॅमरस अवतार, पाहा पारंपरिक ते वेस्टर्न लुकमधील स्टायलिश फोटो)

​साराचा मंडे मूड

सारा अली खानने आपला ‘मंडे मूड’ व्यक्त करत सोशल मीडिवर स्वतःचा सुंदर फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये ती कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसत आहे. डेनिमचे शॉर्ट परिधान केल्याचे तुम्ही पाहू शकता. यावर साराने पांढऱ्या रंगाचे कॉटन टॉप मॅच केलं होतं. या टॉपचे शोल्डर पफ्ड डिझाइनचे होते. एखाद्या समुद्र किनाऱ्यावरील सफरीसाठी हे क्रॉप टॉप परफेक्ट चॉइस आहे. नो मेक अप लुकमध्ये सारा अली खान नेहमी प्रमाणे सुंदर दिसत आहे.

(करीनापासून ते रायमापर्यंत, या अभिनेत्रींनी फोटोशूटसाठी घेतला असा बोल्ड निर्णय)

बॅक टू ब्लू

सारा अली खानला समुद्र किनाऱ्याची सफर करणं पसंत आहे, असे ती शेअर करत असलेल्या फोटोंवरून दिसत आहे. साराने समुद्राच्या पाण्यात उभे राहून पोझ दिल्याचा फोटो देखील शेअर केला होता. यामध्येही तिनं डेनिमचे शॉर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. हे डेनिम शॉर्ट अतिशय साधा होतं. पॉकेट एरियावर रिप्ड डिझाइन तुम्ही पाहू शकता. यावर साराने पांढऱ्या रंगाचे प्रिंटेड टी शर्ट मॅच केले होते. पण कपड्यांपेक्षा तिने लावलेलं लिपस्टिकच जास्त हायलाइट होत आहे. इलेक्ट्रिक निळ्या रंगाचे लिपस्टिक तिने लावलं होतं. सोबतच साराने हार्ट अँड केट आय शेप डिझाइनचे गॉगल देखील घातले होते. तिचा लुक बराच हटके दिसत होता.

(Ankita Lokhande सुंदर साडीतील अंकिता लोखंडेच्या मोहक अदा, पाहा फोटो)

गुलाबो सारा

सारा अली खानला ‘वॉटर बेबी’ म्हणून देखील ओळखलं जातं. जेव्हा तिला वेळ मिळतो, तेव्हा हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी ती समुद्र किनाऱ्यावर जाणे पसंत करते किंवा स्विमिंग पूलमध्येही पोहण्याचा आनंद घेते. स्विमिंग पूलमधील एक फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं स्वतःचा ‘गुलाबो’ असा उल्लेख केला आहे. या फोटोमध्ये साराने गुलाबी रंगाची टू- पीस बिकिनी घातल्याचे दिसत आहे. वॉटर ट्युब देखील याच रंगाचा होतं. पण या लुकसह तिने काळ्या रंगाचे गॉगल मॅच केले होते.

(जेव्हा करीना कपूरवर भारी पडली होती या टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल, पाहा फोटो)

​फोटो आणि मजेशीर कॅप्शन

२०२० हे वर्ष कधी एकदाचे संपत आहे, याची वाट सर्वजण पाहत आहेत. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वच गोष्टी वाईटरित्या प्रभावित झाल्या आहेत. सोशल मीडियावर काही जण आपली चिडचिड व्यक्त करत आहेत तर काही मजेशीर कॅप्शन देऊन मीम्स देखील शेअर करत आहेत. यापैकी एकच सारा देखील आहे.

(करीना कपूर आणि मलायकाने पुन्हा एकसारखेच कपडे केले परिधान, पाहा फोटो)

​2020 पासून लपण्याचा प्रयत्न

2020-

या अभिनेत्रीनं camouflage प्रिंटचे शॉर्ट ड्रेसमधील आपला फोटो शेअर केला होता. या ड्रेसवर डीप कट डिझाइन होतं.यामध्ये सारा अली खान अतिशय मोहक दिसत होती. हा फोटो शेअर करून साराने कॅप्शन लिहिलं होतं की, ‘2020 पासून लपण्याचा प्रयत्न #camouflage’.

(ईशा अंबानीने लग्नासाठी फॉलो केला होता आईसारखा ब्रायडल लुक,पाहा ३५ वर्षांपूर्वीचे हे फोटो)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *