सावधान! गर्भधारणेमध्ये अडथळा येण्यास असू शकतो ‘हा’ आजार कारणीभूत

Spread the love

थायरॉइड म्हणजे काय?

थायरॉईड एक महत्त्वपूर्ण फर्टिलिटी ग्रंथी आहे आणि फर्टिलिटी हार्मोन्स मध्ये गडबड झाल्यास स्त्रीला गरोदर राहण्यास समस्या निर्माण होतात. यामुळे स्त्रीच्या गर्भधारणेवर मोठा परिणाम होतो. गर्भधारणेची क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होते. थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नसेल तर हार्मोनल असंतुलन सुद्धा होऊ शकते. अनेक जाणकारांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला आहे कि थायरॉईड मुळे गर्भधारनेवर परिणाम होऊ शकतो आणि अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर पहिली मासिक पाळी किती दिवसांत यायला हवी?)

गर्भधारणेमध्ये थायरॉइड ग्रंथीची भूमिका

थायरॉइड ग्रंथी ही प्रत्येक कोशिकेच्या मेटाबोलिक लेव्हलला, शरीरातील हार्मोन्सच्या स्तराला आणि संतुलित वजनाला मॉनीटर करते. तणाव, पोषणातील कमतरता, रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने जडलेले विकार आणि शरीरात एस्टट्रोजन तसेच प्रोलेक्टिनची जास्त मात्रा असल्याने थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम होतो. पुढे याचा थेट परिणाम गर्भधारणेवर होतो व गर्भधारणेची अर्थात गरोदर राहण्याची क्षमता कमी होते व अनेक प्रयत्न करून सुद्धा स्त्री गरोदर राहत नाही.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या पहिल्या तिमाहीत चुकूनही करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन!)

हाइपोथायराइडिज्‍म आणि हाइपरथायराइडिज्‍म

हाइपोथायराइडिज्‍ममध्ये थायरॉईड ग्रंथी कमी काम करू लागते आणि याचा वेळीच इलाज न केल्यास गर्भधारणेच्या क्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. काही स्त्रियांना जास्त काळ अतिशय ब्लिडिंगला सामोरे जावे लागू शकते आणि हा त्रास एनिमीया आजाराला आमंत्रण देतो. औषधांच्या मदतीने थायरॉईड हार्मोन्सना संतुलित करता येते आणि गरोदर राहण्याची शक्यता वाढू शकते. हाइपरथायराइडिज्‍ममध्ये थायरॉईड ग्रंथी अधिक सक्रीय होते आणि यात अनियमित मासिक पाळीसोबत कमी ब्लीडींग सारखी लक्षणे दिसू लागतात. याचा परिणाम ओव्युलेशनवर सुद्धा होतो. मासिक पाळी अनियमित होत असल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता मावळते. जर थायरॉईडवर उपचार केले गेले नाहीत तर गरोदरपणात गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसे की एनीमिया, गर्भपात, प्रीक्लेंप्सिया आणि प्लेसेंटा अब्‍रप्‍शन इत्यादी.

(वाचा :- प्रेग्नेंसीमधील लघुशंका समस्यांवर करिना कपूरच्या डाएटिशियनने सांगितले घरगुती उपाय!)

थायरॉइडचे गर्भधारणेवर होणारे परिणाम

थायरॉइडच्या स्थितीमध्ये मासिक पाळीवर प्रभाव पडून ओव्युलेशन न होण्याची समस्या उद्भवू शकते. ओव्युलेशन हे गर्भधारणेसाठी अतिशय महत्त्वाचे असते. ओव्युलेशन शिवाय गरोदर राहण्यासाठी आवश्यक असणारी अंडी तयार होत नाहीत. थायरॉइडचा परिणाम प्रोजेस्‍टेरोन लेवल वर सुद्धा होतो. प्रोजेस्‍टेरोन हार्मोनचा ओवरीमधून स्त्राव होतो. गर्भधारणेसाठी हाच हार्मोन्स मुख्य असल्याने याला प्रेग्नन्सी हार्मोन सुद्धा म्हणतात. थायरॉइड झाल्यावर फर्टीलाईज एग गर्भाशयाची जोडला जात नाही आणि गर्भपात होतो. याशिवाय अतिशय जास्त प्रमाणात प्रोलेक्टीन तयार झाल्याने ओव्युलेशनमध्ये मदत मिळत नाही. थायरॉक्सिनचा स्तर कमी असल्याने आणि थायरॉइड रिलीजिंग हार्मोन (टीआरएच) जास्त असल्याने प्रोलेक्टीन मोठ्या प्रमाणावर तयार होते आणि त्याचा गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम दिसून येतो.

(वाचा :- बॉलीवूडमधील या अभिनेत्रींना प्रेग्नेंसीमध्ये योगाभ्यास केल्याने झाले होते भरपूर लाभ!)

थायरॉइडसह गरोदर राहणे

निरोगी जीवनशैली आणि पौष्टिक आहार घेत थायरॉइड ग्रंथीच्या अकार्यक्षमतेमध्ये सुधारणा आणता येते. याशिवाय औषधांच्या सेवनाने सुद्धा थायरॉइड नियंत्रणात ठेवण्यात आणि गरोदर राहण्यास मदत मिळते. थायरॉइडने ग्रस्त असलेल्या स्त्रियांनी अधिक खाणे टाळले पाहिजे. याशिवाय तळलेले मसालेदार पदार्थ आणि मिठाचा त्याग केला पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थायरॉइड असणाऱ्या स्त्रीने गर्भधारणेपूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. जेणेकरून काही समस्या असल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या प्रत्येक आठवड्यात किती टक्के असतो गर्भपाताचा धोका?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *