सिनेमातील त्या सीनसाठी जेव्हा मनीष मल्होत्राने वापरलं चक्क राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र

Spread the love

देशातील सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर्सच्या यादीमध्ये मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) याचंही नाव आवर्जून घेतले जाते. यासोबतच तो कॉस्ट्युम डिझाइनर देखील आहेत. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी त्यानं कॉस्ट्युम डिझाझनर म्हणून काम केले आहे. या यादीमध्ये यशराज बॅनर आणि धर्मा प्रोडक्शनच्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. मनीष मल्होत्राने अशा कित्येक सुपरहिट सिनेमांसाठी काम केलं, ज्यातील फॅशन स्टाइल प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रिय झाली आहे. यामध्ये ‘कुछ-कुछ होता है’ या सुपर-डुपरहिट सिनेमाच्या नावाचाही समावेश आहे.

मोठ्या पडद्यावर या सिनेमातील पात्रांमध्ये होणाऱ्या बदलानुसार त्यांच्या पोषाखातही वेगळेपण दाखवण्यात आले होते. याद्वारे प्रेक्षकांना सिनेमातील पात्रांशी थेट कनेक्ट होण्यास मदत मिळाली. दरम्यान या सिनेमाशी संबंधित एक घटना अशी देखील आहे, जी आजही आठवल्यानंतर करण आणि मनीषला हसू आवरत नाही.
(जेव्हा करीना कपूरवर भारी पडली होती या टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल, पाहा फोटो)

​शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा

एका कार्यक्रमादरम्यान करण जोहरने संपूर्ण घटना सांगितली होती. तो म्हणाला की, ‘कुछ कुछ होता है सिनेमाचा हा सर्वात मजेशीर किस्सा होता. आम्हाला राणी मुखर्जीचा एक सीन शूट करायचा होता. यामध्ये राणीच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचंही दाखवायचे होते. पण मनीष हा दागिना आणायला विसरला होता. चित्रिकरणासाठी मंगळसूत्र महत्त्वाचे होतं आणि ते दिसलं नसतं तर माझं रागावरील नियंत्रण सुटलं असतं, हे त्याला माहीत होतं. यासाठीच तो धावत व्हॅनिटीमध्ये गेला आणि तेथे राणीची आई विश्रांती घेत होती’.

(अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुलचे एकसारखेच कपडे? फोटो झाले होते व्हायरल)

​राणीच्या आईला मंगळसूत्र काढण्यास सांगितलं

‘मनीषने काहीही न सांगता राणीच्या आईला गळ्यातील मंगळसूत्र काढण्यास सांगितलं आणि तेच मंगळसूत्र घेऊन तो सेटवर पळत आला. चित्रिकरण संपल्यानंतर मी पाहिलं की राणीची आई खूप रागावली होती. कशापद्धतीने मनीषने आपल्याकडून सौभाग्यलंकार घेतले, याचा किस्सा त्यांनी सर्वांसमोर ओरडून सांगितला. त्यांनी सांगितल्यानंतर आम्हाला समजलं की राणीने जे मंगळसूत्र गळ्यात घातले होते ते तिच्या आईचे होते’.

(सारा अली खान ही गोष्ट करतेय मिस, म्हणून स्वतःचे स्टायलिश थ्रोबॅक फोटो केले शेअर)

​ड्रेसचं डिझाइन होतं वेगळं

कुछ कुछ होता है सिनेमातील कोई मिल गया हे गाणं तर सर्वांनाच माहिती असेल. यामध्ये राणीचा सुपर ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. पण तुम्हाला माहिती आहे का या गाण्यासाठी तिने जो पहिला ड्रेस परिधान केला होता, त्याचे डिझाइन वेगळेच होतं. या गाण्यासाठी मनीषने लाँग ड्रेस डिझाइन केला होता. पण त्या ड्रेसचं डिझाइन करणला पसंत आले नव्हते.

(मलायका अरोराचा ग्लॅमरस अवतार, पाहा पारंपरिक ते वेस्टर्न लुकमधील स्टायलिश फोटो)

​राणी मुखर्जीचा हॉट अवतार

गाण्यामध्ये राणी मुखर्जीचा हॉट अवतार दिसावा,असे करणचे म्हणणं होतं. यानंतर मनीषने लाँग ड्रेस कट करून त्यापासूनच शॉर्ट ड्रेस तयार केला. गाण्याचे चित्रिकरण अखेर पूर्ण झालं. राणीने इतक्या शॉर्ट ड्रेसमध्येही आत्मविश्वासाने या गाण्याचं शूटिंग पूर्ण केले तेव्हा करण आणि मनीष दोघंही आश्चर्यचकित झाले होते.

(Nita Ambani नीता अंबानींच्या वॉर्डरोबमध्ये नेहमी मिळतील या पाच गोष्टी)

​एका सीनमध्ये खुद्द मनीष मल्होत्राही होता

या सिनेमाच्या एका सीनमध्ये खुद्द मनीष मल्होत्रा देखील होता, ही गोष्ट कदाचित तुमच्या लक्षात आली नसावी. या सीनमध्ये पायऱ्यांवर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये मनीष मल्होत्रालाही दाखवण्यात आले होतं. त्यावेळेस मनीषचा आतापर्यंतचा सर्वात विचित्र हेअर कट पाहायला मिळाल्याचेही करण जोहरने सांगितलं होतं.

(ड्रेस पाहिल्यानंतर लोक म्हणाले, अनुष्का शर्मानंतर आता पक्का प्रियंका चोप्राचा नंबर)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *