सुरक्षित अंतर, एका तासात व्यायाम! लक्षात ठेवा हे १० नियम

Spread the love

नव्या नियमांसह व्यायाम सुरू

रामेश्वर जगदाळे


होणार…होणार म्हणताना अखेर येत्या दसऱ्यापासून व्यायामशाळा खुल्या होत आहेत. फिटनेसप्रेमींमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण असून, त्यांना जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचे वेध लागले आहेत. अर्थात व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करताना त्यांना पुरेशी खबरदारी घ्यावी लागणार आहे. जिममालकांनीही जिम उघडण्याची पूर्ण तयारी केली असून, काही मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यायामशाळा उघडणार आहेत. व्यायामशाळेत येणाऱ्या प्रत्येकावर वेळेचं बंधन मात्र असणार आहे.

व्यायामप्रेमी मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून व्यायामशाळा खुल्या होण्याच्या प्रतीक्षेत होती. जिम सुरू करताना राज्य सरकारनं आखून दिलेल्या एसओपी पाळणं जिममालकांसाठी बंधनकारक असणार आहे. सुरक्षित अंतर राखून व्यायाम, व्यायामावर येणारी बंधनं अशा अनेक गोष्टी व्यायामशाळेत येणाऱ्यांना लक्षात ठेवाव्या लागतील. जिम खुल्या होत असताना जिमपासून ते येणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांची काळजी घेणं जिममालकांना बंधनकारक असणार आहे. पूर्वीप्रमाणे एका वेळी अनेक लोकांना जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. जिममध्ये येण्यासाठी आधी ठराविक वेळ घ्यावी लागणार आहे.काही वेळाच्या फरकानं मोजक्या लोकांना आणि ट्रेनरला जिममध्ये परवानगी दिली जाईल. ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना व्यायामशाळेत येता येणार नाही.
(भुजंगासनाची पारंपरिक पद्धत माहीत आहे? हे ६ लाभही जाणून घ्या)

(चालण्याचा व्यायाम कोणत्या वेळेस करणं आरोग्यास असते अधिक फायदेशीर? जाणून घ्या)
प्रदीर्घ काळ बंद असणाऱ्या जिम सुरू होत आहेत याचा आनंद आहे. गोष्टी पूर्णत: पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे. पण, दिलेले सर्व नियम पाळून आम्ही जिम चालवू. जिममध्ये येणाऱ्या लोकांनीसुद्धा विशेष काळजी घेऊन व्यायाम करावा. बंधनं पाळून जिम मालक आणि ट्रेनर यांना सहकार्य करावं.
– चेतन पाठारे, जनरल सेक्रेटरी, इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन

काय असतील नवीन नियम?‌

० जिममध्ये प्रत्येक तासानंतर निर्जंतुकीकरण
० जिममध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान, ऑक्सिजनच्या पातळीची नोंद
० ६० वर्षांवरील व्यक्तींना जिममध्ये प्रवेश नाही.
० व्यायाम करण्यासाठी प्रत्येकाला स्वतःची मॅट आणावी लागेल.
० ट्रेनरनं ट्रेनिंग देताना हातामध्ये ग्लोव्हज, चेहऱ्यावर मास्क ठेवणं आवश्यक.
(अक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट ‘या’ पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत)
० नागरिकांना व्यायाम करण्यासाठी प्रत्येकी ५० मिनिटे मिळतील.
० स्टीम, बाथ अशा सुविधा काही काळासाठी बंद असतील.
० छातीचे आजार असणाऱ्यांना जिममध्ये प्रवेश नाही.
० जिममध्ये घातले जाणारे बूट आणि बाहेर वापरले जाणारे बूट वेगळे ठेवण्याचं बंधन
० जिमच्या दोन सुरक्षित अंतर असेल.

स्ट्रेचिंग एक्सरसाइज


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *