सॅनिटायझरचे त्वचेवरील दुष्परिणाम, जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ उपाय

Spread the love

डॉ. पराग सहस्रबुद्धे प्लास्टिक सर्जन
करोनामुळे सर्व सरकारी यंत्रणांनी हाताच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केला आहे. पण या सततच्या सॅनिटायझर वापरामुळे हाताच्या त्वचेच्या समस्या (Skin Care) उद्भवल्या आहेत. काही मंडळी चेहऱ्यावर, संपूर्ण हातावर, मानेवर आदी ठिकाणीसुद्धा सॅनिटायझर वापरतात. मात्र, सॅनिटायझरचे त्वचेवर काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्यावरील उपाय काय हे जाणून घेऊ.
(नितळ व डागविरहित त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर अशा पद्धतीने लावा कोरफड जेल)

एका संध्याकाळी क्लिनिकमध्ये एक स्त्री चेहऱ्यावर आलेला रॅश दाखविण्यास आली. खोदून प्रश्न विचरल्यावर कळले, की हाताबरोबर ती संपूर्ण चेहऱ्याला सॅनिटायझर वापरत होती. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा काही प्रमाणात जळाल्यामुळे काळी पडली होती. सॅनिटायझरचा चेहऱ्यावरील वापर बंद केल्यावर व योग्य ते उपचार घेतल्यानंतर चेहरा पूर्ववत झाला. त्वचेला खाज सुटणे आणि इसब : सॅनिटायझरमध्ये आयसोप्रोपिल किंवा इथिईल अल्कोहोल असते. त्याने त्वचेला कोरडेपणा येतो. त्यामुळे खाज येणे, त्वचा तडतडणे, हाताच्या त्वचेवर फोड येणे, हाताची सालपटे निघणे इत्यादी समस्या जाणवतात. सततच्या वापरामुळे त्वचेला भेगा पडतात किंवा त्यातून रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो.
(ग्लुटाथिओनमुळे चेहऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण शरीराची त्वचा उजळते, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती)

​आगीच्या संपर्कात येणे टाळा

आयसोप्रोपिल किंवा इथिईल अल्कोहोल हे पटकन पेट घेणारे असल्यामुळे हात पूर्ण वाळल्याशिवाय आगीच्या जवळ जाऊ नये. आपल्या हाताच्या त्वचेवर काही चांगले जिवाणूसुद्धा असतात. सॅनिटायझरच्या वापरामुळे ते नष्ट होतात. त्यामुळे त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अस्थमा किंवी अ‍ॅलर्जी असलेल्या आजारांमध्येसुद्धा वाढ होऊ शकते. सॅनिटायझर त्वचा पातळ करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणे किंवा त्वचा काळी पडणे असे प्रकार होऊ शकतात. सॅनिटायझर वापरामुळे त्वचेवरील लिपीड थर नष्ट होतो व त्वचा कोरडी पडते.

(Natural Remedies काळवंडलेल्या अंडरआर्म्सची समस्या कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय, नियमित १०)

​सुगंधित सॅनिटायझर वापरत आहात?

सुगंधित सॅनिटायझरमध्येही रासायनिक द्रव्ये असतात. हे शरीराला खूप हानिकारक आहेत. त्यामुळे जननक्षमता कमी होते व गर्भाची वाढ खुंटते. पॅराबेन्स या रासायनिक द्रव्यामुळे संप्रेरकांसंबंधीच्या समस्या उद्भवतात. अशा प्रकारची सॅनिटायझर वापरू नयेत. काही नॉनअल्कॉहोलिक सॅनिटायझरमध्ये ट्रायक्लोझन किंवा ट्रायलोकार्बन नावाचे प्रतिजैविक संयुग असते. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यामुळे गर्भधारणा, गर्भाची वाढ यात अडचण येऊ शकते.

(ब्राह्मीमध्ये आहे अँटी-एजिंगचा फॉर्म्युला, औषधी वनस्पतीपासून तयार केलेल्या Cica Creamचे ‘हे’ आहेत फायदे)

​वरील दुष्परिणाम टाळण्यासाठी हे करावे

प्रत्येक वेळा सॅनिटायझर वापरल्यानंतर हातावर मॉइश्चरायझर घ्यावे. मिनेरल ऑइल किंवा पेट्रोलियम पदार्थ असलेले मोइश्चरायझर अधिक चांगले. सॅनिटायझर वापरल्यानंतर हात पूर्ण वाळल्यावर मॉइश्चरायझर लावावे.

(Skin Care या बियांच्या तेलामध्ये आहे नॅचरल अँटी-एजिंंग फार्म्युला, त्वचेला मिळतात ‘हे’ लाभ)

​त्वचेची काळजी कशी घ्यावी?

सॅनिटायझरचा वापर कमीत कमी करावा. साबणाच्या पाण्याने हात स्वछ करावेत. त्यानंतरही हातावर (Skin Care Tips) मॉइश्चरायझर घ्यावे. ज्या हाताच्या क्रीम्समध्ये humectants (Hyaluronic acid), चरबीयुक्त किंवा तेलयुक्त पदार्थ असतील, अशी क्रीम्स त्वचेचे हायड्रेशन वाढवतात.

(चेहऱ्याचंच नव्हे तर अंडरआर्म्‍स-पोट व शरीराच्या या भागांवरही फेशिअल करणं आवश्यक)

​हे देखील लक्षात ठेवा

  • सुगंधित मॉइश्चरायझर वापरू नयेत.
  • बाजारात मिळणारी हँड केअर क्रीम्स महाग असतात. घरातील साजूक तूप हे उत्तम मॉइश्चरायझर आहे.
  • रोज भरपूर पाणी प्यावे. यामुळे त्वचेची आर्द्रता सुधारते व त्वचा मऊ राहते.
  • हाताच्या त्वचेवर रॅशेस किंवा संसर्ग झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(Natural Skin Care हिवाळ्यात चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो, त्वचेसाठी करा हे ७ नैसर्गिक उपचार)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *